पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३४ सार्थ श्रीज्ञानश्वरी असतु येथवर । भिक्षा मागतां भली ॥ ४६ ॥ ना तरी देशत्यागें जाइजे । कां गिरिकंदर सेविजे । परी शस्त्र आतां न धरिजे । इयांवरी ॥ ४७ ॥ देवा नवनिशतीं शरीं । वांवरोनी यांच्या जिव्हारीं । भोग गिवसावे रुधिरीं । बुडाले जे ॥ ४८ ॥ ते काढूनि काय किजती । विलिप्त केवीं सेविजती । मज न ये हे उपर्धेत्ति । याचिलागीं ॥ ४९ ॥ ऐसें अर्जुन तिये अवसरीं । म्हणे श्रीकृष्णा अवधारीं । परी तें मना नयेचि मुरारी । आइकोनियां ॥ ५० ॥ हैं जाणोनि पार्थ विहाला । मग पुनरपि बोलों लागला । म्हणे देवो कां चित्त या बोला | देतीचि ना ॥ ५१ ॥ न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः ॥ यानेव हत्वा न जिजीविषामस्तेऽवस्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः ॥ ६ ॥ सम - आम्ही जिंकों बरवें हेंचि आम्हां । किंवा जाऊं मेलिया मोक्षधामा ॥ दोन्ही नेणों यांस मारूं तथापि । वांचूं आम्हीं हें न इच्छूचि पापी ॥ ६ ॥ आर्या - जय की अपजय बरवा झाला आम्हांसि हाचि संदेह । ते धार्तराष्ट्र ठेले त्यागावा त्यांचिया वर्धे देह ||६|| ओवी - अधिक उणें होईल कोणा । जयो त्यां कीं आपणा । कौरव मारूनियां जाणा । काय जीवित्व आमुचें ६ येन्हवीं माझ्या चित्तीं जें होतें । तें मी विचारूनि बोलिलों एथें । परी निकें काय यापरौतें । तें तुम्ही जाणा ॥५२॥ पैं वीरुं जयांसीं ऐकिजे । आणि या बोलींचि प्राणु सांडिजे । तें एथ संग्रामव्याजें । उभे आहाती ॥ ५३ ॥ आतां ऐसेयांतें वधावें । कीं अव्हेरूनियां निघावें । या दोहींमाजी काइ बरवें । तें नेणों आम्ही ॥ ५४ ॥ विचार इतका भयंकर आहे, तेव्हां ते सुखभोग दूरच राहोत ! त्यांच्यापेक्षां येथें भीक मागून निर्वाह करणें निःसंशय चांगलं आहे. ४६ किंवा देशत्याग करून जावें, अथवा गिरिकपाटीं वनवास पत्क- रावा, परंतु यांच्यावर शस्त्र उगारण्याचें दुष्कर्म करूंच नये. ४७ देवा, नव्या पाजवलेल्या बाणांनी यांच्या जिव्हाळीवर आघात करावा, आणि यांच्या रक्तांत बुडालेले जे भोग आम्ही मिळवावे, ४८ त्या भोगांना घेऊन काय करावयाचें आहे ? ते रक्ताने माखलेले भोग कसे आनंद देतील ? याच कारणास्तव ही विचारसरणी मला मान्य होत नाहीं. " ४९ त्या वेळीं असें बोलून अर्जुनानें श्रीकृष्णांना ' लक्षांत आलें ना ? ' म्हणून विचारिलें, पण कृष्णांनीं तें ऐकिलें तरीही त्यांच्या मनास पटना. ५० हे ध्यानांत आल्यावर मात्र अर्जुन बराच गडबडला, आणि मग पुन्हां म्हणूं लागला, कीं, भगवान् श्रीकृष्ण माझ्या भाषणाकडे मुळीं लक्षच देत नाहीं, याचें कारण काय ? " ५१ " पण, देवा, माझ्या मनांत जं होतें तें मी मोकळेपणाने विचारपूर्वक बोललों आहे, आतां खरें तत्त्व जर याहून वेगळें असेल, तर तें तुम्हांलाच माहीत. ५२ ज्यांच्याबरोबर आमचें वैर आहे, असं ऐकताक्षणीच आम्हीं खरोखरच प्राणत्याग करावा, तेच येथें युद्धाच्या निमित्तानें आमच्यासमोर उभे आहेत. ५३ तेव्हां आतां या अशांनाही आम्हीं मारावें, किंवा यांना टाळून जावें, या दोहोंमध्ये अधिक चांगलं कोणतं, तें आम्हांला कळत नाहीं. ५४ १ नवीन पाजविल्या. २ प्रहार करून. ३ कवटाळावे, उपभोगावे. ४ पूर्वापरसंगति, ५ मुरारीला