पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय दुसरा मात्रास्पर्शास्तु कौंतेय शीतोष्णसुखदुःखदाः। आगमापायिनोऽनित्यास्तांस्तितिक्षस्व भारत ॥ १४ ॥ सम० - कौंतेया सुखदुःखे हे देती विषय इंद्रिये । यांलाच नाश उत्पत्ती सोसावीं हींच भारता ॥ १४ ॥ आर्या - सुख दुःख शीतउष्णप्रद मात्रास्पर्श भारता पाहीं । साहीं ज्ञानबळाने हे सर्व अनित्य आगमापायी ॥ १४ ॥ ओवी - मात्रा तीं इंद्रिये जाण । विषय असती त्यांचे प्राण देती सुख दुःख शीत उष्ण । म्हणोनि अनित्य जाण पां एथ नेणावया हेंचि कारण । जें इंद्रियां आधीनपण | तिहीं आक- ळिजे अंतःकरण । म्हणऊनि भ्रमे ॥ ११ ॥ इंद्रिये विषय सेविती । तेथ हर्प शोकु उपजती । ते अंतर आलेविती । संगें येणें ॥ १२ ॥ जयां विषयांच्या ठायीं । एकनिष्ठता कहीं नाहीं । तेथ दुःख आणि कांहीं । सुखही दिसे ॥ १३ ॥ देखें शब्दाची व्याप्ति । निंदा आणि स्तुति । तेथ टेपाटेप उपजती । श्रवणदारे ॥ १४ ॥ मृदु आणि कठिण । हे स्पर्शाचे दोनी गुण । जे वपूचेनि संगें कारण । संतोपखेदां ॥ १५ ॥ मयासुर आणि सुरेख । हें रूपाचें स्वरूप देख | जें उपजवी सुखदुःख । नेत्रद्वारें || १६ || सुगंधु आणि दुर्गंधु । हा परि- मळाचा भेदु । जो घ्राणसंगें विपादु । तोपु देता ॥ १७ ॥ तैसाचि विविध रसु । उपजवी प्रीतित्रासु । म्हणूनि हा अपभ्रंशु । विषयसंगु ॥ १८ ॥ देखें इंद्रियां आधीन होइजे । तैं शितोष्णांतें पाविजे । आणि सुखदुःखी आक- ळिजे । आपणपें ।। १९ ॥ या विषयावांचूनि कांहीं । आणीक सर्वथा रम्य नाहीं | ऐसा स्वभावोचि पाहीं । इंद्रियांचा ॥ १२० ॥ हे विषय तरी कैसे | मग, हैं तत्त्व कां समजत नाहीं, तर मनुष्य इंद्रियांच्या स्वाधीन होतो, आणि इंद्रियांच्या पंग- स्तीत अन्तःकरण गेलें, म्हणजे मनुष्य भ्रमाला बळी पडतो. ११ इंद्रियें विषयांचे सेवन करितात, आणि त्यापासून हर्षशोक हे विकार संभवतात आणि त्यांचा पगडा अन्तःकरणावर बसतो. १२ यामुळेच या विषयांच्या ठिकाणीं एक निश्चितपणा नाहीं. ते कधीं दुःखमय, तर कधीं सुखमय, भासतात. १३ असें पहा, निंदा आणि स्तुति ह्या दोन्ही ' शब्दस्वरूपच असतात, मात्र कानाने त्यांचं सेवन केलें, म्हणजे द्वेष व समाधान असे भिन्न विकार उत्पन्न होतात. १४ मऊ आणि कठीण, ह्या दोन्ही कल्पना वास्तविक ' स्पर्शरूपच' आहेत, परंतु त्वचेच्या द्वारे त्यांचें भान झालें म्हणजे त्या सुख व दुःख उत्पन्न करण्याला कारण होतात. १५ भयंकर असो, किंवा सुरेख असो; तीं दोन्ही ' रूपं ' या वर्गातच येतात, मात्र त्यांचं डोळ्यांच्या द्वारें अवमान झालें, म्हणजे दुःखमय किंवा सुखमय संवेदना अनुभवास येते. १६ सुगंध किंवा दुर्गंध या दोहोंचेही 'गंध' हेंच मूळ स्वरूप, पण नाकाशीं संसर्ग झाल्याने ते सुखदुःख उत्पन्न करितात. १७ त्याप्रमाणेच 'रस विषयाचेही रसनेंद्रियाशीं संग झाल्यामुळे दोन भेद होतात आणि ते भेद आवडीनावडीला कारण होतात. एवंच विषयाचे सेवन केल्यानंच मूळस्वरूपापासून भ्रर होण्याचा प्रसंग येतो. १८ अर्जुना, ध्यानांत घे, कीं, इंद्रियांच्या हातांत सांपडावें आणि मग शीतोष्णादिक अनुभवावी; म्हणजे आपण आपसूकच सुख- दुःखाच्या किचाटांत अडकतों. १९ या विषयावांचून दुसरें कांहींच गोड लागूं नये, असा या इंद्रियांचा स्वाभाविकच धर्म आहे. २० बरें, हे विषय तरी कसे असतात, तर जसे मृगजळ किंवा १ की, कारण. २ अंतःकरण ३ बुडवितात. ४ एकाच स्थितीत अविकृत राहण्याचा स्वभाव; शाश्वती ५ पा ६