पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५४० सार्थ श्रीज्ञानेश्वरी यथा सर्वगतं सौक्ष्म्यादाकाशं नोपलिप्यते । सर्वत्रावस्थितो देहे तथात्मा नोपलिप्यते ॥ ३२ ॥ समन लिंपे जेविं आकाश सूक्ष्मत्वें सर्वही स्थळीं । सर्वत्र सर्वां देहींही तसा आत्मा न लिंपतो ॥ ३२ ॥ आर्या - जैसा सूक्ष्मवास्तव सर्वगतासी न लेपहि नभास । तैसा सर्वव्यापक देहीं आत्मा अलिप्त अवभास ॥ ३२ ॥ आँत्री - जैसे आकाश घर्टी सूक्ष्म होऊन । असे, घटा न लिंपे जाण । तैसा आत्मा देहीं असोन । अलिप्त पैं ॥ ३२ ॥ अगा आकाश के नाहीं । हें न रिघेचि कवणे ठायीं । परि कायिसेनि कहीं । गादिजेना ॥ ११२० ॥ तैसा सर्वत्र सर्व देहीं । आत्मा असतुचि असे पाहीं । परी संगदोपें एकेंही । लिप्त नोहे ॥ २१ ॥ पुढतपुढती येथें | . हेंचि लक्षण निरुतें । जे जाणावें क्षेत्रज्ञातें । क्षेत्रविहीना ॥ २२ ॥ यथा प्रकाशयत्येकः कृस्नं लोकमिमं रविः । क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशयति भारत ॥ ३३ ॥ सम० - जसा प्रकाशितो लोक सर्वही एक भास्कर । क्षेत्रज्ञ सर्व क्षेत्रांतें प्रकाशी एक भारता ॥ ३३ ॥ आर्या सकळहि लोकां जैसा करि कौंतेया प्रकाश हाच रवी । क्षेत्र क्षेत्रज्ञहि तो तैसा करुनी प्रकाश संचरवी ॥ ३३ ॥ ओवी - जैसा सूर्य एक । सर्व जनां प्रकाशक । तैसा सर्वदेहीं जीव प्रकाशभासक | भारता ये रीतीं ॥ ३३ ॥ संसर्गे चेष्टिजे लोहें । परि लोह भ्रामक नोहे । क्षेत्रक्षेत्रज्ञां आहे । तुला पाडु || २३ || दीपकाचां अर्चीीं । राहाटी वाहे घरींची । परि वेगळीक कोडीची | दीपा आणि घरा ॥ २४ ॥ पैं काष्टाच्या पोटीं । वन्हि असे किरीटी । परि काठ नोहे या दृष्टी । पाहिजे हा ॥ २५ ॥ अपाडु नभा आभाळा | रवि आणि मृगजळा । तैसाचि हाही डोळां । देसी ज ॥ २६ ॥ हें आघवेंचि असो एकु । गगनौनि जैसा अर्कु । प्रगटबी लोकु । नांवें नांवें ॥ २७ ॥ एथ क्षेत्रज्ञु तो ऐसा । प्रकाशकु क्षेत्राभासा । यावरुतें हें न पुसा | शंका नेघा ॥ २८ ॥ अरे, आकाश अमक्या ठिकाणीं नाहीं असें कधींच घडत नाहीं, परंतु कोणत्याही ठिकाणचा मळ त्यास जडत नाहीं, ११२० त्याप्रमाणे सर्व ठिकाणीं सर्व देहांत आत्मा ओतप्रोत आहे, परंतु तो एकाच्याही संगदोषानें मळीण होत नाहीं. २१ पुन्हां पुन्हां हेंच लक्षण स्पष्ट करण्यांत येत आहे, कीं, क्षेत्रज्ञ हा क्षेत्रहीन आहे, हे समजून घ्यावें. २२ चुंबकमण्याचा संसर्ग झाला असतां लोखंड हालतें, परंतु लोखंड कांहीं चुंबकमणि होत नाहीं, तसाच प्रकार क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचा आहे. २३ दिव्याच्या उजेडानें घरांतला व्यवहार होतो, परंतु दिवा आणि घर यांत अपरंपार अंतर आहे. २४ अर्जुना, लांकडाच्या पोटांत अग्नि असतो, परंतु अग्नि म्हणजे कांहीं लांकूड नव्हे; या दृष्टीनेच या क्षेत्रज्ञाचा विचार केला पाहिजे. २५ आकाश आणि ढग, सूर्य आणि मृगजळ, यांत जो फरक आहे, तसा फरक क्षेत्रज्ञ आणि क्षेत्र यांत आहे, हें नीट विचार केला असतां समजते. २६ परंतु आतां हें पुरे. आकाशांतला सूर्य जसा निरनिराळ्या समस्त भुवनांना प्रकाशित करतो, तसा क्षेत्रज्ञ हा सर्व भासमान होणाऱ्या क्षेत्रांना प्रकाशितो. याउप्पर आतां कांहीं विचारूं नका आणि शंकाही काढू नका. २७, २८ १ मळत नाही,