पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५३२ सार्थ श्रीज्ञानेश्वरी जयाचिया मना । गोचर जाहली ॥ ३२ ॥ तो शरीराचेनि मेळें । करू कां कमैं सकळे । परि आकाश धुई न मैळे । तैसा असे ||३३|| आथिलेनि देहें । जो न घेपे देहमोहें । देह गेलिया नोहे । पुनरपि तो ॥ ३४ ॥ ऐसा तया एकु । प्रकृतिपुरुपविवेकु । उपकारु अलौकिक । करी पैं गा ॥ ३५ ॥ परि हाचि अंतरीं । विवेक भानूचियापरी । उदेजे ते अवधारीं । उपाय बहुत ॥ ३६ ॥ ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना । अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे ॥ २४ ॥ सम० - पाहती निर्विशेषात्मा ध्यानें कोणी कितेक ते । सांख्यै विश्वात्मयोगेंही कर्मी ब्रह्म असे किती ॥ २४ ॥ आर्या-कोणी हृदय चिंती ध्यानें आत्म्यासि पाहती अपर । कोणी सांख्य योगें पाइति कर्महि तोचि योग पर ॥ २४ ॥ ओवी - ध्यानें पाहती कोणी । कोणी देखती आपण आपणनी । कोणी सांख्ययोगेंकरूनी । कोणी कर्मयोगें ॥ २४ ॥ कोणी एकु सुभटा | विचाराचां आगिटां । आत्मानात्मकिटा । पुढें देउनी ॥ ३७ ॥ छत्तीसही वांनी भेद । तोडोनियां निर्विवाद । निवडिती शुद्ध | आपणपें ॥ ३८ ॥ तया आपणपयाच्या पोटीं । आत्मध्यानाचिया दिठी । देखती गा किरीटी । आपणचि ॥ ३९ ॥ आणिक पैं दैवव । चित्त देती सांख्ययोगें । एक ते अंगलगे । कर्माचेनि ॥। १०४० ॥ अन्यं त्वेवमजानन्तः श्रुत्वान्येभ्य उपासते । तेऽपि चातितरन्त्येव मृत्युं श्रुतिपरायणाः ॥ २५ ॥ सम० - आत्मा नेणोनिही कोणी आइकोनि उपासिती । मृत्युसिंधूसि तरती तेही श्रवणतत्पर ॥ २५ ॥ आर्या-कोणी हृदय ऐसें गुरुवचनें मात्र ऐकुनी पुरती। पार्था उपासिती ते श्रवण तरपरहि मृत्यु तरती ॥ २५ ॥ ओवी - आणि जे अज्ञान असती । गुरूपासाव जाऊनि उपासना करिती । ते मृत्युसंसारीं तरती । श्रुतिपरायण ॥ २५ ॥ येणें येणें प्रकारें । निस्तरती साचोकारें । हें भवभेउरें । आघवेंचि ॥ ४९ ॥ परि ते करिती ऐसें । अभिमानु दवडूनि देशें । एकाचिया विश्वासें । ही प्रकृतिपुरुषाची व्यवस्था ज्याला पूर्णपणे समजून पटली आहे; ३२ तो मनुष्य या देहप्राप्तीमुळें सर्व तऱ्हाच कर्मे करील, परंतु, जसें आकाश धुक्यानें मळत नाहीं, तसाच तो कर्मसंगानें न मळतां निर्लेप राहील. ३३ जोपर्यंत देह आहे, तोंपर्यंत जो देहभावानें मटत नाहीं, तो देहपात झाल्यावर पुन्हां जन्मालाच येत नाहीं. ३४ तरी इतकें कल्याण साधून देणारा हा प्रकृतिपुरुषाचा निवाडा तूं निरंतर करावास. ३५ आतां हा निवाडा सूर्यप्रकाशाप्रमाणें अंतःकरणांत कसा उदय पावेल, याचे अनेक उपाय आहेत, ते तूं श्रवण कर. ३६ वीरश्रेा अर्जुना, कांहीं लोक विचाराची आग पेटवून आत्मानात्माच्या हीणकटावर ज्ञानाचे संस्कार करतात, ३७ आणि अशा रीतीनें निरनिराळ्या छत्तीस कसांचे भेद साफ बुजवून ब्रह्मतत्त्वाचें चोख निर्मळ सोनें निवडून काढतात, ३८ आणि मग ते त्या ब्रह्मतत्त्वाच्या ठिकाणीं आत्मध्यानाच्या दृष्टीनं आपणा स्वतांलाच पाहतात. ३९ दुसरे कोणी दैववशात् सांख्ययोगानं परमतत्त्वाकडे लक्ष लावतात, तर तिसरे कोणी कर्माचा अंगीकार करून तें साध्य साधतात. १०४० अशा नाना मार्गानी लोक या भवभ्रमाच्या भोवऱ्यांतून बाहेर पडतात, ही गोष्ट खरी आहे, ४१ परंतु कोणी असे करतात, कीं, सर्व अभिमान सोडून श्रद्धापूर्वक कोणाच्या तरी उपदेशाचा टेंका १ कसाचे भेद. २ दैवबळानें, ३ आश्रयानें,