पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५२६ सार्थ श्रीज्ञानेश्वरी नांवें । जें सांगितलें आघवें । तेंचि एथ जाणावें । प्रकृति हे गा ।। ६३ । आणि क्षेत्र ऐसें । जयातें म्हणितलें असे । तो पुरुष हैं अनारिसें । न बोलों घेईं ॥ ६४ ॥ इयें आनानें नांवें । परि निरूप्य आन नोहे । हें लक्षण न चुकावें । पुढतपुढती || ६५|| तरी केवळ जे सत्ता । तो पुरुष गा पांडुसुता । प्रकृति ते समस्तां । क्रियां नाम ॥ ६६ ॥ बुद्धि इंद्रियें अंतःकरण । इत्यादि विकारभरण । आणि ते तीन्ही गुण । सत्त्वादि ॥ ६७ ॥ हा आघवाचि मेळावा | प्रकृती जाहला जाणावा । हेचि हेतु संभवा । कर्माचिया ॥ ६८ ॥ कार्यकारणकर्तृत्वे हेतुः प्रकृतिरुच्यते । पुरुषः सुखदुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते ॥ २० ॥ सम॰—कर्तेपण प्रकृति दे हेतु हे कार्य-कारणीं । भोक्तृत्व सुख-दुःखांचा हेतु हा पुरुष स्वयें ॥ २० ॥ आर्या - हे प्रकृति कार्य कारण कर्तृत्वीं कथियली समज हें तूं । तैसा सुखदुःखाचा भोक्तृस्वीं पुरुष बोलिला हेतु ॥२०॥ ऑवी—कार्य कारण कर्तृत्व । तिहींचे प्रकृतीस कारणख । सुखदुःखभोगीं पुरुषास हेतुत्व । ऐसें बोलिजे ॥ २१ ॥ तेथ इच्छा आणि बुद्धि | घडवी अहंकारेंसी आधीं । मग तिया लाविती वेधीं । कारणाच्या ।। ६९ ।। तेंचि कारण ठाकावया । जें सूत्र धरणें उपाया । तया नांव धनंजया । कार्य पैं गा ॥ ९७० ॥ आणि इच्छामदाच्या थावीं । लागली मनातें उठवी । तें इंद्रियें राहाटवी । हें कर्तृत्व पैं गा ॥७१॥ म्हणोनि तीन्ही या जाणा । कार्यकर्तृत्व कारणा । प्रकृति मूळ हे राणा । सिद्धांचा म्हणे ॥ ७२॥ एवं तिहींचेनि समवायें । प्रकृति कर्मरूप होये । परि जया गुणा वाढे त्राये । त्याचि सारिखी ॥ ७३ ॥ जें सत्त्वगुणें अधिष्ठिजे | 6 शब्दानें जें दर्शविण्यांत आलें आहे, तें तें सर्व ही ' प्रकृति ' होय. ६३ आणि ' क्षेत्रज्ञ ' म्हणजे ' हा पुरुष ' होय, हें आतां निराळें सांगावयास नकोच. ६४ यांना जरी हीं निरनिराळीं नांवें आहेत, तरी त्यांत जे निरूपणाचे तत्त्व आहे, तें एकच आहे, ही गोष्ट विसरतां कामा नये, हेंच पुन्हां पुन्हां तुला सांगावयाचें आहे. ६५ अर्जुना, यांत जी सत्ता म्हणजे सत्यांश आहे, तो पुरुष समजावा, आणि त्याच्या आधारें चालणारी किया म्हणजे प्रकृति समजावी. ६६ बुद्धि, इंद्रियें, अंतःकरण, इत्यादि विकार उत्पन्न करणाऱ्या शक्ति आणि सत्त्वादि तीन गुण, ६७ ह्या सर्व गोष्टींचा समूह प्रकृतीपासून झाला आहे आणि तीच सर्व क्रियांचं मूळ आहे. ६८ या व्यवस्थेत प्रकृति प्रथमतः अहंकारासह इच्छा आणि बुद्धि यांना उत्पन्न करते आणि मग त्यांना कारणाच्या नादाला लाविते; ६९ आणि असें आरंभलेलें कर्म सिद्धीस नेण्यासाठीं जे निरनिराळे युक्तीचे धागेदारे ताणावे लागतात, त्यांनाच 'कार्य' हें नांव आहे. ९७० आणि मग इच्छेच्या उन्मादाच्या द्वारे ती प्रकृति मनाला चाळविते, आणि तें चळलेलें मन इंद्रियांना राबवतें; हेच प्रकृतीचं ' कर्तृत्व ' ७१ म्हणून सिद्धजनश्रेण श्रीकृष्ण म्हणतात, कीं " कार्य, कर्तृत्व, व कारण, या तिहींचंही मूळ ही प्रकृतीच आहे. ७२ अशा प्रकारें या त्रिपुटीद्वारें प्रकृति कर्मरूप होते, परंतु सत्त्वादि त्रिगुणांपैकीं ज्या गुणाचा विशेष उत्कर्ष झाला असेल, त्याच गुणानें ती रंगते. ५३ सत्त्वगुणानें जं कर्म घडतें तें सत्कर्म; रजोगुणानें जं कर्म निपजतें, ते मध्यम कर्म होय