पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३२ सार्थ श्रीज्ञानेश्वरी जाण । क्षत्रियासी ॥ २८ ॥ ऐसेनि तो कृपावंतु । नानापरी असे शिकवितु । हैं ऐकोनि पांडुसुतु । काय बोले ॥ २९ ॥ अर्जुन उवाच- कथं भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन । इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हावरिसूदन ॥ 8 ॥ सम० - भीष्मासी मी कसा भांडूं द्रोणासी मधुसूदना । ज्यां पूज्यांसी बोलवेना बाणी हाणों तयां कसा ॥४॥ आर्या-पार्थ म्हणे म्यां ज्यांच्या सन्निध बंदोनि हस्त जोडावे । त्या भीष्म द्रोणावरि केसे बाण प्रचंड सोडावे ॥४॥ अवी-पार्थ म्हणे मधुसुदना । भीष्मद्रोणांकडे वडीलपणा । पूजावया जाणा । बाणीं केंवी मारूं तय ॥ ४ ॥ देवा हे येतुलेवरी । बोलावें नलगे अवधारीं । आधीं तूंचि विचारी । संग्राम हा ॥ ३० ॥ हें झुंज नव्हे प्रमादु । एथ प्रवर्तलिया दिसतसे वाधु । हा उघड लिंगभेदु । वोढवला आम्हां ।। ३१ ।। देखें मातापितरं अर्चिजती । सर्वस्वें तोप पावविजति । तियें पाठीं केवीं वधिजती । आपुलिया हातीं ॥ ३२॥ देवा संतवृंद नमस्कारिजे । कां घडे तरी पूजिजे । हें वांचूनि केवीं निंदिजे । स्वयें वाचा ॥ ३३ ॥ तैसे गोत्रगुरु आमुचे । हे पूजनीय आम्हां नियमाचे । मज बहुत भीष्मद्रोणांचें । वर्ततसे ॥ ३४ ॥ जयांलागीं मनें वीरुं । आम्ही स्वनींही न शकों धरूं । तयां प्रत्यक्ष केवीं करूं । घातु देवा ॥ ३५ ॥ वरी जळो हें जियालें । एथ आघवेयांसि काय जाहलें । जे यांच्या वधीं अभ्या- सिलें | मिरविजे आम्हीं ॥ ३६ ॥ मी पार्थ द्रोणाचा केला । येणें धनुर्वेदु मज दिधला । तेणें उपकारें काय आभारैला । वधीं तयातें ॥ ३७ ॥ जेथीं- ठेवतां कामा नये; असा संबंध ठेवणें म्हणजे तो क्षत्रियाचा रणामध्ये अधःपातच गणावा. ' २८ या प्रकारें ते कृपालु भगवन्त अर्जुनाची नानापरींनीं समजूत करिते झाले. मग हें ऐकून पांडुपुत्र अर्जुन काय म्हणाला तें श्रवण करा. २९ I 'देवा, इतकं बोलण्याचे येथे प्रयोजनच नाहीं. तुम्हीं लक्ष द्या, आणि आधीं या संग्रामाच्या स्वरूपाचा तुम्हीच विचार करा. ३० अहो, हें युद्धच नव्हे, तर केवळ पाप आहे, हें केलें तर मोठाच दोप आम्हांला लागेल. यांनं देवताभंगाचे महापातक उघड उघड आम्हांस घडणार आहे. ३१ देवा, विचार करा. मातापितरांना पूज्य मानावं, त्यांचा सर्वस्वी संतोष राखावा, अशी नीति ठाऊक असतां त्याच मातापितरांचा वध आपल्या हातानें कसा करावा ? ३२ देवा, संतमंडळीला वंदन करावें, साधल्यास त्यांची पूजा-अर्चाही करावी; मग असें कांहींच न करितां, उलट आपल्या वाचेने स्वतांच त्यांना निंदावे काय ? ३३ त्याप्रमाणेच हे आमचे गोत्रगुरु तर आम्हांला नेहमींचेच पूज्य. या द्रोणांपासून मला बहुमोलाचा लाभ घडला आहे. ३४ ज्यांच्या विरुद्ध स्वप्नांतसुद्धां आम्हीं वैरवृत्ति धारण करूं शकत नाहीं, त्यांचाच देवा, आम्ही येथे प्रत्यक्ष वध कसा करावा ? ३५ यापुढे जगण्यांत मुळींच शोभा नाहीं. आज सर्वांना झाले आहे तरी काय, कीं या गुरुजनापासून आम्हीं जं शिकली, त्याची प्रौढी आम्ही आज यांनाच मारण्यासाठीं मिरवीत आहों ? ३६ अंगीं आज जे कांहीं गुण आहेत, त्यांचं सर्व श्रेय या द्रोणाचार्यास आहे. यांनीच मला धनुर्विद्या शिकविली. मग त्या उपकाराचा भार डोक्यावर वाहून मी यानांच मारूं काय ? ३७ १ पूज्य जनांचा उच्छेद केल्याचा दोष, २ जगणें. माझ्या