पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तेरावा ५३१ हा प्रकृतिमाजीं उभा । परि जुई जैसा वोथंबी । इया प्रकृति पृथ्वी नभा । तेतुला पाडु ॥ २२ ॥ प्रकृतिसरितेच्या तटीं । मेरु होय हा किरीटी । माजी विंवे परी लोटीं । लोटों नेणें ॥ २३ ॥ प्रकृति होय जाये । हा तो असतुचि आहे । म्हणोनि आब्रह्माचें होये । शासन हा ॥ २४ ॥ प्रकृति येणें जिये । याचिया सत्ता जग विये । इयालागीं इये । वैरयेतु हा ॥ २५॥ अनंतें काळें किरीटी | जिया मिळती इया सृष्टि । तिया रिगती ययाच्या पोटीं । कल्पांतसमयीं ॥ २६ ॥ हा महद्ब्रह्मगोसावी । ब्रह्मगोलाघवी । अपारपणें मवी । प्रपंचातें ॥ २७ ॥ पैं या देहामाझारीं । परमात्मा ऐसी जे परी । बोलिजे ते अवधारीं । ययातेंचि ॥ २८ ॥ अगा प्रकृतिपरौता । एकु आथी पांडुसुता । ऐसा प्रवादु तो तत्त्वता । पुरुष हा पैं ॥ २९ ॥ य एवं वेत्ति पुरुषं प्रकृतिं च गुणैः सह । सर्वथा वर्तमानोऽपि न स भूयोऽभिजायते ॥ ९३ ॥ सम० - जाणेल जो या पुरुषा गुणेंसीं प्रकृतीसही । वर्ते जरी प्रपंचीं तो तरी जन्मा न ये पुन्हा ॥ २३ ॥ आर्या - यापरि पुरुष प्रकृती जाणे गुणसहित त्यांत नर कोणी । असतांहि तो प्रपंच न पवे जन्मासि जाण परतोनी ॥ २३॥ ओंवी - प्रकृति पुरुष आणि गुण । ऐसें जयासी झालें ज्ञान । तो संसारीं असोन । पुन्हां जन्मा न ये ॥ २३ ॥ जो निखिळपणें येणें । पुरुषा यया जाणे । आणि गुणाचें करणें । प्रकृतीचें तें ॥। १०३०॥ हें रूप हे छाया । पैल जळ हे माया । ऐसा निवाड धनंजया । जेविं कीजे ॥ ३१ ॥ तेणें पाडें अर्जुना । प्रकृतिपुरुषविवंचना । जुईच्या वेलीला सांवरून धरणारा डांभा जसा ताठ उभा असतो, तसा हा पुरुष प्रकृतिमायेंत ताठ उभा राहतो. ह्याच्यांत आणि प्रकृतींत जमीनअस्मानाचें अंतर आहे. २२ प्रकृतिनदीच्या तीरावर पुरुष हा मेरुपर्वतासारखा राहतो. त्याचें प्रतिबिंब नदींत पडतें, पण तिच्या प्रवाहाबरोबर तो वाहून जात नाहीं. २३ प्रकृतिमाया होते, जाते; परंतु हा शाश्वत टिकतो, आणि म्हणूनच हा ब्रह्मदेवापासून कीडमुंगीपर्यंत सर्वाचा शास्ता- नियंता होतो. २४ प्रकृतीला याच्यापासून जीवाचा लाभ होतो, ती याच्याच सामर्थ्यानें जग उत्पन्न करते. एवंच हा प्रकृतीचा भर्ता आहे. २५ अर्जुना, काळाच्या अखंड प्रवाहानें हिनें जी जी सृष्टि उत्पन्न केलेली असते, ती ती सर्व कल्पांतकाळीं या पुरुषाच्या पोटींच लीन होऊन जाते. २६ हा, महदूब्रह्म जी प्रकृति, तिचा स्वामी आहे, या ब्रह्मांडाचें सूत्र याच्याच स्वाधीन असतें, आणि याचें व्यापकपण इतकें अमर्याद आहे, कीं तो या सर्व प्रपंचाचे माप करूं शकतो. २७ आणि या शरीरांत ज्याला 'परमात्मा' ही संज्ञा देतात, तो हाच पुरुष होय. २८ अर्जुना, या प्रकृतीच्या पलीकडे एक वस्तु आहे, असें जें म्हणतात, तें वस्तु म्हणजे खरोखर हाच पुरुष होय. २९ जो मनुष्य या पुरुषाचें स्वरूप स्पष्टपणें जाणतो, तसेंच जो असेंही ध्यानीं घेतो, की ही त्रिगुणात्मक सृष्टि प्रकृतिमायेनें निपजवली आहे. १०३० ही मूळ वस्तु, हें तिचें प्रतिबिंध, आणि मायारूपी हें पाणी, असा जसा, अर्जुना, आपण निवडानिवडीचा प्रकार करतों. ३१ त्याचप्रमाणें १ खांब, २. भर्ती, आधार,