पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय दुसरा ३७ म्हणोनि तो पार्थ । मोहफणिग्रस्तु । म्यां म्हणितला हा हेतु । जाणोनियां ॥ ७४ ॥ मग देखा तेथ फाल्गुन । घेतला असे भ्रांती कवळूनु । जैसा घनपडळीं भानु । आच्छादिजे ।। ७५ ।। तयापरी तो धनुर्धरु । जाहला दुःखें जर्जरु। जैसा ग्रीष्म- काळीं गिरिवरु । वणवला कां ॥ ७६ ॥ म्हणोनि सहजें सुनीळु । कृपामृतें सजळु । तो वोळला श्रीगोपाळु | महामेघु ॥ ७७ ॥ तेथ सुदर्शनांची द्युति । तेचि विद्युलता झळकती । गंभीर वाचा ते ओयती । गर्जनेची ॥ ७८ ॥ आतां तो उदार कैसा वरुपैल । तेणें अर्जुनाचल निवेल | मग नवी विरूंडी फुटेल | उन्मेपाची ॥ ७९ ॥ ते कथा आइका । मनाचिये आराणुका । ज्ञानदेव म्हणे देखा । निवृत्तिदासु ॥ ८० ॥ संजय उवाच- एवमुक्त्वा हृषीकेशं गुडाकेशः परंतप । न योत्स्य इति गोविंदमुक्त्वा तूष्णीं बभूव ह ॥ ९॥ सम०—परंतप गुडाकेश हृषीकेशासि बोलिला । न करीं युद्ध गोविंदा म्हणोनि राहिला उगा ॥ ९॥ आर्या-यापरि वदतां वदतां वरिलें मोनें तदा गुडाकेशा न करीं गोविंदा मी युद्ध असें बोलुनी हृषीकेशा ||९|| ओवी - संजय म्हणे धृतराष्ट्रासी । ऐसें अर्जुन बोलला श्रीकृष्णासी । युद्ध न करीं मी तयांसी । म्हणूनि उगाच राहिला ऐसें संजयो असे सांगतु । म्हणे राया तो पार्थ । पुनरपि शोका- कुळितु | काय बोले ॥ ८१ ॥ आइकें सखेदु बोले श्रीकृष्णातें । आतां नाळ- वावें तुम्हीं मातें । मीं सर्वथा न झुंजें एथें । भरंवमेी ॥ ८२ ॥ ऐसें येकि हे बोलिला । मग मौन धरूनि ठेला । तेथें श्रीकृष्ण विस्मो पावला । देखोनि तयातें || ८३ ॥ ध्यानांत घेऊन, ' तो अर्जुन महामोहरूपी काळसर्पानें ग्रासून गेला, ' असें मीं वर्णिले आहे. ७४ मग त्या वेळीं, जसा मेघांच्या पडळानें सूर्य झांकला जावा, तसा तो अर्जुन भ्रमानें ग्रस्त झाला. ७५ किंवा उन्हाळ्यांत जसा पर्वताला वणवा लागून तो होरपळावा, तसाच अर्जुन दुःखानं जर्जर होऊन गेला. ७६ म्हणून त्याला शांतविण्याकरितां तो सहज सांवळा कृपामृतानें ओथंबलेला श्रीगोपालकृष्णरूपी महामेघ त्याच्याकडे वळला. ७७ या मेघाला शोभिवंत दांतांची प्रभा तीच लखलखणारी वीज शोभली, आणि गंभीर वाणी ही गर्जनेची चाल भासली. ७८ आतां हा करुणामेघ उदारपणे कसा करुणावर्षाव करणार, आणि त्या वर्षावानें अर्जुनरूपी पेटलेला पर्वत कसा शांत होणार, आणि मग ज्ञानाचे नवे अंकुर कसे फुटणार, ७९ ती कथा आतां स्वस्थ चित्तानें श्रवण करा, असें श्रीनिवृत्तिनाथांचा दास ज्ञानदेव म्हणत आहे ८०. संजय धृतराष्ट्राला असें म्हणाला, कीं, " तो अर्जुन पुन्हां शोकाने कळवळून बोलता झाला कीं, ८१ 'कृष्णजी, आणखी एकदां श्रवण करावें. माझी पुन्हां समजूत घालण्याच्या भरीस तुम्हीं पडूं नये, कारण मी निःसंशय सांगतों कीं, कांहीं झालें तरी मी युद्ध करणार नाहीं ! १८२ असें एकदम तो तोयाने बोलला, आणि मग अगदीं मुकाट्यानें राहिला. त्याची ही अवस्था पाहून श्रीकृष्ण आश्चर्यचकित होऊन गेले ८३. १ सामग्री. २ पालवी, कोंब. ३ ज्ञानाची. ४ स्वस्थतेनें. ५ एक वेळ, एकदम.