पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४६ सार्थ श्रीज्ञानेश्वरी अविकृतु । सर्वरूप ॥ १५० ॥ अर्जुना ऐसा हा जाणावा । सकळात्मकु देखावा । मग सहजें शोकु आघवा । हरेल तुझा ॥ ५१ ॥ अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतम् । तथापि त्वं महाबाहो नैनं शोचितुमर्हसि ॥ २६ ॥ सम॰—आतां देहासर्वे होतो मरतो जरि मानिसी । तरी तूज महाबाहो या शोकासि न योग्यता ॥ २६ ॥ आय - नित्य मरे जन्मे तो जीव असें मानिसी जरी थोक । हे विजय महाबाहो न करीं चित्तीं तथापि तूं शोक ॥ २६ ॥ ओवी - जीवन उपजे न नासे । हें तुला ज्ञान असे । अर्जुना ! जाणोनी ऐसें । शोकासी काय कारण १ ॥ २६ ॥ अथवा ऐसा नेणसी । तूं अंतवंतचि मानिसी । तन्ही शोचूं न पवसी । पांडुकुमरा ।। ५२ ।। जो आदि स्थिति अंतु । हा निरंतरे असे नित्यु । जैसा प्रवाहो अनुस्यूतु । गंगाजळाचा ॥ ५३ ॥ तें आदि नाहीं खंडलें । समुद्री तरी असे मिनलें । आणि जातचि मध्ये उरलें । दिसे जैसें ॥५४॥ इयें तीन्ही तयापरी । सैरसींच सदा अवधारीं । भूतांसि कवणी अवसरीं । ठोकती न ॥ ५५ ॥ म्हणोनि हें आघवें । एथ तुज नलगे शोचावें । जे स्थिती हे स्वभावें | अनादि ऐसी ॥ ५६ ॥ ना तरी हैं अर्जुना । नयेचि तुझिया मना । जे देखोनि लोकु अधीना । जन्मक्षया ॥ ५७ ॥ तरी येथ कांहीं । तुज शोकासि कारण नाहीं । हे जन्ममृत्यु पाहीं । अपरिहर ॥५८॥ जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च । तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि ॥ २७ ॥ सम० - जो झाला त्यासि मरण मेल्या जन्महि निश्चित । परिहार नसे ज्याला त्या शोकाशि न योग्य तूं ॥२७॥ आर्या - झाला निश्चित मरतो निश्चित मेलाहि जमन्तो लोक । न टळे हैं कोणासी यास्तव न करी कदापि तूं शोक ॥ २७ ॥ ओवी - उपज लियास मृत्यु । मेलियास जन्म सत्यु । हा ऐसा अपरिहार्यू । शोक न करीं मानसीं ॥ २७ ॥ आकाररूपापलीकडचा असून, अनादि, विकारहीन आणि सर्वव्यापक असा आहे. १५० बा अर्जुना, ह्या आत्म्याला अशा प्रकारें जाणावें आणि हा सकलान्तर्गत आहे असें अनुभवास आणावें, म्हणजे तुझ्या शोकाला साहजिकच तिळभरही ठाय राहणार नाहीं. ५१ अथवा, जरी तूं या आत्म्याला अशा प्रकारचा न समजतां नाशवन्त मानीत असलास, तरीही, वा पार्था, तुला शोक होण्याचें कारण नाहीं, ५२ कारण, हा उत्पत्ति-स्थिति-नाशांचा प्रवाह अस्खलित, अखंड व शाश्वत चालू आहे. जसा गंगेच्या पाण्याचा ओघ अभंग चालत असतो; ५३ त्याला उगमस्थानी खंड नसतो, शेवटीं तो समुद्रांत समरस होऊन जातो, आणि अशा प्रकारें तें पाणी वाहत असतांही मध्यन्तरीं जसें आहेसें दिसतं, ५४ तशाच उत्पत्ति-स्थिति-लय ह्या तीन्ही अवस्था नेहमी एकसारख्या लागलेल्याच आहेत, असें समजावें. असा कोणताही कालांश नाहीं, कीं, त्या काळांत है अवस्थात्रय भूतमात्रांना चिकटलेलें नाहीं. ५५ तेव्हां या एकंदर प्रकाराबद्दल तुला दुःख करीत बसण्याचे कांहींच कारण नाहीं, कां कीं ही स्थिति स्वाभाविकपणें अशीच अनादि आहे. ५६ अथवा, अर्जुना, हे सर्व लोक उत्पत्तिलयाचे अंकित आहेत, ही गोष्ट जरी तुझ्या मनाला अनिष्ट वाटत असली, ५७ तरीही तुला यांत दुःख करण्याचें कारण नाहीं, कां कीं हे उत्पत्तिलय केवळ अपरिहार्य आहेत. ५८ १ खंडहीन, अखंड, २ अस्खलित, अतूट ३ एकसारखी व एकत्र असणारी. ४ थांबत नाहीत, लोपत नाहींत,