पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय दुसरा सम० - वस्त्रे जुनीं टाकुनि जेविं देतो । शरीरधारी नविं अन्य घेतो ॥ कलेवरें टाकुनि जीव जीर्णे । घेतो नवीं अन्य अनेकवर्णे ॥ २२ ॥ ४५ आर्या - जैसा नर कौंतेया नूतन घेतो त्यजोनि जीर्णपट | तैसा देह नवा घे देहीही टाकुनी जुना निषट ॥ २२ ॥ ओवी वस्त्रे जीर्ण झालियावरी । परिधान नवीं करी । कलेवर त्यजुनी घरी । देही अन्य ॥ २२ ॥ जैसीं जीर्णे वस्त्रे सांडिजे । मग नूतनें आणिकें वेढिजे । तैसें देहां- तरातें स्वीकारिजे । चैतन्यनायें ॥ ४४ ॥ नैनं छिंदति शस्त्राणि नैनं दहति पावकः । न चैनं क्लेदयंत्यापो न शोषयति मारुतः ॥ २३ ॥ अच्छेयोऽयमदाह्योऽयमक्लेद्योऽशोप्य एव च । नित्यः सर्वगतः स्थाणुरचलोऽयं सनातनः ॥ २४ ॥ सम० - याला न तोडिती शस्त्रे याला अग्नी न जाळिही । न पाणी भिजवी याला न करी शुष्क वायुही ॥२३॥ छेदा दाहा न हा योग्य शोषाया भिजवावया । नित्य सर्वांत जो स्तब्ध जो शाश्वत अचंचल ॥ २४ ॥ आर्या-शस्त्रें छिन्न नव्हे हा आत्मा तेसाच पावकें न जळे । न करी शुष्काहि वायू करवेना आईही तयास जळें २३ अच्छेय अदाह्य पुरुष किति तुज उघडोनि सांग बा वरणूं । अक्लेय अशोष्य तसा नित्याचळ आय सर्व आवरणू ॥ २४ ॥ अन्या - शास्त्रीं न तुटे कांहीं । अनी न जाळी पाहीं । जळ बुडविणार नाहीं । वायूच्यानें न शोषवे ॥ २३ ॥ बुडे न तुटे शोषे । जीव व्यापूनि असे । स्थाणुवत अचळ दिसे । परिपूर्ण भरला ॥ २४ ॥ हो अनादि नित्यसिद्धु । निरुपाधि विशुद्ध । म्हणऊनि शस्त्रादिकीं छेदु । न घडे यया ॥ ४५ ॥ हा प्रळयोदकें नालवे | अग्निदाहो न संभवे । एथ महाशोपु न प्रभवे । मारुताचा ॥ ४६ ॥ अर्जुना हा नित्यु । अचछु हा शाश्वतु । सर्वत्र सदोदितु । परिपूर्ण हा ॥ ४७ ॥ अव्यक्तोऽयमचिंत्योऽयमविकार्योऽयमुच्यते । तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि ॥ ६५ ॥ सम०—न चिंतवे निराकारा बोलिला निर्विकार हा । या कारण यासि असें जाण शोक नको करूं ॥ २५॥ आर्या - अव्यक्ताचिंत्य पुरुष अधिकारी वदति जाण सुश्लोक | जाणुनि यास्तव ऐसें न करों पार्था कदापि तूं शोक ।। २५ ।। ओंवी - न कळे चित्तीं न ये व्यक्तीं । तयासी अविकार म्हणती । ऐसें जाणोनी तूं किती । वृथा शोक करितोसी २५ हा तर्काचिये दिठी । गोचर नोहे किरीटी । ध्यान याचिये भेटी । उत्कंठा वाहे ॥ ४८॥ हा सदा दुर्लभु मना । आपुं नोहे साधना । निःसीमु हा अर्जुना । पुरुषोत्तम ॥ ४९ ॥ हा गुणत्रयारहितु । व्यक्तीसी अती । अनादि ज्याप्रमाणं जुनीं वस्त्रे टाकावीं आणि दुसरीं नवीं परिधान करावीं, त्याप्रमाणंच हा चैतन्याधि- पति जीवात्मा शरीराचा पालट करितो. ४४ हा आत्मा अनादि, निरन्तर स्वतः सिद्ध, उपाधिहीन, व अत्यन्त निर्दोष आहे, म्हणून शस्त्रादिकांनी याचा छेद होऊं शकत नाहीं. ४५ कल्पान्तींच्या जलपूरानंही हा भिजत नाहीं, विस्तवानें याचा दाह संभवत नाहीं, आणि वाऱ्याच्या शोषक शक्तीची मात्रा याच्यावर चालत नाहीं. ४६ अर्जुना, हा आत्मा अविनाशी, विकारहीन, शाश्वत आणि सर्वव्यापी असून स्वयमेव परिपूर्ण असतो. ४७ अरे, हा तार्किकाच्या दृष्टीला मुळीच दिसत नाहीं, ध्यानधारणेला याच्याच दर्शनाची सारखी उत्कंठा लागून राहिलेली असते. ४८ हा मनाच्या आणि सर्व साधनांच्या आटोक्याच्या बाहेर आहे. अर्जुना, हा आत्मा केवळ अमर्याद पुराणपुरुषच आहे. ४९ हा तीन्ही गुणांनीं निर्लेप व १ परमात्मा २ अधीन,