पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकाशकाचें मनोगत मूर्क करोति वाचालं पडुं लङ्घयंत गिरिम् । यत्कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधवम् ॥ सर्वसाक्षी व ज्ञानिचक्रवर्ति भगवान् श्रीकृष्ण परमात्म्याच्या कृपेने आज सद्भावनिष्ठ संकल्पाप्रमाणे 'श्रीज्ञानेश्वर महाराजांचा श्रीज्ञानेश्वरी ग्रंथ सार्थं प्रसिद्ध होत आहे. शक १८३९मध्ये ' मुक्तेश्वरी सार्थ श्रीमद्भगवद्गीता' या पुस्तकाची दोन हजारांची आवृत्ति केवळ भगवत्प्रीत्यर्थ वांटण्याकरितां काढली होती, व ती लगेच संपली. मुक्तेश्वरी सार्थ गीतेच्या भाषांतराचे काम श्री. ना. वा. गुणाजी, बी. ए., एल्एल्. बी., यांनीं अगदीं निरपेक्षपणे करून आम्हांस निरंतरचे ऋणी करून ठेविले आहे. 9 वर उल्लेखलेल्या पुस्तकानंतर लागलाच 'श्रीज्ञानेश्वरी ग्रंथ प्रकाशित करावा, अशी अंतरंगी प्रेरणा झाली. अर्थात् मुक्तेश्वरी गीतेप्रमाणे हा ग्रंथ मोफत वांटणे माझ्या शक्तीचे बाहेर होतें, तरीपण ग्रंथाचें बाह्यांग व अंतरंग शक्य तेवढे उत्तम करून, तो अगदी अल्प किंमतीस लोकांना देणे, हॅ साध्य कोटींतील आहे असें मनानें घेतले; तथापि कांहीं ना कांहीं गुंत्यांनीं व अडचणींन तो निश्चय कार्यरूपानें अवतरण्याचे लांबणीवर पडत गेलें. तुका म्हणे नाहीं चालत तांतडी, प्रातकाळ घडी आल्यावीण. तथापि आज अकरा वर्षांनीं कां होईना, पण ती अंतःकरणाची उत्कट उत्कंठा पुरी होण्याचा योग जुळून येऊन, सत्य संकल्पाचा दाता भगवान्, सर्व करी पूर्ण मनोरथ, या साधुवचनाचा प्रत्यय प्रत्यक्ष येऊन माझें अंतःकरण आनंदमय कृतज्ञताभावांत लीन होत आहे. शक १८३९ मध्ये 'श्रीज्ञानेश्वरी' हा एकच ग्रंथ प्रकाशित करावा इतकीच प्रेरणा अंतरंगांत उद्भवली असें नाहीं, इतर श्रीएकनाथी भागवत, श्रीतुकाराममहाराजांच्या अभंगांचा गाथा, श्रीमदध्यात्मरामायण, श्रीदासबोध, हे प्रेमळ भाविक जनांचे ' सत्कामकल्पद्रुम' असे संत कविविरचित पांच ग्रंथ आपल्या हातून प्रकाशित व्हावे, अशा स्फूर्तीचा ध्वनीही अंतरंगांत उठला, परंतु, उत्पद्यन्ते विलीयन्ते दरिद्राणां मनोरथाः । या भोंवण्यांतून मी कसा सुटणार ! परंतु भगवंतांच्या मनांतच माझ्या हातून सेवा करून घेण्याचें होतें, मग तदनुरूप योग जुळून कां येऊं नयेत? प्रथम संकल्पापासून बरोबर सहा वर्षांनीं शक १८४५ मध्ये ह. भ. प. ल. रा. पांगारकर, बी. ए. यांनी तयार केलेला श्रीसमर्थांचा सार्थ दासबोध ग्रंथ प्रसिद्ध झाला. नंतर तीन वर्षांनी म्हणजे शक १८४८ त ह. भ. प. विष्णुवोवा जोग यांचा 'श्रीतुकाराममहाराजांच्या अभंगांचा गाथा' ( भाग १।२) भाषांतरासह मुद्रित झाला. तसेंच, म. भा. चित्रमयूर कृ. ना. आठल्ये यांनी तयार केलेलें सार्थ श्रीएकनाथी भागवत, आणि ह. भ. प. ल. रा. पांगारकर यांनी टिप्पणी दिलेलें 'श्रीसमर्थग्रंथभांडार' हे तीन ग्रंथ प्रसिद्ध झाले. वरील ग्रंथांबरोबरच श्री. आठल्येकृत ' श्रीसमर्थांचें सामर्थ्य ' ह. भ. प. पांगारकरकृत 'श्रीतुकाराममहाराजांचें चरित्र' आणि म. भा. भू. आजगांवकरकृत 'श्रीएकनाथमहाराज यांचे चरित्र' ह्या संतचरित्रपर कृति प्रसिद्ध झाल्या; आणि संकल्पाप्रमाणें आज रा. बाळकृष्ण अनंत भिडे, बी. ए., यांनी संपादिलेला 'सार्थ श्रीज्ञानेश्वरी' हा ग्रंथ प्रसिद्ध होत आहे. ह. भ. प. ल. रा. पांगारकर यांनी लिहिलेले 'श्रीज्ञानेश्वरमहाराजांचें चरित्र' त्यांचेपासून हक्कासह दीड वर्षापूर्वी घेतले असून ते याच ग्रंथाबरोबर प्रसिद्ध करावें असें मनांत होतें, परंतु तसे होण्याचे घडलें नाहीं. आज मराठीच्या संग्रहीं ज्ञानेश्वरीच्या सटीप व सार्थ प्रती चार पांच प्रकाशकांच्या असतांही, ह्याच ग्रंथाची आणखी निराळी प्रत छापण्याची आवश्यकता कोणती ? असे कित्येकांस वाटणें अगर्दी स्वाभाविक आहे; पण प्रेमाची जातीच अशी आहे.