पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३८ सार्थ श्रीज्ञानेश्वरी तमुवाच हृषीकेशः प्रहसन्निव भारत। सेनयोरुभयोर्मध्ये विषीदंतमिदं वचः ॥ १० ॥ सम•-- त्यातें बोले हृषीकेश करूनी मुख हांसतें । विषादयुक्ताप्रति हें बोले सैन्यद्वयामधें ॥ १० ॥ आर्या - दोन्ही सेनेमध्ये यापरि सविषाद देखुनी पार्थ । बोले हास्य करूनी मधुसूदनजी प्रगल्भरूपार्थ ॥ १० ॥ ओवी - हांसोनियां देव । अर्जुनास सांगे भाव । विषाद सांडावा हांव । उपदेश करी ॥ १० ॥ मग आपुलां चित्तीं म्हणे । एथ हें कायी आदरिलें येणें । अर्जुन सर्वथा कांहीं नेणे । काय कीजे ॥ ८४ ॥ हा उमजे आतां कवणेपरी । कैसेनि धीरु स्वीकरी | जैसा ग्रहोंतें पंचाक्षरी । अनुमानी कां ॥ ८५ ॥ ना तरी असाध्य देखोनि व्याधि । वैद्य सूची निरवधि । अमृतासम दिव्य औषधि । निदानींची ॥ ८६ ॥ तैसें विवरीतु असे श्रीअनंतु । तया दोहीं सैन्यांआंतु । जयापरी पार्थ । भ्रांति सांडी ॥ ८७ ॥ तें कारण मनीं धरिलें । मग सरोप बोलों आदरिलें । जैसें मातेच्या कोपी थोकुलें । स्नेह आधी ॥ ८८ ॥ कीं औपधाचिया कडवटपणीं । जैसी अमृताची पुरवणी । ते आहांच न दिसे परी गुणीं । प्रकट होय ॥ ८९ ॥ तैसीं वरिवरि पाहतां उदासें । आंत तरी अतिसुरसें । तियें वाक्यें हृषीकेशें । वोलों आदरिलीं ॥ ९० ॥ श्रीभगवानुवाच— अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे । गतासूनगतासुंश्च नानुशोचंति पंडिताः ॥ ११ ॥ सम० -- अयोग्य शोक करिसी आणि पांडित्य बोलसी । शोक मेल्याजित्यांचाही न करीतीच पंडित ॥ ११ ॥ आर्या- करुनी अशोच्यविषयीं शाकार्ते वदसि सुज्ञवादातें । अगतासुगता तें करिती पंडित कदा न खेातें ॥११॥ ओंवी—अशोच्यांतें शोचणें । जाणिवेचे बहु बोलणें । गेलियामेलियांचं दुःख करणें । न करितीच पंडित ॥ ११ ॥ मग अर्जुनातें म्हणितलें । आम्ही आजि हैं नवल देखिलें । जें तुवां एथ आदरिलें । माझाचि ॥ तूं जाणता जरि म्हणविसी । ९१ ॥ 66 मग भगवन्त आपल्या मनाशींच म्हणूं लागले, या वेड्या अर्जुनानें हें काय मांडिलें आहे ! याला आपण काय करावें हें तिळमात्र कळत नाहीं ! ८४ आतां याची समजूत कोणत्या रीतीनें पडेल ? सुटलेला धीर हा पुन्हां कसा धरील ? " - अशा प्रकारें, जसा एकादा पंचाक्षरी मांत्रिक पीडा करणाऱ्या भूताविषयीं धोरण बांधतो, ८५ किंवा रोग असाध्य आहे, असें जाणून, जसा एकादा वैद्य झटपट, अगदी आणीबाणीच्या प्रसंगीं योजण्याच्या' अमृतासारख्या अलौकिक गुणकारी औषधीची योजना करितो, ८६ तसेच भगवान् श्रीकृष्ण, त्या दोन सैन्यांमध्ये उभे राहून, मनांतल्या मनांत या प्रसंगाचा खल करूं लागले, आणि नंतर ज्या रीतीनें अर्जुन या मोहाला झिडकारील, ८७ तिची मनांत योजना करून, जरा रागानंच बोलण्यास आरंभ करिते झाले. जसे आईच्या रागांत वात्सल्य झांकलेले असतें, ८८ किंवा औषधाच्या कडवटपणांत अमृताचा सांठा गुप्त असतो, कारण तें अमृत वरवर दिसत नाहीं, परंतु परिणामी मात्र अनुभवास येतें, ८९ तशींच श्रीकृष्णांनी, वरून भासण्यांत पाणउतारा करणारी, परंतु आंतमध्यें अत्यन्त मधुर रसानें भरलेली, अशीं वचनें बोलण्यास प्रारंभ केला. ९० मग ते अर्जुनाला म्हणाले, " हें तूं आज मध्येच जें मांडिलें आहेस, त्याचें आम्हांला खरोखरच नवल वाटतं. ९१ तूं आपल्याला जाणता म्हणवितोस, तरी पण अज्ञानाला सोडीत नाहींस; १ भुताला. २ योजतो, शोधून काढतो. ३ झांकलेलें, ४ अन्तःस्थ सांठवण, पूरण. ५ वरवर, उघड,