पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५२८ सार्थ श्रीज्ञानेश्वरी उदास अभोक्ता । परि इया पतिव्रता । भोगविजे ||५|| जियतें अळुमाळु | रूपा गुणाचा चाळढोछु । ते भलतैसाही खेळु । लेखा आणी ॥ ८६ ॥ इये प्रकृती तंव । गुणमयी हेंचि नांव । किंबहुना सावेव । गुण तेचि हे ॥८७॥ प्रतिक्षण नित्य नवी | रूपा गुणाचीच आघवी । जडातेंही माजवी । इयेचा माजु ॥ ८८ ॥ नामें इयें प्रसिद्धे । सस्नेहें इया स्निग्धें । इंद्रियें प्रबुद्धे । इयेचेनि ॥ ८९ ॥ कायि मन हैं नपुंसक । कीं तें भोगी तीन्ही लोक । ऐसऐसें अलौकिक । करणें इयेचं ॥ ९९० ॥ हे भ्रमाचें महाद्वीप । हे व्याप्तीचें रूप । विकार उमप । इया केले ॥ ९१ ॥ हे कामाची मांडवी । हे मोह- वनींची माधवी । इये प्रसिद्धचि दैवी । माया हें नाम ॥ ९२ ॥ हे वाङ्मयाची वाढी । साकारपणाची जोडी । प्रपंचाची धाडी | अभंग हे ॥ ९३ ॥ कळा येथून जालिया । विद्या इयेच्या केलिया । इच्छा ज्ञान क्रिया । वियाली हे ॥ ९४ ॥ हे नादाची टांकसाळ । हे चमत्काराचें वेळाळ । किंबहुना सकळ । खेळु इयेचा ॥ ९५ ॥ जे उत्पत्ति प्रलयो होत । ते इयेचे सायंप्रात । हें असो अद्भुत । मोहन हे ॥ ९६ ॥ हे अद्र्याचें दुसरें | हे निःसंगाचें सोयरें । हे निराळेंसि घरें | नांदतु असे ॥ ९७ ॥ तो स्वतः म्हणशील तर कांहीं करीत नाहीं, तो अगदीं उदासीन असतो, त्याला भोगाचा हव्यास नाहीं, पण ही पतिव्रता त्याला भोग बळेंच भरवते ! ८५ ती आपल्या रूपगुणांची घालमेल करून जराशी चुणूक दाखविते; आणि वाटेल तें नाटक बळेंच करते ! ८६ या प्रकृतीला तर 'गुणमयी ' हें नांव आहे, किंबहुना ही गुणांची प्रत्यक्ष मूर्तीच आहे. ८७ ही क्षणोक्षणीं रूपगुणांचे नवेनवे ढंग दाखविते आणि हिच्यामुळेच जडांना माज चढतो. ८८ हीच नांवांना प्रसिद्धि देते, हीच स्नेहाला ओलावा देते, आणि हीच इंद्रियांना जागे करते. ८९ हें मन नपुंसक कसें म्हणावें ? कारण, ही प्रकृति तर त्या मनाला तीन्ही लोकांचा भोग घेण्यास लाविते ! या बाईचें चरित्र असें कांहीं विलक्षण आहे ! ९९० ही भ्रमाचा अफाट प्रदेश आहे, ही अमर्यादपणाची मूर्ति आहे, ही सर्व प्रकारचे विकार उत्पन्न करते. ९१ ही वासनावल्लीची मांडुकली आहे, ही भ्रान्तिवनाची वसन्तलक्ष्मी आहे, म्हणून हिला 'दैवी माया' हें सुप्रसिद्ध नांव देण्यांत येतें. ९२ शब्दसृष्टीचा विस्तार ही करते, हें नामरूपात्मक जग हीच उभारते, आणि या प्रपंचाचा घाला हीच निरंतर घालते. ९३ कला, विद्या, इच्छा, ज्ञान, आणि क्रिया, हीं सर्व हिच्यापासून होतात. ९४ नादांचीं नाणी पाडणारी टांकसाळ हीच, चमत्काराचे मंदिर हीच, किंबहुना हें समस्त विश्वाचें नाटक हिनेंच सजविलं आहे. ९५ विश्वाची उत्पत्ति आणि लय म्हणजे या प्रकृतीची प्रातः संध्या आणि सायंसंध्या होत. एकंदरीत, ही प्रकृति म्हणजे एक विलक्षण मोहनी आहे. ९६ ही अद्वयाची जोडीदार आहे, ही संगरहिताची नातलग आहे, कारण, ही शून्यांत घरे बांधून त्यांत नांदते ! ९७ १ थोडासा २ हालचाल, ३ असंख्य ४ घर.