पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तेरावा ५३९ अनादिपणें || ७ || सकळ ना निष्कन्छु । अक्रियु ना क्रियाशील । कुश ना स्थूळ | निर्गुणपणें ॥ ८ ॥ आभासु ना निराभासु । प्रकाशु ना अप्रकाशु | अल्प ना बहुवसु । अरूपपणें ॥ ९ ॥ रिता ना भरितु | रहितु ना सहितु । मूर्त ना अमूर्त । शून्यपणें ॥। १११० ॥ आनंदु ना निरानंदु | एक ना विविध | मुक्त ना बहु | आत्मपणें ॥ ११ ॥ येतुला ना तेतुला | आता ना रचिला | बोलता ना उगला । अलक्षपणें ॥ १२ ॥ सृष्टीचां होणां न रचे । सर्वसंहारें न वेंचे । आथी नाथी या दोहींचें । पंचैत्व तो ॥ १३ ॥ मवे ना चर्चे । वाढे ना खांचे । विटे ना वेंचे । अव्ययपणें ॥ १४ ॥ एवंरूप पैं आत्मा । देहीं जें म्हणती प्रियोत्तमा । तें मठाकारें व्योमा । नाम जैसें ॥ १५ ॥ तैसें तयाचिये अनुस्यूती । होती जाती देहाकृति | तो घे ना सांडी सुमति । जैसा तैसा ॥ १६ ॥ अहोरात्रें जैशीं । येती जाती आकाशीं । आत्मसत्ते तैसीं । देहें जाण ॥ १७ ॥ म्हणोनि इये शरीरीं । कांहीं करवी ना करी । आयताही व्यापारीं । सज्जु नव्हे ॥ १८ ॥ यालागीं स्वरूपें । उणा पुरा न घेपे । हें असो तो न लिंपे । देहीं देहा ॥ १९ ॥ असल्यामुळे शश्वत व स्वयंपूर्ण आहे. ७ निर्गुणपणामुळे तो कळासहित नाहीं आणि कटारहितही नाहीं, अक्रिय नाहीं आणि सक्रियही नाहीं, बारीक नाहीं कीं जाड नाहीं. ८ तो अरूप असल्यामुळें, त्याला आभास किंवा निराभास, प्रकाश किंवा अप्रकाश, अल्प किंवा विस्तृत, असें कांहींच म्हणतां येत नाहीं. ९ तो शून्यस्वरूप आहे, म्हणून तो पोकळ नाहीं कीं भरीव नाहीं, कशानेही सहित कीं विरहित नाहीं, मूर्तिमान नाहीं कीं अमूर्तही नाहीं. १९१० तो केवळ आत्मरूप असल्यामुळें, त्याच्या ठिकाणीं आनंद नाहीं कीं आनंदा भावही नाहीं, एकत्व नाहीं कीं अनेकत्वही नाहीं; तो मुक्त नाहीं कीं वद्धही नाहीं. ११ तो अलक्ष्य असल्याकारणानें, त्याला एवढा किंवा तेवढा, आइता किंवा घडलेला, बोलका किंवा मुका, असें कांहींच वर्णितां येत नाहीं. १२ सृष्टीबरोबर तो उत्पन्न होत नाहीं कीं तिच्या संहारावरोवर नाशत नाहीं, कारण, तो 'होणें जाणें ' या दोहोंचेंही लयस्थान आहे. १३ तो अव्यय आहे, म्हणून तो मापतां येत नाहीं कीं वर्णन करतां येत नाहीं, तो वाढत नाहीं कीं घटत नाहीं, तो फिका पडत नाहीं कीं संपत नाहीं. १४ अशा स्वरूपाचा आत्मा असतां, तो देहांत आहे असे जे म्हणतात, तें म्हणणें म्हणजे, सख्या अर्जुना, मठाच्या आकाराप्रमाणें जसें आकाशाला नांव देण्यांत येते, तसें आत्मा सर्वव्यापक असून, देहाकृति होतात जातात, परंतु आत्मा आपला जशाच्या तसाच असतो, असें सांगण्यासारखे आहे. १५, १६ दिवस आणि रात्र, हीं जशीं होतात आणि जातात, तशींच आत्म्याच्या सत्तेनं शरीरं होतात आणि मावळतात. १७ म्हणून आत्मा या शरीरांत असून, तो कांहीं करवीत नाहीं कीं करीतही नाहीं, आयतें पुढे आलेले कर्मही करण्यास तो सजत नाही. १८ म्हणून त्याच्या स्वरूपाला उणेपुरेपणा कधींच येत नाहीं, एकंदरीत ती देहांत असूनही देहभावांनीं लडबडत नाहीं. १९ १ नाश, लयस्थान,