पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तेरावा ५३७ दिसती की ॥ ८४ ॥ लहरी जैसिया जळीं । परमाणुकणिका स्थळीं । रश्मिकर मंडळीं । सूर्याच्या जेवीं ॥ ८५ ॥ ना तरी देहीं अवेव । मनीं आघवेचि भाव । विस्फुलिंग सावेव । वन्हीं एकीं ॥ ८६ ॥ तैसे भूताकार एकाचे | हैं दिठी रिगे जें साचें । तेंचि ब्रह्मसंपत्तीचें । तारूं लागे ॥ ८७ ॥ मग जयातयाकडे | ब्रह्मेचि दिठी उघडे । किंबहुना जोडे । अपार सुख ||८८ || येतुलेनि तु पार्था । प्रकृतिपुरुपव्यवस्था । ठायें ठावो प्रतिपथा । माजी जाहली ॥८९॥ अमृत जैसें ये चुळा । कां निधान देखिजे डोळां । तेतुला जिव्हाळा | मानावा हा ॥ १०९०॥ वांचूनि जाहलिये प्रतीती । घर बांधणें जें चित्तीं । तें आतां ना सुभद्रापती । इयावरी ॥ ९१ ॥ तर एक दोन्ही ते बोल। बोलिजती सखोल । देई मनातें बोल । मग तें घेईं ॥ ९२ ॥ ऐसें देवें म्हणितलें । मग बोलों आदरिलें । तेथ अवधानाचें चि केलें । सर्वांग येरें ॥ ९३॥ अनादित्वान्निर्गुणत्वात् परमात्मा यमव्ययः । शरीरस्थोऽपि कौन्तेय न करोति न लिप्यते ॥ ३१॥ सम० – अनादिवें निर्गुणत्वं विदारमा अविनाशि हा । अपोनि सर्व देहींही अकर्ता बद्ध जो नव्हे ॥ ३१ ॥ आर्या - निर्गुण अनादि म्हणुतो अविनाशी जाण सत्य परमात्मा । देह असुन अकर्ता नित्य असे जाण हॅचि माहारमा ॥ ३१ ॥ ओवी - तो निर्गुण आत्मा त्या आदि नाहीं । असा परमाध्ना अव्यय पाहीं । संसारी असोनि कांहीं । अकर्ता लिप्त नोहे ३१ तरि परमात्मा म्हणिपे । तो ऐसा जाण स्वरूपें । जळीं जळें न लिंपे । सूर्य जैसा ॥९४॥ कां जे जळा आदीं पाठीं । तो असतुचि असे किरीटी । पाण्यांत जशा किंवा शरीरांत आकृति एकरूप दिसतात, तेव्हांच त्या ब्रह्मस्वरूप आहेत, असें प्रतीत होतें. ८४ लाटा, स्थळांत जसे पार्थिव द्रव्याचे कण, किंवा रविमंडळांत जसे किरण, ८५ जसे अवयव, मनांत जसे निरनिराळे भाव, अथवा एकाच अग्नींत जशा साकार फुणग्या, ८६ तसे हे भूताकार सारे एकाच आत्म्याचे आहेत, ही गोष्ट जेव्हां ज्ञानदृष्टीला दिसेल, तेव्हांच ब्रह्मसंपत्तीचें जहाज हाताला लागतें. ८७ मग दृष्टीला जिकडे तिकडे ब्रह्मस्वरूपच प्रकट होतें आणि तेणेंकरून अपरंपार सुखाचा लाभ घडतो. ८८ अर्जुना, एवढें विवरण करून, तुला मी प्रकृतिपुरुषव्यवस्था समजावून दिली आहे; तिच्या प्रत्येक दिशेची यथास्थित मांडणी दाखविली आहे. ८९ जसा अमृताचा चूळ लाभावा किंवा गुप्त ठेवा डोळ्यांना दिसावा, तसाच हा आपल्याला परम योग्यतेचा लाभ झाला आहे, असें तूं समज. १०९० अनुभव आल्यावांचून मनाचा निश्चय करण्याचा प्रसंग, अर्जुना, आतां तुला खास येणार नाहीं. ९१ तरीपणं एकदोन महत्त्वाचे शब्द तुला सांगावयाचे आहेत, पण आधीं तूं आपलें मन मला ओलीस दे, आणि मग ते शब्द घे. " ९२ असें श्रीकृष्ण म्हणाले आणि पुढे बोलूं लागले; त्या वेळीं अर्जुनही तें एकाग्र चित्ताने ऐकू लागला. ९३ अर्जुना, ज्याला परमात्मा म्हणतात, तो असा आहे, कीं जसा सूर्य पाण्यांत प्रतिबिंबित झाला तरी त्याला पाण्याचा लेप घडत नाहीं. ९४ कारण, सूर्य हा पाण्याच्या पूर्वी आणि मागूनही असतोच आणि अर्जुना केवळ मध्यंतरींच्या काळांत तो प्रतिवित्ररूपानें इतरांना पाण्यांत १ हमी, आमीन. ६८