पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तेरावा ५२७ तें सत्कर्म म्हणिजे । रजोगुणें निपजे । मध्यम तें ॥ ७४ ॥ जे कां केवळ त । होती जियें कर्मै । निषिद्धे अधर्मे । जाण तियें ॥ ७५ ॥ ऐसेनि संतासंतें। कर्मै प्रकृतीस्तव होतें । तयापासोनि निर्वाळतें । सुखदुःख गा ॥७६॥ असंतीं दुःख उपजे । सत्कर्मी सुख निफजे । तया दोहींचा बोलिजे । भोगु पुरुषा ॥ ७७ ॥ सुखदुःखें जंववरी । निफजती साचोकारीं । तंव प्रकृति उद्यमु करी । पुरुष भोगी ॥ ७८ ॥ प्रकृतिपुरुषांची कुळवाडी । सांगतां अंसंगडी । जे आंबुली जोडी | आंबुला खाय ॥ ७९ ॥ आंला आंबुलिये । संगती ना सोये । कीं आंबुली जग विये । चोज ऐका ॥ ९८० ॥ पुरुषः प्रकृतिस्थो हि भुङ्गे प्रकृतिजान्गुणान् । कारणं गुणसङ्गोऽस्य सदसद्योनिजन्मसु ॥ २१ ॥ सम॰—गुण प्रकृतिचे भोगी प्रतिबिंबोनि तज्जळीं । नाना योनिनिमित्ता या पुरुषा भोगवासना ॥ २१ ॥ आर्या-प्रकृतिस्थ पुरुष होउनि भोगि प्रकृतिगुणचि नेणुनी माया । अधमोत्तम योनिंतही कारण गुणसंग यास जम्माया ओवी - पुरुष प्रकृतिमाजी असोन । भोगी प्रकृतीचे गुण । ऐसें गुणसंगेकरून । नानायोनीं जम्मतो ॥ २१ ॥ अनंगु तोपें । निकवँडा नुसधा । जीर्णु अतिवृद्धा । पासोनि वृद्ध ॥८१॥ तया आडनांव पुरुखु । एन्हवीं स्त्री ना नपुंसकु । किंबहुना एकु । निश्चय नाहीं ॥ ८२ ॥ तो अचक्षु अश्रवणु | अहम्तु अचरणु । रूप ना वर्णु | नाम आथी ॥८३॥ अर्जुना कांहींचि जेथ नाहीं । तो प्रकृतीचा भर्ता पाहीं । कीं भोगणें ऐसयाही | सुखदुःखाचें ॥ ८४ ॥ तो तरी अकर्ता । होय; ७४ आणि जी कर्मे निव्वळ तमोगुणानें घडतात, तीं सर्व अधम कर्मे होत, तीं निषिद्ध समजावीं. ७५ अशा रीतीनें भलींबुरीं कर्मै प्रकृतीपासून उत्पन्न होतात आणि कर्मापासून सुखदुःख संभवतें. ७६ दुष्ट कर्मानें दुःख उत्पन्न होतें आणि सत्कर्मापासून सुख निपजतें, आणि या दोहोंचा उपयोग पुरुषाला घडतो. ७७ जोंपर्यंत हीं सुखदुःखं सत्य आहेत असें भासतें, तोंपर्यंत प्रकृति हा सुखदुःखोत्पादनाचा खटाटोप सारखा चालू ठेवते आणि पुरुषही त्यांचा उपभोग घेतो. ७८ या प्रकृतिपुरुषांचा संसार सांगूं गेलें तर तो मोठा विचित्रच आहे ! कारण, बायको जें मिळविते, तें नवरा खातो! ७९ हीं नवरा बायको कधीं एकत्र परस्परसंगतींत नीटशी राहात नाहींत, तरी पण त्या बायकोच्या पोटीं हैं सर्व जग निपजतें, हें केवढे नवल बरें ? ९८० हा नवरा निराकार, निष्क्रिय, नुसता निर्गुण, आणि जुना, पुराणाहून पुराण, असा आहे. ८१ त्याला 'पुरुष' हें केवळ टोपणनांव आहे; वास्तविक पहातां, तो स्त्री नाहीं कीं नपुंसकही नाहीं; किंबहुना तो काय आहे, ह्याचा एक निश्चयच होत नाहीं. ८२ त्याला डोळे, कान, हात, पाय, घर्ण, नाम, यांतलें कांहीं एक नाहीं. ८३ अर्जुना, अशा प्रकारें ज्याला कांहीं आहे असे म्हणतांच येत नाहीं, तो पुरुष या प्रकृतीचा पति आहे आणि त्यालाही तिच्यामुळे सुखदुःखाचा भोग घडतो. ८४ १ संसार, २ असंबद्ध, विचित्र ३ बायको, ४ नवरा, ५ अंगहीन. ६ पांगळा. ७ मिर्धन.