पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८ 12710005 आतां आवडी जेथ पढे, तयाची अवसरी पुढेपुढे रिगों लागे हें घडे, प्रेम ऐसें. ज्ञाने० १६-५३ असो; प्रस्तुत ग्रंथाचा अर्थ करण्याची महाप्रयासाची कामगिरी रा. बा. अ. भिडे, बी. ए. यांनीं ठरल्याप्रमाणे मोठ्या आनंदाने पार पाडली. इतर ग्रंथांपेक्षां या प्रतीचा विशेष म्हणजे श्रीमद्भगवद्गीतेच्या मूळ श्लोकाखालीं कृष्णभक्त कविवर्य वामनपंडितांची सुटसुटीत समश्लोकी, व मोरोपंत कवीश्वरांची समार्याटीका ह्या दिलेल्या आहेत. ज्ञानेश्वरी ओव्या फार ठळक ठशांत छापल्या आहेत, व अर्थालाही मध्यम ठसा योजला आहे. यामुळे वारकरी सांप्रदायिक मंडळीला तशीच इतर वाचकांना ही प्रत विशेष आवडेल, अशी मला आशा आहे. या प्रतीचा अर्थ करण्याचे काम कोणा हरिभक्तिपरायण गृहस्थांकडून झालेलें नाहीं, ही बाब कित्येकांस चमत्कारिक वाटणें शक्य आहे. परंतु रा. भिडे यांचा, श्रीनाथभागवत, श्रीज्ञानेश्वरी, श्रीदासबोध, इत्यादि संतकवींच्या प्रासादिक ग्रंथांशी असलेला दीर्घकालीन व्यासंग सर्वविश्रुत आहे. ह. भ. प. बंकटस्वामी हे आपल्या सार्थ ज्ञानेश्वरीच्या प्रस्तावनेत प्रेमळपणाने म्हणतात कीं, "ज्ञानेश्वरीच इतक भाषांतरें व टिप्पण्या प्रसिद्ध होऊनही आमचे मतें ज्ञानेश्वरी ग्रंथ सुलभ करण्याचे प्रयत्न जितक्या दिशांनीं होतील तितके इष्टच आहेत, मग ते सांप्रदायिकांकडून होवोत अगर असांप्रदायिकांकडून होवोत. " हरिभक्तिपरायणांनी केलेला अर्थ आवडावा, ही पूर्वपरंपराच आहे; पण इतरांनीं केलेला अर्थही ग्रंथरहस्य उकलणारा असल्यास सुज्ञांस आदरणीय कां वाटणार नाहीं ? तेव्हां भाविक बुद्धीनें मीं केलेले, व ग्रंथरहस्य विशद करण्यावर कटाक्ष ठेवून सरळ पद्धतीनें संपादकांनी पार पाडलेलें, हें कार्य, भाविक व सुविद्य वर्गाला मान्य होईल असा भरंवसा अंतरीं ठेवून मी महाभगवद्भक्त वामनपंडितांचे ' यथार्थदीपिकेतील ' सहजोद्वार येथे उ करतों- वाचोत जे वाचिती, न वाचोत जे वाईट म्हणती, संतुष्ट होय एक जगत्पति, या यथार्थ निरूपणें ॥ ज्यांस इतर टीकाकारांचे अभिमान, ते न देतील या टीकेस मान, हरिभक्त निर्मत्सर निरभिमान, ते देतील सन्मान या टीकेतें ॥ आतांपर्यंत मी जे ग्रंथ प्रकाशित केले, त्यांचे ज्यांनी संशोधन, भाषांतर, वगैरे करून दिलें, त्या सर्वांचा मी अत्यंत आभारी आहे. त्याचप्रमाणे भाविक, सांप्रदायिक, प्रेमळ, संतमंडळींनीही ह्या ग्रंथांस प्रेमपूर्वक आपलेपणानें आश्रय दिला, याबद्दल मी त्यांचा कायमचा ऋणी आहे. तसेच ग्रंथांचे मुद्रण काळजीपूर्वक सुंदर करून दिल्याबद्दल " मुंबईवैभव " प्रेसचे कर्तव्यतत्पर म्यानेजर श्री. भास्करराव सिद्धये व कामगार मंडळी यांचा मी आभारी आहे. प्रुफ तपासण्याचे काम म. भा. भू. आजगांवकर यांनी कळकळीनें निखोड काम केलें, याबद्दलही मी त्यांचा फार कृतज्ञ आहे. आतां मी तुकाराममहाराजांच्या खालील वचनांनीं सर्वांचा मोठ्या नम्रतेनें व प्रेमानें निरोप घेतों- सकळांच्या पायां माझी विनवणी, मस्तक चरणी ठेवितसें ॥ अहो श्रोते वक्त सकळही जन, बरें पारखून बांधा गांठी ॥ फोडिले भांडार, धन्याचा हा माल, मी तंव हमाल भारवाही ॥ तुका म्हणे, चाली जाली चहूं देशीं, उतरला कसीं खरा माल ॥

बोलिली लंकुरे, वेडीं वांकुडीं उत्तरें ॥ करा क्षमा अपराध, महाराज तुम्ही सिद्ध ॥ नाहीं विचारिला, अधिकार म्रगं आपुला | तुका म्हणे ज्ञानेश्वरा, राखा पायापं किंकरा ॥ ज्येष्ठ शु० ५ शक १८५० श्रीकृष्णार्पणमस्तु प्रकाशक INNNNNNNNNNNNNNNNNNNNNINAANNONS