पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३० सार्थ श्रीज्ञानेश्वरी हें कायी । करीत आहासी ॥ ६ ॥ तुज सांगें काय झालें । कवण उणें आलें । करितां काय ठेलें । खेदु कायिसा ॥ ७ ॥ तूं अनुचिता चित्त दिसी । धीरु कंहीं न संडिसी । तुझिया नामें अपयशीं । दिशा लंघिजे ॥ ८ ॥ तूं शूरवृत्तीचा ठावो । क्षत्रियांमाजी रावो । तुझिया लाटेपणाचा वो । तिहीं लोकीं ॥ ९ ॥ तुवां संग्रामी हरु जिंकिला । निवातकवचांचा ठावो फेडिला । पवाडा तुवां केला | गंधवांसी ॥ १० ॥ पाहतां तुझेनि पौडें । दिसे त्रैलोक्यही थोकडें । ऐसें पुरुषत्व चोखडें । पार्था तुझें ॥ ११ ॥ तो तूं कीं आजि एथें । सांडूनियां वीरवृत्तीतें । अधोमुख रुदनातें । करीतु आहासी ॥ १२ ॥ विचारी तूं अर्जुनु । कीं कारुण्यें किजमी दीनु । सांग पां अंधकारें भानु । ग्रासिला आधी || १३ || ना तरी पवन मेघासि वि । कीं अमृतासि मरण आहे । पाहे पां इंधनचि गिळोनि जाये । पावकातें ॥ १४ ॥ कीं लवणेंचि जळ विरे । संसर्गे काळकूट मरे । सांग पां महाफणी दर्दरें । गिळिजे कायी ॥ १५ ॥ सिंहासि झोंवे कोल्हा । ऐसा अपड आथि के जाहला । परी तो त्वां साच केला । आजि एथ ॥ १६ ॥ म्हणोनि अझुनी अर्जुना । झणें चित्त देसी या हीना । वेगीं धीर करूनियां मना । सावधु होई ॥ १७ ॥ सांडीं हें मूर्खपण । उठीं घे धनुष्यवाण । संग्रामीं हें कवण | विचार कर. तूं कोण आणि करितो आहेस काय ? ६ अरे, तुला आज झालें आहे तरी काय ? तुला कोणत्या गोष्टीची वाण पडली ? किंवा आरंभलेलें कार्य बिनसले आहे काय ? अरे, हा शोक कशा- करितां ? ७ तूं भलतीच गोष्ट मनावर घेणारा नाहींस, कधींही धीर सोडणारा नाहींस. अरे, तुझ्या नांवाचा उच्चार झाल्याबरोबर अपयशानें दिगन्ताला पळून जावें ! ८ तूं शौर्याचे भांडार व क्षत्रियांचा अग्रेसर आहेस, तुझ्या पराक्रमाचा व्याप त्रिभुवनांत आहे. ९ तूं युद्धांत शंकराला हारीस आणिलास व निवातकवचांचा मागमूस पुसून टाकिलास, गंधर्वाना आपल्या यशाचे पोवाडे गाण्यास तूं लाविलेंस. १० तुझ्या करणीच्या विस्ताराच्या मानानें हें त्रैलोक्यही उणें दिसतें ! अर्जुना, तुझा पराक्रम असा चोख निर्दोष आहे. ११ पण तोच शुद्धपराक्रमी तूं आज या समरांगणावर वीराची भावना सोडून, खालीं मान घालून, मुळमुळ रडत आहेस ! १२ वा अर्जुना, तूंच मनाला विचार, की, या भलत्याच मवाळ वृत्तीनें तुला पंचांत पाडावें काय ? सूर्य कधीं काळोखानं ग्रासला जातो काय ? १३ किंवा वारा कधीं अभ्रांना भितो, कीं अमृताला मरण बाधतें, किंवा लांकूडच विस्तवाला गिळून टाकितें, १४ की मिठाने पाणीच विरघळते, अथवा दुसन्या विषाच्या स्पर्शानें काळकूट विष मरून जातं, किंवा महासर्प बेडकाकडून गिळला जातो काय ? १५ अरे, सिंहाबरोबर कोल्हा झगडतो, असा चमत्कार कधीं घडला आहे काय ? परंतु तोच चमत्कार तूं आज येथे प्रत्यक्ष खरा केला आहेस ! १६ म्हणून, अर्जुना, अजून तरी या दीनपणाला तुझें मन वश होऊं नये, यासाठीं मनांत धीर धरून लवकर सावध हो. १७ हा मूर्खपणा झाडून टाक, उभा रहा, आणि हे धनुष्यबाण हातांत घे. १ पराक्रमाचा, २ व्याप. ३ तुलनेने ४ चमत्कार, अद्भुत गोष्ट,