पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय दुसरा ४३ तें फलकट । जाणों आलें ॥ १३० ॥ तैसें विचारितां निरंसलें । तें प्रपंचु सहजें सांडवलें । मग तत्त्वतां तत्त्व उरलें । ज्ञानियांसी ॥ ३१ ॥ म्हणोनी अनित्याच्या ठायीं । तैयां आस्तिक्यबुद्धि नाहीं । निष्कर्षु दोहींही । देखिला असे ॥ ३२ ॥ अविनाश तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम् । विनाशमव्ययस्यास्य न कश्चित्कर्तुमर्हति ॥ १७ ॥ सम - अविनाशी तेंचि जाण ज्याणें है व्यापिलें जग । कोणी या अव्ययांशाचा नाशही न करूं शके ॥ १७ ॥ आर्या-व्यापी सर्व जगातें पार्था तूं जाण तेंचि अविनाशी । वदतों हैचि तुला मी कोण अशा अव्यया तया नाशी १७ अवी- आत्मा अविनाश तुवां जाणिजे । सर्वव्यापक असे सहजें । तया नाश करूं न शके दुजें । हें ज्ञान धरूनि शोक न करीं ॥ १७ ॥ देखें सारासार विचारितां । भ्रांति ते पाहीं असारता । तरी सार तें स्वभावता । नित्य जाणें ॥ ३३ ॥ हा लोकत्रयाकारु । तो जयाचा विस्तारु । तेथ नामवर्णआकारु | चिन्ह नाहीं ॥ ३४ ॥ जो सर्वदा सर्वगतु | जन्म- क्षयतीतु । तया केलियांहि धातु । कदा नोहे ॥ ३५ ॥ अंतवंत इमे देहा नित्यस्यांक्ताः शरीरिणः । अनाशिनोऽप्रमेयस्य तस्माद्युद्धयस्व भारत ॥ १८ ॥ सम० – देह नश्वर ज्या जीवा बोलिला अंश नित्य तो । अनाशी अप्रमेयाचा भांड यास्तव भारता ॥ १८ ॥ आर्या-- अविनाशी जीवाच्या होय तनूलागिं भारता मरण । यास्तव कुंतीतनया तूं करिं पार्था स्वधर्मकाम रण ॥ १८ ॥ ओवी — देह तंव नाशवंत । आत्मा नाशरहित । ज्यासि अज्ञान म्हणिजेत । पार्था ! ऊठ युद्धासि ॥ १८ ॥ आणि शरीरजात आघवें । हें नाशवंत स्वभावें । म्हणोनि तुवां झुंजावें । पांडुकुमरा ।। ३६ ।। य एनं वेत्ति हतारं यश्चैनं मन्यते हतम् । उभौ तौ न विजानीतो नायं हंति न हन्यते ॥ १९ ॥ सम०-भेदवादी म्हणे मारी चार्वाक म्हणतो मरे । दोघेही नेणती आत्मा न हा मारी न हा मरे ॥ १९ ॥ आर्या--आत्मा वधी म्हणे जो आणि वदे जो वधोनिही तो घे । न वधी न मरे आत्मा करिती अध्यास मूर्ख ते दोघे १९ ओवी - एक म्हणती 'हा मारितो' । दुसरा म्हणे 'हा मारावेतो' । दोघे नेणती ' कोण मारतो' | मारणें मरणें असेना १९ तूं धरूनि देहाभिमानातें । दिठी सूनि शरीरातें । मी मारिता है। भरीव धान्य तं मागें राहतें, आणि जें उडतें तें फोलकट ठरते. १३० तसेंच विचार करितां करितां प्रपंचाचा निरास होऊन तो आपसूकच नाहींसा होतो, आणि मग ज्ञानवानाला तत्त्वावांचून दुसरें कांहींच खरोखर उरत नाहीं. ३१ म्हणून अनित्य वस्तूसंबंधं तो कधीही आस्तिकबुद्धि ठेवीत नाहीं, कारण, 'नित्य' तेंच 'सत् ' आणि ' अनित्य ' तेंच 'असत् ' असा त्यानें दुहेरी निर्णय केलेला असतो. ३२ आणि असे पहा, सारासार विचार करूं लागलें, म्हणजे असें ठरतें कीं, जें 'अस्थिर ' आहे 'तेच' असार' आणि जें 'सार' आहे तें स्वभावतांच 'नित्य ' जाणावं. ३३. हा लोकत्रयाचा दृश्य आकार ज्याच्यापासून विस्तरला, त्याला नांव, रंग, रूप, वगैरे कांहीं एक लक्षण नाहीं. ३४ तो निरन्तर सर्वव्यापी व जन्ममरणरहित असतो. त्याचा घात करूं म्हटलें तरी घात कधींही होऊं शकत नाहीं. ३५ आणि हीं सर्व शरीरें स्वभावतांच नाशवन्त आहेत, म्हणून, हे पांडुपुत्रा पार्था, तूं निःशंक युद्ध कर. ३६ अरे, तूं या केवळ शरीराचा अभिमान धरून आणि त्या शरीरासच दृष्टी भिडवून, 'मी १ असत्य ठरले. २ ज्ञान्यांना ३ निर्णय, निश्रय. ४ जन्ममरणाच्या टप्याबाहेरचा, ५ करण्याचा प्रयत्न केला असतांही. ६ ठेवून.