पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५३४ सार्थ श्रीज्ञानेश्वरी आघवें । जें कांहीं जीवु नांवें । तें तों उभययोगें संभवे । ऐसें जाण ॥ ५५ ॥ इयालागीं अर्जुना । क्षेत्रज्ञा प्रधाना। पासूनि न होती भिन्ना । भूतव्यक्ति ॥५६॥ समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम् । विनश्यत्स्वविनश्यन्तं यः पश्यति स पश्यति ॥ २७ ॥ सम० - समान सर्वां भूर्ती जो आहे त्या परमेश्वरा । अनित्यांतहि त्या नित्या जो पाहे तोचि डोळस ॥ २७ ॥ आर्या- राहे भूर्ती जो सम भूत-विनाशीं न नाश ज्या असतो । परमेश्वरासि यापरि पार्था जो पाहणार डोळस तो २७ ओवी - सर्वभूतांतरीं । ईश्वर आहे सर्वांतरीं । भूर्ते नासून आपण नाश न पावे निर्धारीं । हें पाहे तो डोळस ॥२७॥ पैं व तंतु नव्हे । तरि तंतूसीचि तें आहे । ऐसें खोलीं डोळां पाहें । ऐक्य हैं गा ॥ ५७ ॥ भूतें आघवींचि होती । एकाची एक आहाती । परी तूं प्रतीती | यांची घे पां ॥ ५८ ॥ ययांची नामेंही आनानें । अनारिसी वर्तनें । वेपही सिनाने । आघवेयांचे ॥ ५९ ॥ ऐसें देखोनि किरीटी । भेद सूमी हन पोटीं । तरि जन्माचिया कोटी । न लाहसी निघों ॥। १०६० ।। पैं नानाप्रयोजनशीळें । दीर्घे व वर्तुळें । होती एकीचींच फळें । तुंविणीयेचीं ॥ ६१ ॥ होतु कां उजू वांकुडे । परि बोरीचे हें न मोडे । तैसीं भूतें अवघडें । परि वस्तु उजू ॥ ६२ ॥ अंगारकणी बहुवसीं । उष्णता समान जैसी । तैसा नाना जीवराशी । परेशु असे ॥ ६३ ॥ गगनभरी धारा । परि पाणी एकचि वीरा । तैसा या भूताकारा । सर्वांगीं तो ॥ ६४ ॥ हे भूतग्राम विषम । परि वस्तु ते एथ सम । घटमठीं व्योम । जियापरी ॥ ६५ ॥ I ज्याला आपण 'जीव' हें नांव देतों, तें या क्षेत्रक्षेत्रज्ञांच्या योगानेंच उत्पन्न होतें, असें जाण. ५५ म्हणून, अर्जुना, यांपैकीं प्रधान मुख्य-तत्त्व जो क्षेत्रज्ञ, त्याच्यापासून ही नामरूपात्मक भूतसृष्टि वेगळी नाहीं. ५६ अरे पटत्व म्हणजे कांहीं तंतु नव्हे, परंतु तंतूंनींच तें भासमान होतें, त्याचप्रमाणें हें क्षेत्रक्षेत्रज्ञांचें ऐक्य खोल नजरेने पाहिले पाहिजे. ५७ हीं सर्व भूतें एकाचींच रूपें आहेत, आणि तीं सर्व एकच आहेत, याचा अनुभव तूं घेतला पाहिजे. ५८ ह्या भूतांना निरनिराळीं नांवें आहेत, यांच्या स्थितिगति, यांचे रूपरंग, सर्व निरनिराळे दिसतात, ५९ असें पाहून, अर्जुना, जर तूं भेदभावाला चित्तांत जागा देशील, तर या संसारांतून, कोटी जन्म घेतलेस तरीही बाहेर पडणार नाहींस. १०६० अरे, नाना प्रकारें उपयोगास येणारीं अशीं लांबट, वांकडीं, किंवा वाटोळीं फळें जशीं भोपळ्याच्या वेलीला येतात, ६१ बोरीच्या फांद्या वांकड्या असोत वा सरळ असोत, पण बोरीच्याच आहेत, बा कांहीं बदलत नाहीं, त्याचप्रमाणे भूतें कितीही निरनिराळ्या घडणीची असली तरी भूतांचा आधार व मूळकारण जें परम वस्तु ते सरळ, साधेंच असतें. ६२ निखाऱ्यांचे कण जरी पुष्कळ भिन्न भिन्न असले, तरी उष्णता ही त्यांच्यांत समानच असते, तसा जीवसंघ जरी नानारूप असला, तरी परमात्मा एकरूपच आहे. ६३ पावसाच्या धारा जरी आकाशभर पसरलेल्या असल्या, तरी त्या सर्वांतील पाणी एकरूपच असतें, तसाच भूतांच्या भिन्न आकारांत तो परमात्मा सर्वत्र सारखाच असतो. ६४ हे भूतांचे समुदाय जरी निरनिराळ्या रूपरंगाचे असले, तरी,