पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तेरावा क्षेत्रक्षेत्रज्ञयोरेवमन्तरं ज्ञानचक्षुषा । भूतप्रकृतिमोक्षं च ये विदुर्यान्ति ते परम् ॥ ३४ ॥ ५४१ इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे क्षेत्रक्षेत्रज्ञयोगो नाम त्रयोदशोऽध्यायः । सम॰—हा क्षेत्रज्ञक्षेत्रभेद क्षेत्रींही ज्ञानदृष्टिने । जडत्व भूतसंस्कार सोडूं जाणति मुक्त ते ॥ ३४ ॥ आर्या- ते ज्ञानचक्षुयोगें क्षेत्र-क्षेत्रांत उभय अंतर तें। मोक्षहि जनप्रकृतिचा जाणति पद परम त्यां न अंतरतें ॥ ३४ ॥ ओवी - ऐसा क्षेत्रक्षेत्रज्ञाचा भेद । जो देखे ज्ञानचक्षु करोनि शुद्ध । पंचभूर्ते आणि प्रकृतिमोक्ष । तो पावे परम गति ॥ ३४ ॥ शब्दतत्त्वसारज्ञा । पैं तेचि देखणी प्रज्ञा । जे क्षेत्रक्षेत्रज्ञा । अपाडु देखे ।। २९ ।। इया दोहींचें अंतर | देखावया चतुर । ज्ञानियांचें द्वार । आराधिती ॥। ११३० ॥ याचिलागीं सुमति । जोडिती शांतिसंपत्ति । शास्त्रांचीं दुभतीं । पोसिती घरीं ॥ ३१ ॥ योगाचिया आकाशा | वळधिजे येवढाचि विसा । याचियाचि आशा । पुरुषासि गा ।। ३२ || शरीरादि समस्त | मानिताती तृणवत । जीवें संतांचे होत । वाहणधरु || ३३ || ऐसा ऐसियापरी । ज्ञानाचिया भरोवरी । करूनियां अंतरीं । निरुते होती ॥ ३४ ॥ मग क्षेत्रक्षेत्रज्ञांचें जें अंतर देखती साचें । ज्ञानें उन्मेख तयांचें । वोवाळूं आम्ही ।। ३५ ।। आणि महाभूतादिकीं । प्रभेदलीं अनेकीं । पसरली से लटकी । प्रकृति जे हे ॥ ३६ ॥ जे शुकनळिकान्यायें । न लगति लागली आहे । हैं जैसें तैसें होये । ठाउवें जयां ॥ ३७ ॥ जैसी माळा ते माळा । ऐसीचि देखिजे डोळां । सर्पबुद्धि टवाळा । उखी होउनी ॥ ३८ ॥ कां शुक्ति ते शुक्ति | हे साच होय प्रतीति । रुपेयाची भ्रांति । जाऊनियां ॥ ३९ ॥ तैसी वेगळी क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांतील भेद ज्या बुद्धीला कळला आहे, तीच बुद्धि खरी डोळस आहे, तिलाच शब्दार्थाचा सारांश खरोखर ग्रहण करतां येतो. २९ हा क्षेत्रक्षेज्ञांचा भेद कळण्यासाठींच शहाणे शहाणे लोक ज्ञानिजनांचे उंबरठे पुजीत असतात. ११३० याच्याच प्राप्तीसाठीं संतजन शांतीची दौलत सांठवतात आणि शास्त्रांची जोपासना करतात. ३१ याच ज्ञानाच्या आशेनें कांहीं पुरुष योगाभ्यासाच्या आकाशास गवसणी घालण्याचा साहसी आटापेट करतात. ३२ कोणी शरीरादि सर्व परिग्रहाला गवताच्या काडीप्रमाणें लेखूनही संतांच्या चरणसेवेला लागतात. ३३ निरनिराळ्या मार्गानीं ज्ञानाच्या लालसेनें प्रेरित होऊन लोक प्रयत्न करतात. ३४ मग अशा प्रयत्नांनी ज्यांना खरोखरच क्षेत्रक्षेत्रज्ञांमधील भेद कळून आला आहे, त्यांची आम्ही मोठ्या प्रेमानें अशा का. ३५ आणि महाभूतांदिकांनीं अनेक भेदभावांनीं नटवलेली जी ही लटकी मायावी प्रकृति विस्तारली आहे, ३६ जी शुकनलिकान्यायानें खरोखर बंधक नसतांही ज्याच्यात्याच्या भावनेप्रमाणें ज्याला-त्याला बंधक होते, ३७ माळेवर होणारा नसताच सर्वाभास दूर होऊन, माळा ती माळाच आहे असे सत्यज्ञान डोळ्याला व्हावें. ३८ किंवा रुप्याचा भ्रम नाहींसा होऊन शिंपी ती शिंपीच्याच रूपाने सत्यत्वाने दिसूं लागावी, ३९ त्याप्रमाणें जे आपल्या अंतःकरणांत, प्रकृति ही पुरुषापासून १ नाश.