पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३६ साथ श्रीज्ञानेश्वरी आर्या- न दिसे शोक हरीर्ते शोषे जो इंद्रियें महा प्राज्य। जरिही पद इंद्रार्चे मिळेल असपत्नभूमिचें राज्य ॥ ८ ॥ ओवी - न दिसे जें ऐसें शोक नाशी । शोक तो शोषक इंद्रियांसी । पावलिया त्रिदशैद्रलक्ष्मीसी । तरी सुख न पर्ने मी ८ हें सकळ कुळ देखोनि । जो शोकु उपनलासे मनीं । तो तुझिया वाक्यावांचुनी । न जाय आणि ॥ ६४ ॥ एथ पृथ्वीतळ आपु होईल । हैं महेंद्रपदही पाविजेल | परी मोह हा न फिटेल । मानसींचा ॥ ६५ ॥ जैसी सर्वथा वीजें आहाळलीं । तीं सुक्षेत्रीं जन्ही पेरिलीं । तरी न विरूद्धती सिंचलीं । आवडे तैसीं ॥ ६६ ॥ ना तरी आयुष्य पुरलें आहे । तरी औपधें कांहीं नोहे । एथ एकचि उपेगा जाये । परमामृत ॥ ६७ ॥ तैसें राज्यभोग- समृद्धी | जीवन नोहे इये बुद्धी । एथ जिव्हाळा कृपानिधि । कारुण्य तुझें ॥ ६८ ॥ ऐसें अर्जुन तेथ बोलिला । जंव क्षणएक भ्रांती सांडिला । मग पुनरपि व्यापिला । उँर्मी तेणें || ६९ || कीं मज पाहतां उमीं नोहे । हें अना- रिसें गमत आहे । तो ग्रसिला महामोहें । काळसर्पे ॥ ७० ॥ संव हृदय - कैल्हारीं । तेथ कारुण्य वेळेच्या भरीं । लागला म्हणोनि लहरी । भांजेचि ना ॥ ७१ ॥ हें जाणोनि ऐसी प्रौढी । जो दृष्टिसवेंचि विप फेडी । तो धांवया श्रीहरी गारुडी । पातला कीं ॥ ७२ ॥ तैसिया पांडुकुमरा व्याकुळा | मिर- वतसे श्रीकृष्ण जवळा । तो कृपावरों अवलीळा । रक्षील आतां ॥ ७३ ॥ हा समस्त गोतावळा पाहून माझ्या मनांत जो शोक उसळला आहे, तो तुमच्या वचनावांचून दुसऱ्या कशानेही दूर होणार नाहीं. ६४ आतां जरी सर्व भूतलाचें स्वामित्व आम्हांला मिळालें, किंवा प्रत्यक्ष स्वर्गीचं इंद्रपद प्राप्त झाले, तरीही हें मनाचें दुःख शमणार नाहीं. ६५ ज्याप्रमाणें भाजून काढलेले बीं सुपीक जमिनींत पेरले आणि त्यास पाहिजे तेवढे पाण्याचें शिंपणे दिलें, तरी त्याला मोड येत नाहीं, ६६ किंवा आयुष्यच संपल्यावर जसा कोणत्याही औषधाचा उपयोग होत नाहीं, तेथें अमृतवल्लीचात्र मात्र गुण लागू पडणार, ६७ त्याप्रमाणंच राज्यभोगसमृद्धीनें आमच्या बुद्धीचें पुन्हां संजीवन होणार नाहीं; ती जीवन्त होण्याला, हे कृपासागरा, तुमच्या कारुण्याचीच आवश्यकता आहे. " ६८ एक क्षणभर भ्रांतीच्या तडाख्यांतून सुटलेला अर्जुन अशा रीतीनें बोलला, पण लागलीच पुन्हां त्याला पूर्वीची लहर आली. ६९ अथवा, जरासा विचार करून पाहतां मला वाटतें, ही नुसती भ्रांतीची लहर नव्हती, तर हें प्रकरण जरा वेगळेंच होते. तो प्रत्यक्ष महामोहरूपी काळ- सर्पानंच ग्रासून गेला ! ७० आणि त्याचें अगदीं नाजूक हृदयकमळ करुणरसाने ओतप्रोत भरून गेलें असतां हा दंश झाल्यामुळे, या विषवेगाच्या लहरी थांबतच नहत्या. ७१ हा प्रकार पाहून, केवळ नजर टाकूनच विष उतरणारा, अशी ज्याची थोरवी होती, तो श्रीकृष्णरूपी गारुडी त्याच्या रक्षणार्थ धांवतच येऊन ठेपला. ७२ अशा रीतीनें व्याकुळ झालेल्या अर्जुनाजवळच श्रीकृष्ण शोभत होता व तो आपल्या कृपेच्या योगानें त्याचं सहज रक्षण करील. ७३ म्हणून, हा सर्व एकंदर प्रसंग १ प्रोत्साहन. २ बुद्धीला ३ लाटेने, उसळीने ४ निराळे ५ नाजूक जिव्हाळ्याच्या हृदयकमलांत ६ बेताल अवस्था, ७ उतरी. ८ सहज,