पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५३८ सार्थ श्रीज्ञानेश्वरी माज विं तें दिली । आणिकांचिये ॥ ९५ ॥ तैसा आत्मा देहीं । आथि म्हणिपे हें कांहीं । साचें तरी नाहीं । तो जेथिंचा तेथें ॥ ९६ ॥ आरिसां मुख जैसें । बिंबलिया नाम असे । देहीं वसणें तैसें । आत्मतत्त्वा ॥ ९७ ॥ तया देहा म्हणती भेटी । हे सपोयी निर्जीव गोठी । वारिया वाळवे गांठी । ही आहे ॥ ९८ ॥ आगी आणि कापुसा । दोरा सुवावा कैसा । केउता सांदा आकाशा । पापाणेंसीं ॥ ९९ ॥ | एक निघे पूर्वेकडे । एक तें पश्चिमेकडे । तिये भेटीचेनि पांडे | संबंध हा ॥ ११०० ॥ उजियेडा आणि अंधारेया | जो पाडु मृता उभेया । तोचि गा आत्मया । देहा जाण ॥ १ ॥ रात्री आणि दिवसा । नका आणि कापुसा । अपाडू कां जैसा । तैसाच यासी ॥२॥ देह तंव पांचांचें जालें । हें कर्माचे गुणीं गुंथलें । भवंतसे चाकीं दिलें । जन्ममृत्यूच्या ॥ ३ ॥ हें काळानळाच्या तोंडीं । घातली लोणियाची उंडी | माशी पांखु पाखडी । तंव हें सरे || ४ || हें विपायें आगीं पडे । तरि भस्म होऊनि उडे । जाहलें श्वाना वरिपडें । तरी ते विष्ठा ॥ ५ ॥ या चुके दोहीं काजा । तरि होय कृमींचा पुंजा । हा परिणाम कपिध्वजा । कश्मलु गा ||६|| या देहाची हे दशा | आणि आत्मा तो एथ ऐसा । पैं नित्य सिद्ध पैसा । पडल्यासारखा वाटतो, परंतु स्वतः जशाच्या तसाच असतो; ९५ तद्वत् आत्मा देहांत आहे, हें म्हणणं कांहीं खरें नाहीं; कारण तो आत्मा जेथच्या तेथेंच, आपल्याठायीं, निरंतर असतो. ९६ आरशांत तोंडाचं प्रतिबिंब पडले, म्हणजे जसें आरशांत तोंड आहे असें म्हणतात, तद्वत्व देहांत आत्मा राहतो असें म्हणण्यांत येते. ९७ आत्म्याची आणि देहाची गांठ पडते, हें म्हणणें साफ निरर्थक आहे. वारा आणि वाळू यांचा कधीं तरी संयोग घडतो काय ? ९८ आग आणि कापूस यांना कोणत्या दांत एकत्र गुंफतां येईल ? आकाश आणि पाषाण यांचा सांधा कसा बरें बसवला जाईल ? ९९ एक जात आहे पूर्व दिशेला आणि दुसरें जात आहे पश्चिम दिशेला; मग या दोघांची गांठ पडल्यासारखाच हा देह आणि आत्मा यांचा संबंध आहे. ११०० उजेड आणि अंधार, जीवंत आणि मेलेला, यांत जितका सारखेपणा आहे, तितकाच सारखेपणा आत्मा आणि देह यांत आहे. १ रात्र आणि दिवस, सोने आणि कापूस, यांत जेवढा फरक आहे, तेवढाच फरक या दोहांत आहे. हें देह पांच भूतांचं बनले आहे, हें कर्माच्या बंधनाने जखडलें आहे, आणि हें जन्ममृत्यूच्या चाकावर सारख्या गिरक्या खात आहे. ३ काळरूपी अम्मीच्या तोंडांत टाकलेली ही लोण्याची लहानशी उंडी आहे आणि माशीला पंख पाखडण्याला जितका वेळ लागतो, तितक्या वेळांतच हिचा नाश होणारा आहे. ४ है देह देवाने आगीत पडलें, तर भस्म होऊन नाश पावेल; पण जर का कुत्र्यांच्या तावडीत सांपडलें, तर विष्टारूप होऊन जाईल, ५ आणि जर या दोन्ही गोष्टी टळल्या, तर हें किडींनी बुजबुजलेली रास होईल. एकंदरीत, अर्जुना, याचा कसाही परिणाम झाला, तरी तो किळसवाणाच ! ६ अशी या देहाची कहाणी आहे. पण आत्मा तर असा आहे, कीं, तो अनादि १ सफाई, सर्वस्वी, २ उभ्या शरीराला, जीवंताला.