पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय दुसरा ૩૭ उपजे तें नाशे । नाशलें पुनरपि दिसे । हें घटिकांयंत्र तैसें । परिभ्रमे गा ।। ५९ ।। ना तरी उदो अस्तु आपैसे | अखंडित होत जात जैसे । हैं जन्ममरण तैसें । अनिवार जगीं ॥ १६० ॥ महाप्रळयअवसरें । हें त्रैलो- यही संहरे | म्हणोनि हा न परिहरे । आदिअंतु ॥ ६१ ॥ तूं जरी हैं ऐसें मानिसी । तरी खेद कां करिसी । काय जाणतचि नेणसी । धनुर्धरा ॥ ६२ ॥ एथ आणिकही एक पार्था । तुज बहुतीं परी पाहतां । दुःख करावया सर्वथा । विषो नाहीं ॥ ६३ ॥ अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत । अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना ॥ २८ ॥ सम० - भूतेंची आदि अव्यक्तीं मध्येही व्यक्त दीसती । अव्यक्तींच लया जाती त्याचा तो खेद कां परी ॥ २८ ॥ आर्या-मायेपासुनि सुटती भूर्ते तीमाजि मागुतीं दडती । मध्ये उगीच दिसती यासाठी सुज्ञ कोणते रडती ॥ २८॥ ओवी - प्रकृतिपासोनि होती । मरणपर्यंत दिसती । मागुतीं प्रकृत सामावती । हा शोक तुज अयोग्य ॥ २८ ॥ जियें समस्तें इयें भूतें । जन्माआदि अमृतें । मग पातली व्यक्तीतें । जन्मलेया ॥ ६४ ॥ तियें क्षयासि जेथ जाती । तेथ निभ्रांत आनं नव्हती । देखें पूर्वस्थितीचि येती । आपुलिये ॥ ६५ ॥ परि मध्ये जें प्रतिभासे । तें निद्रिता स्वम जैसें । तैसा आकारु हा मायावरों | सत्स्वरूपीं ॥ ६६ ॥ ना तरी पवनें स्पर्शलें नीर | पढिया से तरंगाकार । कां परापेक्षा अळंकार । व्यक्ति कनकीं ॥ ६७ ॥ तैसें सकळ हें मूर्त | जाण पां मौयाकारित । जैसें जें उत्पत्तीस आलें तें नाशाला जातें आणि जें नष्ट झालें, तें पुन्हां उत्पन्न होतें, हें रहाटगाडगें सारखेंच फिरत असतें. ५९ किंवा सूर्याचे उदयास्त जसे आपोआप व्हावयाचेच, त्यांत खंड म्हणून पडावयाचा नाहीं, तसेंच हें जन्ममरणही अनिवार आहे. १६० जेव्हां महाप्रळयाचा काळ येतो, तेव्हां हें त्रैलोक्यच नष्ट होतें, म्हणून एकंदरीत आदि व अन्त हे टळू शकत नाहींत. ६१ जर तुझ्या मनाला हें पटत असेल, तर मग हें दुःख कां करतोस ? बा धनुर्धरा पार्था, जाणूनबुजून अज्ञानांत कां शिरतोस ? ६२ शिवाय, अर्जुना, या गोष्टीचा तूं आणखी बहु परींनी विचार केलास, तर येथें दुःख करण्याला विषयच नाहीं, असें तुला आढळेल. ६३ सर्वभूतं जन्मापूर्वी अमूर्त होतीं, आणि जन्मानन्तर आकाराला आलीं, ६४ तींच हीं भूतें लयाला गेली, तर तीं कांहीं निराळी होतील, अशी शंकाच नको; तीं पूर्वस्थितीलाच परत जातील इतकेंच ! ६५ परंतु जन्मलयाच्या मध्यन्तरीं जें दिसतें, तो, निजलेल्याच्या स्वप्नांप्रमाणे मायेच्या प्रभावानें सत्स्वरूप आत्मतत्त्वाच्या ठायीं भासमान होणारा आकार होय. ६६ किंवा वायनें आंदोळलेले पाणी जसे तरंगाकार दिसतें, अथवा परक्याच्या इच्छेनें जसें सोनें अलंकाराचा आकार धरितें, ६७ तसेंच हें सर्व शरीरधारी भूतमात्र मायाबळाने आकारास आलेलें आहे, हें लक्षांत १ रहाटगाडगें. २ निराळी, भिन्न. ३ प्रतिभासे, आसमान् होतो. ४ मायेनें आकारास आणलेले.