पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय दुसरा ३९ परी नेणिवेतें न सांडिसी । आणि शिकवूं म्हणों तरी बोलसी । बहुसाल नीति ॥ ९२ ॥ जात्यंधा लागे पिसें । मग तें सैरा धांवें जैसें । तुझें शाहाण- पण तैसें । दिसतसे ॥ ९३ ॥ तूं ओपण तरी नेणसी । परी या कौरवांत शोचूं पासी । हा बहु विस्मय आम्हांसी । पुंढतपुढती ॥ ९४ ॥ तरी सांग पां अर्जुना । तुजपासूनि स्थिति या त्रिभुवना । हे अनादि विश्वरचना । तें लटकें कायी ।। ९५ ।। एथ समर्थ एक आथी । तयापासूनि भूतें होती । तरी हैं वायांचि काय बोलती । जगामाजीं ॥ ९६ ॥ हो कां सांप्रत ऐसे जाहलें । जे हैं जन्मे तुवां सृजिलें । आणि नाशु पावे नाशिलें । विचारी पां ॥ ९७ ॥ तूं भ्रमपणें अहंकृति । यांसि घातु न धरिसी चित्तीं । तरी सांगें कायि हे होती । चिरंतन ॥ ९८ ॥ कीं तूं एक वधिता । आणि सगळ लोकु हा मरता । ऐसी भ्रांति झणें चित्ता । येवों देसी ॥ ९९ ॥ अनादिसिद्ध हैं आघवें । होत- जात स्वभावें । तरी तुवां कां शोचावें । सांगें मज ॥ १०० ॥ परी मूर्खपणे नेणसी । न चिंतावें तें चिंतिसी । आणि तूंचि नीति सांगसी । आम्हांप्रति ॥ १ ॥ देख विवेकी जे होती । ते दोहींतेंही न शोचिती । जें होयजाय हे भ्रांती | म्हणऊनियां ॥ २ ॥ आणि तुला आम्ही शिकवायला जावें, तर तूं नीतीच्या मोठमोठ्या बाता करितोस ! ९२ आधींच जन्मांध, त्यांत लागावे वेड, म्हणजे तें माणूस जसे वारेमाप धांवतें, तसेंच तुझें शहाणपण बोकाळलेले दिसतं. ९३ तुला स्वतःचें कांहीं कळत नाहीं, तरीपण कौरवांसंबंधें शोक करण्याचं तूं मनांत आणितास, याचे आम्हांला राहूनराहून आश्चर्य वाटते ! ९४ तर मग, बात्रा अर्जुना, मला आतां सांग, कीं, जर तुझ्यामुळेच हें त्रिभुवन स्थिरस्थावर असेल, तर ' ही विश्वाची रचना अनादि आहे, ' असें जें म्हणतात, तें खोटेंच कीं काय ? ९५ ' येथे कोणी तरी एक सर्वसमर्थ आहे, आणि त्याच्यापासून हीं भूतें उद्भवतात,' असें जें जगांत म्हणतात, तें सर्व बाष्कळच ना ? ९६ का आजमितीस असें झाले आहे, कीं, तूं उत्पन्न केलेंस, तरच है विश्व जन्माला यावें, आणि तूंच याचा नाश केलास, तरच तें नाशांवें ? बाबा, याचा विचार कर पाहू. ९७ तूं भ्रमानें अहंकारी झाला आहेस, आणि यांचा घात करण्याचे तुझ्या मनाला आवडत नाहीं, पण तूं यांचा घात केला नाहींस तरी हे चिरंजीव होतील काय ? याचे उत्तर दे पाहू. ९८ किंवा, तूं एकटाच मारणारा, आणि हा समग्र लोक मरणारा, अशी भ्रामक कल्पना तूं आपल्या मनांत येऊ दिली आहेस कीं काय ? ९९ हैं विश्व अनादिसिद्ध आहे; हे सृष्टिनियमानेच उत्पन्न होते व लयास जातें. मग याबद्दल तूं शोक कां करावास, ते मला सांग बरं ? १०० परंतु मूर्खपणामुळे तुला स्वतःला कांहीं कळत नाहीं, नसतीच चिंता करीत बसतोस, आणि उलट आम्हांलाच नीतीचे पाठ सांगतोस ! १ अर्जुना, हें लक्षांत वे, कीं, जे खरे खरे विवेकी आहेत, ते, 'झालें गेलें ' ही केवळ भ्रान्ति आहे, म्हणून त्या दोहोंचाही शोक करीत नाहींत. २ १ आपले स्वरूप, आत्मल, २ वारंवार, पुन्हा पुन्हां.