पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तेरावा ५२५ अज्ञान । हे भाग केले अवधान । जाणोनि तुझें ॥ ५२ ॥ आणि ऐसे नही पार्थो । जरी हा अभिप्रावो तुज हाता । न ये तरी हे व्यवस्था । एक वेळ सांगों ॥ ५३ ॥ आतां चौठायीं न करूं । एकही म्हणोनि न सरूं । आत्मानात्मया धरूं । सरिसा पाडु ॥ ५४ ॥ परि तुवां येतुलें करावें । मागों तें आम्हां देयावें । जे कानाचें नांव ठेवावें । आपण पैं गा ॥ ५५ ॥ या श्रीकृष्णाचिया बोला । पार्थ रोमांचितु जाहला । तेथ देवो म्हणती उगला । उचंवळें ना ॥ ५६ ॥ ऐसेनि तो येतां वेगु । धरूनि म्हणे श्रीरंगु । प्रकृतिपुरुपविभागु । परिसें सांगों ॥ ५७ ॥ जया मार्गातें जगीं । सांख्य म्हणती योगी । जयाचिये भाटिवेलागीं । मी कपिल जाहलों ॥ ५८ ॥ तो आईक निर्दोखु । प्रकृतिपुरुषविवेकु । म्हणे आदिपुरुखु । अर्जुनातें ॥ ५९ ॥ प्रकृतिं पुरुषं चैव विद्धयनादी उभावपि । विकारांश्च गुणांश्चैव विद्धि प्रकृतिसंभवान् ॥ १९ ॥ सम० - प्रकृती आणि पुरुष जाण दोघे अनादि हे । गुणां विकारां उत्पत्ति जाण प्रकृतिपासुनी ॥ १९ ॥ आर्या-पुरुष प्रकृती दोनी जाण अनादी कधीं न उद्भवती । गुण आणि विकारहि ते प्रकृतीपासाव जाण संभवती १९ ओवी - प्रकृतिपुरुषांची स्थिति । उभयवर्ग अनादि असती । प्रकृतिपासूनी विकार होती । ऐसें जाण तूं ॥ १९ ॥ तरि पुरुष अनादि आथी। आणि तेंचि लागोनि प्रकृति । संवसरिसीं दिवोराती | दोनी जैसीं ।। ९६० ।। कां रूप नोहे वायां । परी रूपा लागली छाया । निकणु वाढे धनंजया | कणसीं कोंडा ॥ ६१ ॥ तैसीं जाण जवटें । दोन्ही इयें एकवटें । प्रकृतिपुरुष प्रकटें | अनादिसिद्धे ।। ६२ ।। पैं क्षेत्र येणें ज्ञान, ज्ञेय, आणि अज्ञान, असे आम्हीं चार भाग पाडले. ५२ आणि अर्जुना, इतकें करूनही जर ही व्यवस्था तुला अजून बरोबर उमजली नसेल, तर ती आणखी एकदां पुन्हां सांगतों. ५३ आतां हे चार भाग करीत नाहीं आणि एकत्वही प्रतिपादित नाहीं, तर आत्मा व अनात्मा यांचा एकराशीनें विचार करतों. ५४ पण आम्हीं जें मागत आहों तें मात्र देण्याचें तूं केलें पाहिजेस; तें मागणें इतकेंच, कीं, तूं आपल्या मनोभावाचा कान करून हे ऐकावेंस. " ५५ हें कृष्णवचन ऐकून अर्जुन आनंदानें रोमांचित झाला. तेव्हां देव त्याला म्हणाले, "अरे, शांत हो, असा गहिवरून येऊं नको !” ५६ असो, अशा प्रकारें अर्जुनाचें हृदय दाटून आलें असतां श्रीकृष्ण म्हणाले, “आतां तुला प्रकृतिपुरुषाचें प्रकरण सांगतों. ५७ ज्या तत्त्वज्ञानाच्या संप्रदायाला योगीजन 'सांख्ययोग ' म्हणतात आणि ज्याचें महत्त्व प्रसिद्धीस आणण्याकरितां मी कपिलावतार धारण केला, ५८ तो प्रकृतिपुरुषाचा निर्दोष विचार श्रवण कर. " असं श्रीकृष्ण अर्जुनास म्हणाले. ५९ दिवस आणि रात्रि यांच्या जोडीप्रमाणें पुरुष आणि प्रकृति हीं दोन्ही अनादि आहेत, असें तूं समज. ९६० अर्जुना, रूप कांहीं खोटें नव्हे, पण खऱ्या रूपावरोबर छायाही येतेच; किंवा पिकाच्या कणशींत धान्यकणावरोवर कोंडयाचीही वाढ होतेच, ६१ त्याचप्रमाणें पुरुष आणि प्रकृति हीं दोन्ही एकमेकांच्या संगतीं अगदीं डकलेलीं असून अनादिसिद्ध आहेत. ६२ तसंच ' क्षेत्र' या