पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तेरावा ५३५ हा नाशतां भूताभासु । एथ आत्मा तो अविनाशु । जैसा केयूरादिकीं कसु । सुवर्णाचा ॥ ६६ ॥ एवं जीवधर्महीनु । जो जीवेंसी अभिन्नु । देखे तो सुनयनुं । ज्ञानियांमाजीं ॥६७॥ ज्ञानाचा डोळा डोळसा - । माजीं डोळस तो वीरेशा । स्तुति नोहे बहुवा । भाग्याचा तो ॥ ६८ ॥ समं पश्यन् हि सर्वत्र समवस्थितमीश्वरम् । न हिनस्त्यात्मनात्मानं ततो याति परां गतिम् ॥ २८ ॥ सम० -पर्टी तंतू असे पाहे सर्वत्र सम ईश्वरा । न एक तो आत्मघाती जाय मुक्तीस त्यावरी ॥ २८ ॥ आर्या- ईश्वर सम सर्वत्र स्थित पाहे तोचि या उपरगती । आपण अपुल्या घाता न करुनही पावतोचि परम गति ॥२८॥ ओवी - परमात्मा सम आहे । असें समबुद्धी पाहे । तो आत्मघाती न होये । जो आपणा ओळखे ॥ २८ ॥ हे गुणेंद्रियधोकटी । देह धातूंची त्रिकुटी । पांचमेळावा वोखटी | दारुण हे ॥ ६९ ॥ हे उघडी पांचवेउली । पंचधा आगी लागली । जीवपंचानना सांपडली | हरिणकुटी ॥ १०७० ॥ ऐसा असोनि इये शरीरीं । कोणु नित्यबुद्धीची सुरी । अनित्यभावाच्या उदरीं । दाटीजिना ||७१ || परि इये देहीं असतां । जो नयेच आपणया घाता । आणि शेखीं पांडुसुता । तेथेंचि मिळे ॥ ७२ ॥ जेथ योगज्ञानाचिया प्रौढी । वोलांडूनियां जन्मकोडी | न निगों इया भाषा बुडी । देती योगी ॥ ७३ ॥ जें आकाराचें पैल तीर । जें नादाची पैल मेर । तुर्येचें माजघर | परब्रह्म जें ॥ ७४ ॥ मोक्षासकट गति । जेथें येती विश्रांती । गंगादि अपांपती । सरिता जेवीं घटादिकांत जसें आकाश, तसा तो परमात्मा या सर्वात समरूप असतो. ६५ जसे बाहुभूषणादि अलंकार भिन्नभिन्न डौलाचे व वेळोवळीं बदलणारे असतात, परंतु त्यांतील सोन्याचा कस मात्र कधीही बदलत नाहीं, तद्वत् हा भूतांचा भासणारा नामरूपांचा खेळ नाशवन्त आहे, पण त्यांतील आत्मा मात्र शाश्वत आहे. ६६ या प्रकारें आत्मतत्त्वाला जो जीवधर्मापासून अलिप्त, पण जीवापासून अभिन्न असें समजतो, तोच सर्व ज्ञानिजनांत खरा डोळस, खरा देखणा, जाणावा. ६७ वीरश्रेष्ठा अर्जुना, तो पुरुष ज्ञानाची दृष्टीच होय, तो डोळसांतला डोळस समजावा; ही स्तुति कांहीं अतिशयोक्तीची नाहीं. तो पुरुष खरोखरच थोर नशिवाचा होय. ६८ हें शरीर गुण व इंद्रिये यांची पोतडी आहे. हिच्यांत कफ, वात, व पित्त, या धातूंचें त्रिकूट आहे. हिच्यांत पांच महाभूतांचे मिश्रण झालें आहे आणि ही फारच भयंकर आहे. ६९ ही उघड उघड पांचनांगी इंगळीसारखी आहे, किंवा ही पांच बाजूंनी पेटलेली भयंकर आग समजावी, अथवा जीवरूपी हिंस्र सिंहाला सांपडलेली ही गरीब हरिणांची राहाटीच जणूं काय आहे. १०७० अशा या शरीरांत वागत असतां, नित्यबुद्धीची सुरी अनित्यभावाच्या उरांत खुपसून कोण बरें मोकळा होणार नाहीं ? ७१ पण अर्जुना, जो ज्ञानी आहे, तो या शरीरांत जोपर्यंत वास करीत आहे, तोंपर्यंत कधींही आत्म्याचा घात करीत नाहीं; आणि देहपात घडल्यावर तो त्याच आत्मतत्त्वांत एकरूप होऊन जातो. ७२ योगीजन, आपल्या योगज्ञानाच्या सामर्थ्यानें कोट्यवधि जन्मांना ओलांडून, ज्या ठिकाणांत प्रवेश करून पुन्हां परत येणार नाहीं, असं म्हणत असतात, ७३ जें नामरूपात्मक भूतसृष्टीच्या पलीकडे आहे, जे नादाच्या पैलतीराला तुर्यावस्थेचे माजघर आहे, ज्याला परब्रह्म १ पांच नांग्यांची इंगळी. २ हरिणांची राहटी.