पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४० सार्थ श्रीज्ञानेश्वरी न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः । न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम् ॥ १२ ॥ सम. - कधींही नवतों मी तूं हे राजे न घडे असें । नासों हैं घडेना की अनादिहि नित्यही ॥ १२ ॥ आर्या - मी आणि तूंहि पार्था सर्वहि हे भूमिपाळ सेना ही । नव्हतों मार्गे आम्ही तैसेचि पुढे नर्सों असें नाहीं ॥ १२ ॥ ओवी - मज तुज रायांसी । गणित नाहीं जन्ममरणांसी । आणि पुढे सर्वांसी । असंख्यात जाण पां ॥ १२ ॥ अर्जुना सांगेन आइक | एथ आम्ही तुम्ही देख । आणि हे भूपति अशेख | आदिकरुनी ॥ ३ ॥ नित्यता ऐमेचि अमोनी । ना तरी निश्चित क्षया जाउनी । हे भ्रांति वेगळी करुनी । दोन्ही नाहीं || ४ || हें उपजे आणि नाशे । तें मायावशे दिसे । येन्हवीं तत्त्वता वैस्तु जे असे । ते अविनाशचि ॥ ५ ॥ जैसें पवनें तोय हालविलें । आणि तरंगाकार जाहलें । तरी कवण के जन्मलें | म्हणों ये तेथ ॥ ६ ॥ तेंचि वायूचे स्फुरण ठेलें । आणि उदक सहज सपाट जाहलें । तरी आतां काय निमालें । विचारी पां ॥ ७ ॥ देहिनोऽस्मिन्यथा देहे कौमारं यौवनं जरा । तथा देहांतरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति ॥ १३ ॥ सम० - जीवासी देहिं या जैसें बाल्य तारुण्य वार्धक । तैसी देहांतरप्राप्ती महिना धीर ते स्थळीं ॥ १३ ॥ आर्या- कौमार्य योवन जरा येती जाती पृथासुता वीरा तैसें देहांतरही न करी चित्तांत मोह त्या धीरा ॥१३॥ ओवी - जीव असतां देहीं । बाळतरुणवृद्ध हो कांहीं । जीव देहधारी पाहीं । सत्खधीर मोह न पावती ॥१३॥ आइकें शरीर तरी एक । परी वयसा भेद अनेक । हें प्रत्यक्षचि देख | प्रमाण तूं ॥ ८ ॥ एथ कौमारत्व दिसे । मग तारुण्यीं तें भ्रंशे । परी देहचि हा न नाशे | एकेकासवें ॥ ९ ॥ तैसी चैतन्याच्या ठायीं । इयें शेरीरांतरें होती जाती पाहीं । ऐसें जाणे तया नाहीं । व्यामोहदुःख ॥ ११० ॥ अर्जुना, मी सांगतों तें ऐकून घे. अरे, तुम्ही, आम्ही, आणि येथले हे समस्त राजे, इत्यादि सर्वजण 'आतां आहों तसेच राहू, ' किंवा 'निश्चयानें नाशाला जाऊं, ' या दोन्ही भ्रान्ति कल्पना सोडून दिल्या, म्हणजे ' राहणं' व 'नाशणें' हीं दोन्हीं खोटींच ठरतात. ३, ४ हें उपजते आणि नाश पावतें, ही भावना केवळ मायागुणाने उद्भवते. नाहीं तर, मूलभूत वस्तु, खरोखर पाहिले असतां, अविनाशच आहे. ५ असे पहा, वाऱ्यानें पाणी चाळविले आणि त्यामुळे तें तरंगयुक्त झालें, तर तेथे खरोखर कोण उत्पन्न झाले ? ६ आणि तंत्र वान्याचें चाळवणे बंद झाले आणि उदक पुन्हां संथ सपाट झाले, तर तेथे कोणाचा नाश झाला ? याचा विचार कर बरें. ७ आणखी एक; शरीर एकच असते, परंतु वयोमानानें भेद उत्पन्न होतात, हे प्रत्यक्ष उदाहरण तूं ध्यानी ध्यास. ८ या शरीराच्या ठायीं बालपण दिसतें, मग तारुण्य आले म्हणजे बाळपण नाहींसें होते, परंतु त्यांपैकी कोणाच्याहीबरोबर शरीराचा नाश होत नाहीं. ९ त्याप्रमाणेच चैतन्यवस्तूच्या ठिकाणी हीं शरीरान्तरं घडतात, म्हणजे एका देहाचा नाश होऊन, दुसऱ्या देहाची प्राप्ति होते; हैं ज्याला समजले, त्याला मोह पडत नाहीं व दुःखही होत नाहीं. ११० १ परब्रह्म २ निरनिराळी शरीरे.