पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५३६ सार्थ श्रीज्ञानेश्वरी ॥ ७५ ॥ तें सुख येणेंचि देहें । पायपाखाळणिया लाहे । जो भूतवैपम्यें नोहे । विपमबुद्धि || ७६ || दीपांचिया कोडीं जैसें । एकचि तेज सरिसें । तैसा जो असता असे | सर्वत्र ईशु ॥ ७७ ॥ ऐसेनि समवें पांडुसुता । जिये जो देखतसांता । तो मरणा आणि जीविता । नांगवे फुड़ा ॥ ७८ ॥ म्हणोनि तो दैवागळा । वानीत असों वेळोवेळां । जे साम्यसेजे डोळा | । लागला तया ॥ ७९ ॥ प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः । यः पश्यति तथात्मानमकर्तारं स पश्यति ॥ २९ ॥ सम० – प्रकृतीनें क्रिया सर्व करिजेताति जो असें । पाहे तेव्हां आत्मयाचे तो अकर्तृत्व पाहतो ॥ २९ ॥ · आर्या-कुंतीतनया कमैं करिती ते जाण सर्वही प्रकृती । आत्मा कर्ता न असें पाहे जो तोचि पाहतो सुकृती ॥२९॥ ओंवी—कर्मे आणि सत्क्रिया । जाण प्रकृतीपासोनियां । असें पाहे आपणया । अकर्तृव पाहता तो ॥ २९ ॥ आणि मनोबुद्धिप्रमुखें । कर्मेंद्रियें अशेखें । करी प्रकृतीचि हें देखे | साचें जो गा ।। १०८० ॥ घरींचीं राहती घरीं । घर कांहीं न करी । अभ्र धांवे अंबरीं । अंवर तें उगें ॥ ८१ ॥ तैसी प्रकृति आत्मप्रभा । खेळे गुणीं विविधरंभा | येथ आत्मा तो वोथंवा । नेणे कोण ॥ ८२ ॥ ऐसेनि येणें निवाडें । जयाच्या जीवीं उजिवडें । अकर्तयातें फुडें । देखिलें तेणें ॥ ८३ ॥ यदा भूतपृथग्भावमेकस्थमनुपश्यति । तत एव च विस्तारं ब्रह्म संपद्यते तदा ॥ ३० ॥ सम॰—देखे जडतरंगांतें एका चैतन्यसागरीं । त्यापासूनिच विस्तार तेधवां ब्रह्म पावतो ॥ ३०॥ आर्या-भूतांचे नानास्वहि एक्या ब्रह्मींच आणि विस्तार । ब्रह्मापासुनि पाहे पावे ब्रह्म प्रपंचनिस्तार ॥ ३० ॥ ओवी - म्हणूनि वेगळाली सर्वांभूतीं । जे बोलिली विस्तारस्थिति । आत्मयातें एकत्वें देखती । ते ब्रह्म पावती निश्चयेंस ३० एहवीं तेंचि अर्जुना । होईजे ब्रह्मसंपन्ना । जैं या भूताकृति भिन्ना । म्हणतात, ७४ जशा सर्व नद्या समुद्रांत लीन होतात, त्याप्रमाणे जेथे मोक्षादि सर्व परम गति लीन होतात, ७५ तें परब्रह्मप्राप्तीचें आनंदसुख, जो भूतांचे भेदभाव मनांत न आणतां आत्मबुद्धीनें समत्वाने वहिवाटतो, त्याचे पाय धुण्याला आपण होऊन येतें ! ७६ कोट्यवधि दिव्यांत जसें तेज एकरूप समभावानें असतें, तसा तो अनादि परमात्मा सर्वत्र नेहमींच सारखा आहे. ७७ अशा प्रकारचें समत्व, अर्जुना, जो जीवंत असतांना अनुभवतो, त्याला जन्ममरणाचा बंध पडत नाहीं. ७८ म्हणून त्या देवशाली पुरुषाची आम्ही पुन्हां पुन्हां स्तुति करतों; कारण त्याची दृष्टि समभावावर खिळलेली असते. ७९ आणि मन, बुद्धि, इत्यादि सर्व कर्मेद्रियांच्या द्वारें प्रकृतिमायाच कर्म करते, असें जो खरेंखरें जाणतो. १०८० घरांतली माणसें घरांत वावर करतात, पण घर कांहीं वावरत नाहीं; आकाशांत मेघ सैरावैरां संचार करतात, पण आकाश कांहीं हालत डुलत नाहीं; ८१ आत्म्याच्या तेजानं त्रिगुणांच्या साह्यानें अनेक प्रकारचे खेळ खेळते, पण या खुंटाप्रमाणे उदासीन असतो, तो या खेळाला मुळींच ओळखीत नाहीं. ८२ ज्ञानाचा प्रकाश ज्याच्या अंतःकरणांत पडला आहे त्यालाच या कर्तृत्वद्दीन समजलें, असें जाणावें. ८३ त्याप्रमाणं प्रकृतिमाया खेळांत आत्मा केवळ अशा रीतीनें निश्चित आत्म्याचें खरें तत्त्व खरं म्हटले म्हणजे, अर्जुना, जेव्हां या भूतसंघाच्या आकृतींचें नानात्व निरस्त होऊन त्या