पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५३० सार्थ श्रीज्ञानेश्वरी रत्नदीपु ॥ ११ ॥ राजा पराधीनु जाहला । कीं सिंह रोगें रुंधला । तैसा पुरुष प्रकृती आला । स्वतेजा मुके ॥ १२ ॥ जागता नरु सहसा । निद्रा पीहूनि जैसा । स्वप्नींचिया सोसा | वश्यु कीजे ॥ १३ ॥ तैसें प्रकृतिजालेपणें । पुरुषा गुण भोगणें । उदास अंतौरीगुणें । आतुडे जेवीं ॥ १४ ॥ तैसें आज नित्या होये । आंगीं जन्ममृत्यूचे घाये | वाजती जें लाहे । गुणसंगातें ॥ १५ ॥ परि तें ऐसें पांडुसुता । तातलें लोह पिटितां । जेवीं वन्हीसीच घाता | बोलती तया ॥ १६ ॥ कां आंदोळलिया उदक | प्रतिमा होय अनेक । तें नानात्व म्हणती लोक | चंद्रीं जेवीं ॥ १७ ॥ दर्पणाचिया जवळिका । दुजेपण जैसें ये मुखा । कां कुंकुमें स्फटिका । लोहितत्व ये ॥ १८ ॥ तैसा गुणसंग में । अजन्मा हा जन्में | पावतु ऐसा गमे । न्हवीं नाहीं ॥ १९ ॥ अधमोत्तम योनी । यासि ऐसिया मानीं । जैसा संन्यासी होय स्वप्नीं । अंत्यजादि जाती ॥। १०२० ॥ म्हणोनि केवळ पुरुषा । नाहीं होणें भोगणें देखा । येथ गुणसंगुचि अशेखा - | लागीं मूळ ॥ २१ ॥ उपद्रष्टानुमन्ता च भर्ता भोक्ता महेश्वरः । परमात्मेति चाप्युक्तो देहेऽस्मिन् पुरुषः परः ।। २२ ।। सम० - जो द्रष्टा जाणता भर्ता परमात्मा परेश जो । तोचि भोक्ता दुजा देहीं पुरुषप्रतिबिंब जो ॥ २२ ॥ आर्या-द्रष्टा अनुमोदकही पुरुषहि भोका महेश अगि भर्ता । या परि बोलियला तो या देहाहुनि असे पर अकर्ता ॥२२॥ ओवी - पाहता, अनुमोदन देता। ईश्वर पोषक आणि भोक्ता । तोचि परमात्मा म्हणिजे तस्वतां । देहीं परम पुरुष तो २२ असावा, ११ किंवा जसा राजा दुसऱ्याच्या कह्यांत जावा, अथवा सिंह रोगानें खिळून टाकावा, त्याप्रमाणेंच प्रकृतीच्या संगतीनें पुरुष आपल्या तेजाला मुकतो. १२ जागा असलेला मनुष्य जसा एकदम निद्रावश होऊन स्वप्नांतील वासनांच्या भोवऱ्यांत पडावा, १३ त्याचप्रमाणें या प्रकृतीच्या संभवानें पुरुषाला गुणांचा भोग घ्यावा लागतो, जसा विरक्त पुरुषही स्त्रीच्या योगानें जखडला जातो, तसाच प्रकार या जन्मरहित शाश्वत पुरुषाचा होतो आणि गुणसंगानें त्याच्यावर जन्ममृत्यूचे घाले पडतात. १४, १५ परंतु अर्जुना, हा प्रकार असा आहे, कीं, जसें तापलेल्या लोखंडावर जे घाव पडतात, ते अमला लागतात, असें सामान्य जन समजतात, १६ अथवा पाणी हलल्यामुळें एकाऐवजी चंद्राचीं त्यांत अनेक प्रतिबिंबें दिसतात; म्हणून तें अनेकत्व जसें अविचारी लोक त्रिभूत चंद्राच्या अंगीं इसवितात, १७ किंवा आरसा जवळ असल्यामुळे एका तोंडाचीं जशीं ( प्रतिबिंबामुळे ) दोन तोंडं भासतात, अथवा कुंकवानें स्वच्छ काचमण्यालाही तांबडेपणा आल्यासारखा वाटतो, १८ तसेंच गुणसंगानें या अजन्म्याला नानाजन्म घडतात असें भासतें, परंतु गुणसंग नसल्यास तसा प्रकार घडत नाहीं. १९ ज्याप्रमाणें संन्यासी जातिहीन असतां, स्वनामध्ये 'मी अन्त्यजादि जातीचा आहे' असा भास त्याला व्हावा, तसाच हा पुरुषही उच्चनीच योनीला गेल्यासारखें भासतं, असें तूं समज. १०२० म्हणून केवलस्वरूपी निःसंग पुरुषाला भोग कधीच घडत नाहीं. ह्या भोगप्रकरणाचे सगळें मूळबीज गुणसंगांत आहे. २१