पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय दुसरा कार्पण्यदोषोपहतस्वभावः पृच्छामि त्वां धर्मसंमूढचेताः ॥ यच्छ्रेयः स्यान्निश्चितं ब्रूहि तन्मं शिष्यस्तेहं शाधि मां त्वां प्रपन्नं ॥ ७ ॥ सम० - या धर्माच्या संकटीं दीन झालों । तूंनं कृष्णा शरणप्राय आलों ॥ जे कल्याण स्वामिनें तें वदावें । या शिष्यातें शासनं वागवावें ॥ ७ ॥ ३५ आय - कार्पण्यदोषहत मी शरणागत शिष्य धर्मसंमूढ । पुसतों श्रेय सुनिश्चित शिक्षावं मज असेल जं गूढ ७ ओवी - मज देहीं असे भ्रम । म्हणोनि तुम्हां पुसें धर्म । मज सुखाचा असंभ्रम । श्रेय तें मज सांगिजे ॥ ७ ॥ आम्हां काय उचित । तें पाहतां न स्फुरे एथ । जे मोहें येणें चित्त । व्याकुळ माझें ॥ ५५ ॥ तिमिरावरुद्ध जैसें । दृष्टीचें तेज भ्रंशे । मग पासींच असतां न दिसे । वस्तुजात ॥ ५६ ॥ देवा तैसें मज जाहलें । जे मन हैं भ्रांती ग्रासिलें । आतां काय हित आपुलें । तेंही नेणें ॥ ५७ ॥ तरी श्रीकृष्णा तुवां जाणावें । निकें तें आम्हां सांगावें । जे सखा सर्वस्व आघवें । आम्हांसि तूं ॥ ५८ ॥ तूं गुरु बंधु पिता । तूं आमची इष्ट देवता । तूंचि सदा रक्षिता । आपदीं आमुतें ॥ ५९ ॥ जैसा शिष्यांतें गुरू । सर्वथा नेणें अव्हेरू । कीं सरितांतें सागरू । त्यजी केवीं ॥ ६० ॥ ना तरी अपत्यातें माये । सांडूनि जरी जाये | तरी तें कैसेनि जिये । आइकें कृष्णा ॥ ६१ ॥ तैसा सर्वापरी आम्हांसी । देवा तूंचि एक आहामी । आणि बोलिलें जरी न मनिमी । मागील माझें ॥। ६२ ॥ तरी उचित काइ आम्हां । जें व्यभिचरेना धर्मा । तें झडकरी पुरुषोत्तमा । सांगें आतां ॥ ६३ ॥ न हि प्रपश्यामि ममापनुद्याद्यच्छोक मुच्छोपणमिंद्रियाणाम् । अवाप्य भूमाव सपत्नमृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम् ॥ ८ ॥ सम - न लें दिसे जं मम शोक नाशी । जो शोक हा शोषक इंद्रियांसी ॥ समृद्ध राज्य त्रिदशैद्रलक्ष्मी । पावेन येथे न तरी सुखी मी ॥ ८ ॥ आम्हांला कोणतं करणें साजेल, याचा विचार करूनही समज होत नाहीं, कारण या मोहानें माझ्या मनाला ग्रासिलें आहे. ५५ जसें अंधाराने ग्रासलेल्या दृष्टीचं तेज नष्ट होतें, आणि मग जवळचेही वस्तुमात्र दिसत नाहींसे होते, ५६ तसे, देवा, मला झाले आहे. कारण हें मन भ्रांतीच्या भोवऱ्यांत सांपडले आहे, आणि आतां, आपले हित काय, हेही त्यास कळत नाहींसें झालें आहे. ५७ म्हणून, हे श्रीकृष्णा, तुम्ही हे सर्व विचाराने जाणा, आणि यांत चांगलं कोणतं तें आम्हांला सांगा, कारण आमचा सखा, आमचं सर्वस्व, तुम्हीच आहां. ५८ तुम्हीच आमचे गुरु, बंधु, पिता, इष्ट देवता, आणि संकटांत रक्षण करणारे, आहां. ५९ शिष्याचा अव्हेर गुरु कधींच करीत नाहीं. समुद्रानं कधीं नद्यांचा कंटाळा केला आहे का ? ६० किंवा जर आईनें हेळसांडीने मुलास टाकून दिले, तर ते कसे बरे जीवन्त राहील ? अहो श्रीकृष्णा, हे सावधानपणे ऐका ६१ वरील उदाहरणा- प्रमाणंच, देवा, आपण एकटेच आम्हांस सर्वपरीने संगोपिते आहां आणि म्हणून जर माझें मघांचं बोलणें तुमच्या मनास पटत नसेल, ६२ तर जे आम्हांस योग्य असेल व जें धर्ममर्यादा मोडणार नाहीं, असे तत्त्व हे पुरुषोत्तमा, मला त्वरित सांगावें. ६३ १ जवळन. २ जंगल. ३ विरुद्ध नसेल.