पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४३ सार्थ श्रीज्ञानेश्वरी रोहिणीचं जळ जैसें । कां स्वप्नींचा आभासे । भद्रजति ॥ २१ ॥ देखें अनित्य तियापरी । म्हणऊनि तूं अव्हेरीं । हा सर्वथा संगु न धरीं । धनुर्धरा ॥ २२ ॥ यहि न व्यथयंत्येते पुरुषं पुरुषर्षभ । सम दुःखसुखं धीरं सोऽमृतत्वाय कल्पते ॥ १५ ॥ सम० - व्यथा न देती पुरुषा हे जया पुरुषर्षभ । सम दुःखीं सुखों धीर तो मोक्षा योग्य होतसे ॥ १५ ॥ आर्या-या विषयींची पीडा नोहे ऐसी असे जया युक्ती । तो सम दुःखसुखींही धीरहि तो पावतो महामुक्ती ॥१५ ओवी - सुखदुःख तुल्य मानिती । जे सुखदुःखा न धरिती । ते उत्तम पुरुष होती । तयां मोक्ष असे ॥ १५ ॥ हे विषय जयातें नाकळिती । तया सुखदुःखें दोनीन पवती । आणि गर्भवासुसंगती । नाहीं तया ॥ २३ ॥ तो नित्यरूप पार्था । वोळखावा सर्वथा । जो या इंद्रियार्थं । नांगवेचि ॥ २४ ॥ नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः । उभयोरपि दृष्टोऽतस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः ॥ १६ ॥ सम० -असत् देह न जो नित्य जीव सत् न अनित्य तो । दोहींचे तत्त्व या दोन तवज्ञीं बह्म देखिलें ॥ १६ ॥ आर्या - लटिक्या सत्यत्व नसे नाहीं मिथ्यात्व तेंवि सत्याला । हा निर्णय दोहींचा आहे बा विदित तत्त्ववेत्त्यांला १६ ओवी - 'नाही' ते नुप जे कांहीं । 'आहे' त्यासि अभाव नाहीं । दोन्होंत दोन्हीपण पाहीं । तत्त्वज्ञानी पहाती ॥१६॥ आतां अर्जुना कांहीं एक । सांगेन मी आइक । जें विचारपर लोक । वोळखिती ॥ २५ ॥ या उपाधिमाजीं गुप्त । चैतन्य असे सर्वगंत । तें तत्त्वज्ञ संत । स्वीकारिती ॥ २६ ॥ सलिलीं पय जैसें । एक होऊनि मीनले असे । परी निवडूनि राजहंसें | वेगळे कीजे ॥ २७ ॥ कीं अभिर्मुखें किडॉळ । तोडोनियां चोखाळ । निवडिती केवळ | बुद्धिमंत ॥ २८ ॥ ना तरी जाणिवेच्या आणी । करितां देविकडसणी । मग नवनीत निर्वाणीं । दिसे जैसें ॥ २९ ॥ कीं भूस बीज एकवट । उपैणितां राहे घनवट | तेथ उडे स्वप्नांतला हत्ती, तसेच हे विषय अनित्य आहेत. म्हणून, हे धनुर्धरा पार्था, यांना तूं झाडून टाक, यांचा तिळमात्र संग ठेवू नकोस. २१, २२ या विषयांची मात्रा ज्याच्यावर चालत नाहीं, त्याला सुखदुःखें शिवत नाहींत आणि त्याला गर्भवासही सोसावा लागत नाहीं. २३ अर्जुना, जो इंद्रियसुखाच्या आराठींत सांपडत नाहीं, तो मनुष्य सर्वस्वी नित्यरूपच समजावा. २४ आतां, अर्जुना, जी विचारी लोकांना स्पष्ट कळते, अशी आणखी एक गोष्ट तुला सांगतों. २५ या मायामय विश्वांत एक सर्वान्तर्यामी गूढ तत्त्व आहे, तें चैतन्य होय आणि सर्व तत्त्ववेत्ते सज्जन या चैतन्याचा सद्वस्तु म्हणून स्वीकार करितात. २६ पाण्यांत दूध मिसळून एकजीव होते परंतु जसा राजहंस ते निवडून निराळें करितो, २७ किंवा हुशार कसवी लोक जसे विस्तवांत हीण जाळून टाकून, चोख सोनं निवडून काढितात. २८ अथवा, ज्ञानाच्या सामर्थ्यानें दुधाचें घुसळण केलें असतां, शेवटीं जसे लोणी दिसूं लागतें, २९ किंवा धान्य व भूस हीं एकवटलीं असतां वारवावीं, म्हणजे जसें जें १ मृगजळ. सूर्य रोहिणी नक्षत्री असता उन्हाळ्याचा कडेलोट होऊन जें जळ भासतें, तें. २ हत्ती. ३ अविनाश, शाश्वत. ४ विवेकी. ५ सर्वान्तर्यामी ६ अम्मीच्या द्वारे, विस्तवांत तावून, ७ दणकट, ८ बळाने. ९ दह्याचें घुसळण. १० शेवळीं. ११ वारवतां, पाखडतां.