पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तेरावा ५३३ टेंकती बोला ॥ ४२ ॥ जे हिताहित देखती । हानि कणवा घेपती । पुसोनि शिणु हरिती । देती सुख ॥ ४३ ॥ तयांचेनि मुखें जें निघे । तेतुलें आदरें चांगें । ऐकोनियां आंगें । मनें होती ॥ ४४ ॥ तया ऐकणेयाचि नांवें । ठेविती गा आघवें । तया अक्षरांसी जीवें । लोण करिती ॥ ४५ ॥ तेही अंतीं कपिध्वजा । इया मरणार्णवसमाजा || पासूनि निघती वोजा । गोमटिया ॥ ४६ ॥ ऐसेसे हे उपाये । बहुवस एथें पाहें । जाणावया होये । एकी वस्तु ॥ ४७ ॥ आतां पुरे हें बहुत । पैं सर्वार्थाचें मति । सिद्धांतनवनीत | देऊं तुज ॥ ४८ ॥ येतुलेनि पांडुसुता । अनुभव लाहाणा आयिता । येर तंव तुज होतां । सायास नाहीं ॥ ४९ ॥ म्हणोनि ते बुद्धि रचूं | मतवाद हे खांचूं | सोलविं निर्वचूं | फलितार्थचि ॥ १०५० ॥ यावत्संजायते किंचित्सत्त्वं स्थावरजङ्गमम् । क्षेत्रक्षेत्रज्ञ संयोगात्तद्विद्धि भरतर्षभ ॥ २६॥ सम० - प्रतीति उपजे जे जे जेव्हां जेव्हां चराचरीं । क्षेत्रक्षेत्रज्ञसंयोगे ते जाण भरतर्षभा ॥ २६ ॥ आर्य-जितुके जे का होतें पार्था स्थावर तसेंचि जंगम तें । क्षेत्र-क्षेत्रज्ञाच्या योगें तें जाण वेदशास्त्रमतें ॥ २६ ॥ ओंवी —जें आकारासी आलें । स्थावर जंगम बोलिलें । क्षेत्र-क्षेत्रज्ञापासूनि झालें । तें जाण भरतर्षभा ॥ २६ ॥ तरी क्षेत्रज्ञ येणें वोलें । तुज आपण जें दाविलें । आणि क्षेत्रही सांगितलें । आघवेंचि ॥५१॥ तया येरयेरांच्या मेळीं । होइजे भूतीं सकळीं । अनिलसंगें सलिलीं | कल्लोळ जैसे ॥ ५२ ॥ कां तेजा आणि उखरा । भेटी जालिया वीरा । मृगजळाचिया पूरा | रूप होय || ५३ || नाना धाराधरधारी । झळंबलिया वसुंधरी । उठिजे जेवीं अंकुरीं । नानाविधीं ॥ ५४ ॥ तैसें चराचर 1 धरून असतात. ४२ ज्यांना हिताहित स्पष्ट दिसतें, जे परम कनवाळू आहेत, जे विचारपूस करून क्लेश हरण करतात आणि सुख देतात, ४३ अशा सत्पुरुषांच्या वदनांतून जो जो उपदेश निघेल, तो तो मोठ्या शुद्ध आदरबुद्धीने ऐकून, ते आपली मनोवृत्ति तद्रूप करतात. ४४ या उपदेशश्रवणांतच सर्व कांहीं आहे असे ते श्रद्धेनं मानतात आणि त्या उपदेशाच्या अक्षरांवर आपल्या जीवभावाची कुरवंडी करतात. ४५ अर्जुना, असे श्रद्धावान् श्रवणमार्गीही या जन्ममरणाच्या सागरांतून नीटपणे निघून सुरक्षित होतात. ४६ तेव्हां एकच ब्रह्मवस्तु प्राप्त करून घेण्याचे असे अनेक भिन्न भिन्न मार्ग आहेत. ४७ पण, आतां हा विस्तार पुरे झाला. या सर्व घुसळण्यांतून निघणारे महासिद्धान्ताचे सारभूत लोणी आतां तुझ्या हातावर ठेवू म्हणजे झाले. ४८ अर्जुना, एवढं केल्यानेच तुला ब्रह्मानुभव आयताच लाभेल, तुला दुसरे कोणतेही प्रयास करण्याचं कारणच राहणार नाहीं. ४९ म्हणून आतां तोच विचार आम्हीं करता, आणि नाना मतांचे वाद तोडून टाकून, आंतल्या गाभ्यांतील निर्भेळ सत्य सिद्धांतच तुला कथन करतो. १०५० आतां, ' क्षेत्रज्ञ' या नांवानें जें आत्मतत्त्व तुला सांगितले आणि ' क्षेत्र' म्हणून जें जें कांहीं सांगितलं आहे, ५१ त्या दोघांचं संमेलन होऊन, हें भूतमात्र झालेले आहे. वाऱ्याच्या संगतीनें जशा पाण्यांत लाटा उसळतात, ५२ अथवा तेजाचा आणि रखरखीत माळजमिनीचा संयोग झाला म्हणजे जसा मृगजळाच्या लोटाचा आभास होतो, ५३ किंवा मेघाच्या धारा पृथ्वीवर वर्ष लागल्या म्हणजे जसे नानाविध वनस्पतींचे अंकुर उद्भवतात, ५४ त्याचप्रमाणे हे सर्व स्थावरजंगम