पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय दुसरा ३१ कारुण्य तुझें ॥ १८ ॥ हां गा तूं जाणता । तरी न विचारिसी कां आतां । सांगें जुंझावेळे सदयता । उचित कायी ॥ १९ ॥ हें असतिये कीर्तीसी नाशु । आणि पारत्रिकोंसि अपभ्रंशु । म्हणे जगन्निवासु । अर्जुनातें ॥ २० ॥ क्लैब्यं मास्मगमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते । क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परंतप ॥ ३ ॥ सम- पार्था षंढ नको होऊं तुज योग्यचि हैं नव्हे । ऊठ टाकूनियां तुच्छ लंडीपण परंतप ॥ ३ ॥ आर्या- उचित क्लीबत्व नव्हे निजशौर्याची नको करूं तूट । क्षुद्र मनोदौर्बल्या स्यजुनी पार्था परंतपा ऊठ ॥ ३ ॥ ओंवी - नपुंसकपण न धरीं मनीं । तुज योग्य नव्हे जाणोनी । क्षुद्र टाकीं हृदयींहुनी । ऊठ त्वरित युद्धासी ॥ ३ ॥ म्हणोनि शोकु न करीं । तूं पुरता धीरु धरीं । हे शोच्यता अव्हेरीं । पांडुकुमरा ॥ २१ ॥ तुज नव्हे हैं उचित । येणें नासेल जोडलें बहुत । तूं अनि हित । विचारी पां ॥ २२ ॥ येणें संग्रामाचेनि अवसरें । एथ कृपाळू- पण नुपकरे | हे आतांचि काय सोयरे । जाहले तुज ॥ २३ ॥ तूं आधींच काय नेणसी । कीं हे गोत्रज नोळखसी । वायांचि काय करिसी । अतिशो आतां ॥ २४ ॥ आजिचें हैं झुंज | काय जन्मा नवल तुज । हें परस्परें तुम्हां व्याज | सदांचि आधी ॥ २५ ॥ तरी आतां काय जाहलें । कायी स्नेह उप- नलें । हें नेणिजे परी कुंडें केलें । अर्जुना तुवां ॥ २६ ॥ मोह धरिलिया ऐसें होईल । जे असती प्रतिष्ठा जाईल । आणि परलोकही अंतरेल । ऐहिकेंसी ॥ २७ ॥ हृदयाचें ढिलेपण । एथ निकेयासि नव्हे कारण । हें संग्रामी पतन तुझ्या मनाला झोंबणारें हें कारुण्य युद्धामध्ये काय कामाचें ? १८ गा अर्जुना, तूं जाणता आहेस, मग विचार कां बरें करीत नाहींस ? अरे, तूंच सांग, युद्धाला सज्ज झाले असतां असलें मवाळपण शोभतं काय ? ९९ हैं मवाळपण मिळविलेल्या लौकिकाला नाशील आणि परमार्थालाही हुकवील!” असें श्रीकृष्ण अर्जुनास म्हणाले. २० 66 यानंतर ते म्हणतात, म्हणून तूं शोक करूं नकोस, पुरा धीर धर, आणि, वा अर्जुना, या दुःखाला टाळावे. २१ हें तुला योग्य नाहीं, आजपर्यंत जोडलेल्या मोठ्या लौकिकाचा हैं नाश करील. बाबा, अजून तरी स्वहिताचा विचार कर. २२ या युद्धाच्या काळी असलें कृपापण काम पडणार नाहीं. अरे, हे सर्व लोक तुला आतांच सोईर वाटू लागले काय ? २३ तूं पूर्वीच यांना जाणत नव्हतास काय ? कां या गोतावळ्याची तुला ओळखच नव्हती ? मग आज हें उगाच अकांड तांडव कशाला ? २४ अरे, आजचें हें युद्ध म्हणजे काय तुझ्या आयुष्यांत नव्या नवलाची गोष्ट आहे ? ही तर तुमच्या परस्परांमधली नेहमींचीच भानगड आहे ! २५ मग आजच काय झालं आणि तुझ्या मनांत दयाको उपजली, हें कांहीं चांगलेंसें समजत नाहीं; तरीपण, अर्जुना, तूं ही वाईट गोष्ट केलीस यात संशय नाही. २६ या मोहाचा परिणाम असा होईल कीं संपादन केलेली प्रतिष्ठा नष्ट होईल, आणि संसाराबरोबर परमार्थही अन्तरेल ! २७ खया वीरानें रणांत हृदयाच्या दुर्बद्धतेशी संबंधच १ आयस्या, पदरांत पडलेल्या. २ परलोकगतीला, परमार्थाला. ३ वांकडे, गैर. ४ खऱ्याला, चांगल्याला.