पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ॐ नमो भगवते वासुदेवाय सार्थ श्रीज्ञानेश्वरी अध्याय दुसरा -Y922 संजय उवाच -- तं तथा कृपयाविष्टमश्रुपूर्णाकुलेक्षणम् । विषीदंतमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः ॥ १ ॥ सम० - कृपाविष्ट तसा पार्थ आंखें नेत्रांत दाटलीं । बोले विषादयुक्तार्ते त्यातें है मधुमुदन ॥ १ ॥ आर्या- संजय म्हणे किरीटी साश्रु सखेदहि बहू कृपावंत । होतां मधुसूदन तो बोले वचर्ने तयासि भगवंत ॥ १ ॥ ओवी - संजय म्हणे धृतराष्ट्रात । अर्जुन वेष्टिला मोहें बहुनें । अश्रुपात आले नेत्रांतें । देखोनि बोलिला श्रीकृष्ण ॥१॥ मग संजयो म्हणे रायातें । आइकें तो पार्थ तेथें । शोकाकुल रुद- नातें | करीत असे ॥ १ ॥ तें कुळ देखोनि समस्त । स्नेह उपनलें अद्भुत । तेणें द्रवलें असे चित्त । कवणेपरी ॥२॥ जैसें लवण जळें झेळंवलें । ना तरी अभ्र वातें हाले । तैसें सधीर परी विरमलें । हृदय तयाचें ॥ ३ || म्हणोनी कृपा आकळिला | दिसतसे अति कोमाइला । जैसा कर्दमी रुपला । राज- हंसु ॥ ४ ॥ तयापरी तो पांडुकुमरु । महामोहें अति जर्जर । तें देखोनी श्रीशार्ङ्गधरु | काय बोले ॥ ५ ॥ श्रीभगवानुवाच -- कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम् । अनार्यजुष्टमस्वर्ग्यमकीर्तिकरमर्जुन ॥ २ ॥ सम॰—कैंचें कश्मल हें तूज उदेलें विषमांत या । थोरीं न सोविलें जें दे न स्वर्ग यश अर्जुना ॥ २ ॥ आर्या - पेशा विषमावसरीं आर्यपथ स्वर्ग कीर्ति लोटून । पार्था नीचाश्रित हैं आलें कश्मल तुलाच कोठून ॥ २ ॥ ओवी - अर्जुना ! कश्मल कोठूनी । उदेले विषमकाळीं मनीं । हें स्वर्गात नासोनी । अपकीर्तीतें देईल ॥ २ ॥ म्हणे अर्जुना आधीं पाहीं । हें उचित काय इये ठायीं । तूं कवण मग संजय धृतराष्ट्राला म्हणाला, 'राजा, ऐक, त्या युद्धभूमीवर तो अर्जुन अशा प्रकारें शोकानें कळवळून प्रत्यक्ष रहूं लागला. १ तें आपलेंच सगळें कुळ पाहून त्या अर्जुनाचे मनाला दयेचा द्रव कोण्या प्रकारें आला ? २ तर, जसे पाण्यानें मीठ झरावे किंवा वाऱ्यानें अभ्र चळावें, तसें त्याचें तें धैर्यशाली हृदयही विरघळून गेलें. ३ त्यामुळे तो दयावृत्तीनें व्यापिलेला अर्जुन, चिखलांत रुतलेल्या राजहंसाप्रमाणे, कोमेजलेला दिसत होता. ४ तो पांडुपुत्र अर्जुन असा विलक्षण भ्रमानें गांजलेला पाहून त्याला भगवान् श्रीकृष्ण येणेंप्रमाणें बोलते झाले. ५ す "बा अर्जुना, या युद्धभूमीवर तुझें हें करणें व बोलणें योग्य आहे काय, याचा आधी पहिल्या प्रथम १ विरघळले.