पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८ सार्थ श्रीज्ञानेश्वरी यदि मामप्रतीकारमशस्त्रं शस्त्रपाणयः । धार्तराष्ट्रा रणे हन्युस्तन्मे क्षेमतरं भवेत् ॥ ४६ ॥ सम० - जरी निःशस्त्र उगला त्या मार्ते शस्त्रहस्त है । मारिती या रणीं सर्व माझे कल्याण त्यामधें । ४६ ।। आर्या - मी प्रतिकार कराया यांवरि न धरीन शस्त्र हा नेम । हे धार्तराष्ट्र मातें बधितां शस्त्रं दिसे महा क्षेम ॥ ४६ ॥ ओवी - जरी निःशस्त्र मी उगला। रणीं मारो कोणी मला । मी न मारीं धार्तराष्ट्रांला । हो कां मज है क्षेम ॥ ४६ ॥ आतां यावरी जें जियावें । तयापासूनि हें बरवें । जें शस्त्र सांडूनि साहावे | वाण यांचे ॥ ६५ ॥ इयावरी होय जितुकें । तें मरणही वरी निकँ । परी येणें कल्पें । चाड नाहीं ॥ ६६ ॥ एवमुक्त्वाऽर्जुनः संख्ये रथोपस्थ उपाविशत् । विसृज्य सशरं चापं शोकसंविग्नमानसः ॥ ४७ ॥ इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन- संवादे अर्जुनविषादयोगो नाम प्रथमोऽध्यायः ॥ १ ॥ सम० - बोलोनि अर्जुन असा रथीं तो बैसला उगा । बाणेंसीं धनु टाकूनी शोकें विव्हळमानस ॥ ४७ ॥ आर्या - बोलुनि ऐसें युद्ध टाकुनि तत्काळ पार्थ शरचाप। बैसे उगला स्वरथीं पावुनि चित्तांत शोक संताप ॥४७॥ ओवी - संजय म्हणे राया । ऐसें अर्जुन बोलोनियां । धनुष्यबाण टाकोनियां । दुःखं बैसला असे ॥ ४७ ॥ संजय उवाच - ऐसें तिये अवसरीं । अर्जुन बोलिला समरीं । संजयो म्हणे अवधारीं । 'धृतराष्ट्रातें ॥ ६७ ॥ मग अत्यंत उद्वेगला । न धरत गहिंवरू आला । तेथ उडी घातली खालां । रथौनियां ॥ ६८ ॥ जैसा राजकुमरु पदच्युतु । सर्वथा होय उपहतु । कां रवि राहुग्रस्तु । प्रभाहीनु ॥ ६९ ॥ ना तरी महासिद्धि- संभ्रमें । जिंतला तापसु भ्रमें । मग आकळूनि कामें । दीनु कीजे ॥ ७० ॥ तैसा तो धनुर्धरु । अत्यंत दुःखें जर्जरु। दिसे जेथ रहंवरु । त्यजिला तेणें ॥ ७१ ॥ मग धनुष्यबाण सांडिले । न धरत अश्रुपात आले । ऐसें ऐक राया वर्तलें । संजय म्हणे ॥ ७२ ॥ आतां यावरी तो वैकुंठनाथ । देखोनि सखेद पार्थ । कवणेपरी परमार्थ । निरूपील || ७३ ।। ते सविस्तर पुढारी कथा | अति सकौतुक आइकतां । ज्ञानदेवो म्हणे आतां । निवृत्तिदासु ॥ २७४॥ यापुढे जगण्यापेक्षां, हें शस्त्र फेंकून देऊन यांचे वाण खुशाल सहन करणं, हेंच अधिक अशा करण्याने जर मरण ओढवलें, तर तेंही बरेंच; परंतु या महापातकाची आम्हांला चांगलें. ६५ हौस नाहीं. " ६६ संजय धृतराष्ट्राला म्हणाला, "राजा, असें त्या वेळीं युद्धभूमीवर अर्जुन बोलला, आणि पुढें काय झालें तें ऐक. ६७ मग त्या अर्जुनाला अत्यन्त खेद झाला, त्याला इतका गहिंवर आला कीं तो त्याला आवरना. त्या दुःखावेशांत त्यानं रथांतून खाली उडी घातली. ६८ जसा पदच्युत झालेला राजपुत्र सर्वपरी निस्तेज व्हावा, किंवा राहूनें ग्रास केल्यामुळे सूर्य प्रभाहीन व्हावा, ६९ किंवा महा- सिद्धीच्या लोभाच्या तडाक्यांत सांपडलेला तपस्वी भ्रमून जावा आणि मग विषयवासनांच्या पाशांत सांपडून दुर्बळ व्हावा, २७० तसाच तो रथांतून खाली आलेला अर्जुन दुःखानं अगदीं पिळलेला दिसत होता. ७९ मग त्यानं धनुष्यवाण टाकून दिले. त्याच्या डोळ्यांतून अनावर पाणी गळं लागलें. राजा, अशी एकंदर अवस्था झाली.” असे संजय म्हणाला. ७२ आतां यानन्तर वैकुंठाधिपति श्रीकृष्ण अर्जुनाला दुःखव्याप्त पाहून, परमार्थाचा कशा प्रकारें बोध करितील, ७३ तो सविस्तर प्रसंग पुढील अध्याय आइकणं फारच कौतुकाचें आहे, असें श्रीनिवृत्तिनाथांचा दास ज्ञानदेव म्हणतो. २७४