पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तेरावा ५२९ इयेतें येतुलावरी । सौभाग्यव्याप्ति थोरी । म्हणोनि तया आवरी । अनावरातें ॥ ९८ ॥ तयाच्या तंव ठायीं । निपनि कांहींच नाहीं । कीं तया आघवें ही । आपणचि होय ॥ ९९ ॥ तया स्वयंभाची संभूति । तया अमूर्ताची मूर्ति । आपण होय स्थिति । ठावो तया ॥। १०० ।। तया अनार्ताची आर्ति । तया पूर्णाची तृप्ति । तया अकुळाची जाती - । गोत होय ॥ १ ॥ तया अचर्चाचें चिन्ह | तया अपाराचें मान । तया अमनस्काचें मन । बुद्धि ही होय ॥ २ ॥ तया निराकाराचा आकारु । तया निर्व्यापाराचा व्यापारु । निरहंकाराचा अहंकारु । होऊनि ठाके ॥ ३ ॥ तया अनामाचें नाम । तया अजाचें जन्म | आपण होय कर्म । क्रिया तया ॥ ४ ॥ तया निर्गुणाचे गुण | तया अचरणाचे चरण । तया अश्रणाचे श्रवण । अचक्षूचे चक्षु ॥ ५ ॥ तया भावातीताचे भाव । तया निरवयवाचे अवयव । किंबहुना होय सर्व । पुरुषाचें हे ॥ ६ ॥ ऐसेनि इया प्रकृति | आपुलिया सर्व व्याप्ती । तया अविकारातें विकृती | माजीं कीजे ॥ ७ ॥ तेथ पुरुषत्व जें असे । तें इये प्रकृतिदशे । चंद्रमा अंवसे । पडिला जैसा ॥ ८ ॥ विर्दळ बहु चोखा | मीनलिया वाला एका । कसु होय पांचिका | जयापरी ॥ ९ ॥ कां साधुतें गोंधळी । संचरोनि सुये मैळीं । नाना सुदिनाचा आभाळीं । दुर्दिनु कीजे ॥ १०१० ॥ जेविं पय पशुच्या पोटीं । कां वन्हि जैसा काष्ठीं । गुंडूनि घेतला पटीं । हिच्या सामर्थ्याचा विस्तार इतका मोठा आहे, म्हणून तर ती त्या अनावर पुरुषालाही आपल्या वावांत ठेवते. ९८ वास्तविक पहातां त्या पुरुषाला कांहींच नाहीं. तो पूर्णपणे उदासीन असतो; पण त्याचं सर्व कांहीं ही प्रकृतीच आपण स्वतः होते. ९९ त्या स्वयंभूची उत्पत्ति, त्या निराकाराची मूर्ति आणि स्थिति, हीच प्रकृति होते. १००० त्या अचाडाची चाड, स्वयंपूर्णाचा संतोष, अजाताची कुली व गोत, १ त्या अवर्णनीयाचें लक्षण, त्या अपाराचे आकारप्रमाण, त्या मनोहीनाचें मन आणि बुद्धि, २ त्या निराकाराचा आकार, त्या व्यापारहीनाचा व्यापार, त्या अहंकारहीनाचा अहंकार, ३ त्या अनाम्याचें नाम, अजन्म्याचें जन्म, निष्कयचें कर्म, ४ त्या निर्गुणाचे गुण, चरणहीनाचे चरण, अकर्णाचे कान, नयनहीनाचे डोळे, ५ त्या अभावाचे भाव, अवयवरहिताचे अवयव, किंबहुना त्या पुरुषाचे सर्व कांहीं ही प्रकृतीच आपण बनते. ६ अशा रीतीनें या प्रकृतीच्या व्यापक विस्तारानें तो विकारहीन पुरुष विकारांमध्ये ओढला जातो. ७ याच्या ठिकाणीं जं पुरुषत्व असतं, ते केवळ या प्रकृतीच्या अस्तित्वानंच आलेलें असतें. अमावास्येच्या हातीं जसा चंद्र पडला म्हणजे तो काळा होतो, किंवा अगदीं चोख सोन्यांत एक वालभरच डांक मिसळला म्हणजे त्या सोन्याचा कस जसा पंधरावरून पांचावर येतो, ८, ९ किंवा जसा सज्जन पुरुष पिशाचाचा संचार झाल्यामुळे घाणेरडे व्यवहार करतो, किंवा ढगांच्या संगाने सुदिनाचा दुर्दिन होतो, १०१० जसें जनावराच्या पोटांत दूध असावें, अथवा लांकडांत अग्नि असावा, किंवा रत्नदीप वस्त्रांत गुंडाळलेला १ डांक हीण. २ हडळ, पिशाची. ६७