पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४४ सार्थ श्रीज्ञानेश्वरी मरते । म्हणत आहामी ॥ ३७ ॥ तरी अर्जुना तूं हैं नेणसी । जरी तत्त्वतां विचारिमी । तरी वधिता तं नव्हेसी । हे वध्य नव्हती ॥ ३८ ॥ न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयः । अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे ॥ २० ॥ वेदाविनाशिनं नित्यं य एनमजमव्ययम् । कथं स पुरुषः पार्थ कं घातयति हन्ति कम् ॥ २१ ॥ सम० न हा होतो मरतो वा कधींही । देहासंगै होउनी होत नाहीं ॥ अजा नित्या शाश्वता या पुराणा । देहादृश्या मारितां मारवेना ॥ २० ॥ पूर्वो लक्षण यातें जाण तो पुरुष स्वयें । प्रकृतीवेगळा कोणा मारी वा मारवी कसा ॥२१॥ आर्या- आत्मा न होय न मरे न कधीं होवोनि मागुता होती । शाश्वत पुराण अज जो न मरे मरतां शरीर आहो तो ॥ २० ॥ अज अव्यय अविनाशी आत्मा ऐसें मनांतचि विचारी । मग तो पुरुष कसा रे पार्था कोणासि मारवी मारी ॥ २१ ॥ ओंवी - आत्मा नाशारहित । उपजों न लाहे निश्चित । हा अज निश्य पुराण शाश्वत । यास नाश नाहीं सर्वथा २० आत्मा जाण अविनाश । अध्यय म्हणती तयास । अर्जुना ! ऐशिया जीवास । कवण मारूं शके ? २१ जैसें स्वप्नामाजीं देखिजे । तें स्वप्नचि साच आपजे । मग चेऊनियां पाहिजे । तंव कांहीं नाहीं ॥ ३९ ॥ तैसी हे जाण माया । तूं भ्रमत आहासी वायां । शस्त्रें हाणितलिया छाया । जैसी आंगीं न रुपे ॥ १४० ॥ कां पूर्ण कुंभ उलंडला | तेथ विवाकारु दिसे भ्रंशला । परी भानु नाहीं नासला । तयासवें ॥ ४१ ॥ ना तरी मठीं आकाश जैसें । मठाकृति अवतरलें असे । तो भंगलिया पैसें । स्वरूपचि ॥ ४२ ॥ तैसें शरीराच्या लोपीं । सर्वथा नाशु नाहीं स्वरूपीं । म्हणऊनि तूं हें नौरोपीं । भ्रांति बापा ॥ ४३ ॥ वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि । तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही ॥ २२ ॥ मारणारा आणि हे मरणारे, ' असें म्हणत आहेस. ३७ परंतु, अर्जुना, तुला अद्याप हें समजलें नाहीं, कीं, जर सत्यासत्याचा विचार केला तर तूं यांना मारणारा नाहींस आणि हेही मारले जाणारे नाहींत. ३८ जसे, जें कांहीं स्वप्नांत पहावें, तं स्वप्नांतच खरें गणले जाते, पण जागे होऊन पहावें, तों त्याला ठावठिकाणच नसतं, ३९ तद्वत्व ही माया समज. असें असतां तूं उगाच्या उगाच भ्रमला आहेस. जसे छायेवर हाणलेले शस्त्र मूळच्या अंगास रुपत नाहीं, १४० किंवा जसा पाण्याने भरलेला घडा उपडा झाला व त्याबरोबर त्या पाण्यांत पडलेले प्रतिबिंबही नम्र झालें, तरी त्या प्रतिवित्रा संगतीं मूळच्या सूर्याचा नाश संभवत नाहीं, ४१ किंवा जसें झोंपडींतील आकाश झांपडीच्या आकाराचे असतं, परंतु ती झोपडी मोडली म्हणजे आकाशाचं मूळ स्वरूपच आपोआप अविकृत राहते, ४२ तसाच शरीराचा नाश झाला असतांही, स्वरूपाचा नाश होत नाहीं. म्हणून, वा अर्जुना, तूं या नाशाच्या खोट्या कल्पनेचा आरोप मूळ स्वरूपावर करूं नकोस. ४३ १ लाभावें. २ बोंचली जाते. ३ आपोआप, आपसूक ४ लावू नकोस.