पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५४२ सार्थ श्रीज्ञानेश्वरी वेगळेपणे । प्रकृति जे अंतःकरणें । देखती ते मी म्हणें । ब्रह्म होती ॥। ११४०॥ जें आकाशाहूनि वाड । जें अव्यक्ताची पैल कड । जें भेटलिया पाडपाड | पडों नेदी ॥ ४१ ॥ आकारु जेथ सरे । जीवत्व जेथ विरे । द्वैत जेथ नुरे | अद्र्य जें ॥ ४२ ॥ तें परमतत्त्व पार्था । होती ते सर्वथा । जे आत्मानात्मव्यवस्था-। राजहंसु ॥ ४३ ॥ ऐसा हा जी आघवा । श्रीकृष्णे तया पांडवा | उगाणा दिधला जीवा । जीवाचिया ॥ ४४ ॥ येर कलशींचं येरीं । रिविजे जयापरी । आपण तया श्रीहरी । दिधलें तैसें ॥ ४५ ॥ आणि कोणा देता कोणु । तो नर तैसा नारायणु । वरि अर्जुनातें श्रीकृष्णु । हा मी म्हणे ॥ ४६ ॥ परि असो तें नाथिलें । न पुसतां कां मी वोलें । किंबहुना दिधलें । सर्वस्व देवें ॥ ४७ ॥ कीं तो पार्थ जी मनीं । अझुनी तृप्ति न मनी । अधिकाधिक उतीन्ही । वाढवीतु असे ॥ ४८ ॥ स्नेहाचिया भरोवरी । आथिला दीपु घे थोरी । चाड अर्जुना अंतरीं । परिसतां तैसी ॥ ४९ ॥ तेथ सुगरणी आणि उदारे । रसज्ञ आणि जेवणारे । मिळती मग अवतरे । हातु जैसा ॥ ११५० ॥ तैसें जी होतसे देवा । तया अवधानाचिया लवलवा | पाहातां व्याख्यान चढलें थांवा । चौगुणें वरी ॥ ५१ ॥ सुवायें मेघु सांवरे । भिन्न व वेगळी आहे, असें जाणतात, तेच ब्रह्मरूपाला पावतात, असा माझा अभिप्राय आहे. ११४० जें आकाशाहून मोठें आहे, जें अव्यक्त प्रकृतीच्या पलीकडच्या मेरेवर आहे, जे लाभलें असतां साम्यासाभ्याचे भेदभाव उरत नाहींत; ४१ ज्याच्या ठिकाणी आकार, जीवभाव, व द्वैत, हीं राहूं शकत नाहींत, जे केवळ द्वैतहीन आहे; ४२ त्या परमतत्त्वाच्या रूपाला, आत्मानात्मव्यवस्था जाणणारे आणि राजहंसासारखे असारांतून सार निवडून काढणारे पुरुषच पावतात. " ४३ अशा प्रकार श्रीकृष्णानी आपल्या जीवींच्या जिवलग अर्जुनाला आत्मानात्मतत्त्वाचा सर्व परीनें उलगडा करून दाखविला. ४४ एका कलशांतले पाणी जसें दुसऱ्या कलशांत ओतावें, त्याप्रमाणें श्रीकृष्णांनीं आपले सर्व आत्मज्ञान, कांहीं शिल्लक न ठेवतां, अर्जुनाला दिलें. ४५ शिवाय, येथे देणारा कोण आणि घेणारा तरी कोण ? कारण नर म्हणजे अर्जुन हाही नारायणच, त्यांच्यांत भेद करतां येत नाहीं. तशांत श्रीकृष्णही 'अर्जुन म्हणजे मीच' असे स्वतःच म्हणतात. ४६ पण, असो, हें नसतें विषयांतर कशाला पाहिजे ? हें कोणी विचारलें नसतां, मी कां म्हणून सांगावें ? सारांश इतकाच, कीं, या प्रसंगीं देवांनी आपले ज्ञानसर्वस्वच अर्जुनाला अर्पण केलें. ४७ पण याचा परिणाम असा झाला, कीं, अर्जुनाच्या मनाची तृप्ति कांहीं होईना. त्याची ज्ञानश्रवणाची हांव अधिकाधिकच वाहत चालली. ४८ तेलाचें भरवण घातल्यानें काजळी झाडलेला दिवा जसा मोठा होतो, तसा अर्जुनाच्या अंतःकरणाचा उत्सुकपणा या श्रवणाने जास्तीच वाढला. ४९ या वेळी, जशी वाढणारी सुग्रण आणि सढळ हाताची असावी आणि जेवणारेही चविष्ठ असावे, म्हणजे वाढणारीचा आणि जेवणारांचा हात जसा सारखा चालू राहतो, ११५० तसें श्रीकृष्णांना झालें. अर्जुनाची श्रवणोत्सुकता पाहून देवांनाही १ भेद व साम्य, भेदभाव. २ झाडा, स्पष्ट उलगडा ३ उत्कट तृष्णा, हांव. ४ पेटविलेला,