पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय दुसरा ३३ चिया कृपा लाहिजे वरु । तेथेंचि मनें व्यभिचारु । तरी काय मी भस्मासुरु | अर्जुन म्हणे ॥ ३८ ॥ गुरूनहत्वा हि महानुभावान्श्रेयो भोक्तुं भैश्यमपीह लोके । हत्वार्थकामांस्तु गुरूनिंहैव भुंजीय भोगान् रुधिरप्रदिग्धान् ॥ ५ ॥ सम० - न मारितां यां वडिलां गुरूं । भिक्षा खाणें वाटतें श्रेय मातें ॥ धनार्थि डे मारुनि याच लोकीं । भोगूं रक्तं भोग माखूनियां कीं ॥ ५ ॥ आर्या - सुमहानुभाव गुरुसी न वधुनि उदरार्थ भैक्ष्य मागावें । न स्वार्थकाम गुरुच्या हनने रुधिरात राज्य भोगावें ॥ ५ ॥ ओंवी - गुरु वधोनि राज्य करणें । त्याहून बरें भिक्षा मागणे । वडील वधोनि भोग भोगणें । ते रुधिरयुक्त भाग जान पां ॥ ५ ॥ देवा समुद्र गंभीर आइकिजे । वरी तोही आहाच देखिजे । परी मनी नेणिजे । द्रोणाचिये ॥ ३९ ॥ हें अपार जें गगन | वरी तयाही होईल मोन । परी अगाध भलें गहन । हृदय याचें ॥ ४० ॥ वरी अमृतही विटे । कीं काळवरों वज्रही फुटे । परी मनोधर्मु न लोटे | विकरविलाही ॥ ४१ ॥ स्नेहालागीं माये । म्हणिपे तें कीरु होये । परी कृपा ते मूर्त आहे । द्रोणीं इये ॥ ४२ ॥ हा कारुण्याची आदि । सकल गुणांचा निधि | विद्यासिंधु निरधि । अर्जुन म्हणे ॥ ४३ ॥ हा येणं मानें महंतु । वरी आम्हांलागीं कृपावंतु । आतां सांग पां येथ धातु । चिंतूं येईल ॥ ४४ ॥ ऐसे हे रणीं वधावे । मग आपण राज्यमुख भोगावें । तें मना न ये आघवें । जीवितेंसीं ॥ ४५ ॥ हें येणें मानें दुर्भर । जे यांहीहुनी भोग सधर । ते ज्यांच्या कृपाप्रसादाचा वर मी मिळवावा, त्यांचेच अनिष्ट मी चिंतावें, असा मी काय भस्मासुर आहे कीं काय ? " याप्रमाणें अर्जुन बोलला. ३८ अर्जुन पुढे म्हणाला, “देवा, समुद्र फार गंभीर आहे, असें ऐकण्यांत येते; परंतु समुद्राचेंही गांभीर्य देखाव्यापुरतेच आहे. पण या द्रोणाचार्याच्या मनाचे गांभीर्य इतकें विलक्षण आहे, कीं, त्याचा कधींच क्षोभ होत नाहीं. ३९ है आकाश अफाट तर खरेंच, तरी त्याचेंही माप करितां येईल, परंतु या द्रोणाचार्याच्या खोल हृदयाचा अन्त लागणार नाहीं. ४० कदाचित् अमृताचीही चव फिकी होईल, किंवा कालगतीनें वज्रालाही भेग पडेल, परंतु द्रोणाचार्यांच्या मानसिक शांतिधर्माला विकृत करणें घडणार नाहीं. ४१ प्रेमळपणाचा विचार करितांना आईचं नांव मुख्यत्वाने पुढे यावें, हें योग्यच आहे, परंतु द्रोणाचार्य हे प्रत्यक्ष मूर्तिमंत प्रेमळपणाच आहेत. ४२ कारुण्य यांच्यापासून जन्माला आलं. हे सर्व सद्गुणांचे सांठेच आहेत. हे विद्यांचे अमर्याद समुद्र म्हणावे. " असें अर्जुन बोलला. ४३ नंतर तो आणखी म्हणाला, 46 ह्या आचार्याची अशी थोरवी आहे, शिवाय आमच्या- र त्यांची विशेष कृपा आहे; मग, यांचा घात आम्हांला चिंतितां येईल का, सांग पाहू ? ४४ अशांना रणांत मारावं, आणि मग आम्हीं राज्यसुख उपभोगावें, ही सारी कल्पना, प्राण गेला तरी, माझ्या मनाला मानवणार नाहीं. ४५ या आचार्यापेक्षांही सुखभोगांना जास्त महत्त्व आहे, हा १ मापणी २ त्याच्या वृत्तीत विकार उत्पन्न करण्याचा प्रयत्न झाला असतांही. ३ अपार, ५ ह्या