पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५२४ सार्थ श्रीज्ञानेश्वरी इति क्षेत्र तथा ज्ञानं ज्ञेयं चोक्तं समासतः । मद्भक्त एतद्विज्ञाय मद्भावायोपपद्यते ॥ १८ ॥ सम० - संक्षेपें क्षेत्रही ज्ञान ज्ञेयही बोलिलों क्रमें । हें माझा भक्त जाणूनि मत्स्वरूपास पावतो ॥ १८ ॥ आर्या - ऐसें क्षेत्रज्ञान ज्ञेयहि उपदेशिलेंचि संक्षेपें । मन्नत जाणुनी हें मद्भावा पावती अविक्षेपें ॥ १८ ॥ ओवी - क्षेत्र आणि ज्ञान । ज्ञेय सांगितले संक्षेपॅकरून । जो माझा भक्त जाणोन । माझा प्रसाद पावे ।। १८ ।। एवं तुजपुढां । आदीं क्षेत्र सुहाडा । दाविलें फाडोवाडां । विवंचुनी ॥ ९४० ॥ तैसेंचि क्षेत्रापाठीं । जैसेनि देखसी दिठी । तें ज्ञानही किरीटी । सांगितलें ॥ ४१ ॥ अज्ञानाही कौतुकें । रूप केलें निकें । जंव ओयणी तुझी टेंके | पुरे म्हणे ॥ ४२ आणि आतां हैं रोकडें । उपपत्तीचेनि पवाडें । निरूपिलें उघडें । ज्ञेय पैं गा ॥ ४३ ॥ हे आघवीच विवंचना । बुद्धि भरोनि अर्जुना । मत्सिद्धि भावना | माझिया येती ॥ ४४ ॥ देहादि परिग्रहीं | संन्यासु करूनियां जिहीं । जीवु माझ्या ठाईं । वृत्तिंकु केला ॥ ४५ ॥ ते मातें किरीटी । हैंचि जाणोनियां शेवटीं । आपणपयां सांटोवाटीं । मीचि होती ॥४६॥ मीचि होती परी । हे मुख्य गा अवधारीं । सोहोपी सर्वांपरी । रचिली आम्हीं ॥ ४७ ॥ कडां पायरी कीजे । निराळीं माचु बांधिजे । अथाव सुजे । तरी जैसी ॥ ४८ ॥ एहवीं आघवेंचि आत्मा | हें सांगों जरी वीरोत्तमा । तरी तुझिया मनोधर्मा | मिळेल ना ॥ ४९ ॥ म्हणोनि एकचि संचलें । चतुर्धा आम्हीं केलें । जें अदळपण देखिलें । तुझिये प्रज्ञे ॥ ९५० ॥ पैं बाळ जैं जेवविजे । तैं घांसु विसा ठायीं कीजे । तैसें एकचि हें चतुर्व्याजें । कथिलें आम्हीं ॥ ५१ ॥ एक क्षेत्र एक ज्ञान । एक ज्ञेय एक सुज्ञा अर्जुना, याप्रमाणें मी तुला प्रथम ' क्षेत्र' म्हणजे काय हें स्पष्ट करून सांगितलें. ९४० तसेंच क्षेत्राच्या प्रकरणानंतर ज्ञानाचीं लक्षणें कथन केलीं. ४९ नंतर अज्ञानाचेंही स्वरूप इतक्या विस्ताराने वर्णिलें, कीं तूं ऐकतां ऐकतां टेंकीसच आलास ! ४२ आणि आतां स्वच्छ फोड करून तुला ज्ञेयाचें स्वरूप समजावून दिले आहे. ४३ अर्जुना, हें सर्व विवरण बुद्धींत उसलें म्हणजे माझ्या प्राप्तीची उत्कंठा माझ्या भक्तांना होते. ४४ ज्यांनीं देहादि सर्व विषयांचा संन्यास करून आपला प्राण माझ्या सेवेला लाविला, ४५ अर्जुना, ते मला ब्रह्मरूपाने ओळखून, अंतीं आपलें व्यक्तित्व विसरून मद्रूप होतात. ४६ अरे, हें लक्षांत घे, कीं मद्रूप होणं हाच सोपा उपाय आम्हीं सजविला आहे. ४७ कड्याला जशी पायरी करावी, किंवा उंच होण्यासाठीं जसा माचा बांधावा, अथवा पूर आला असतां जशी तरण्याकरितां होडी लोटावी, त्यांतलाच हा प्रकार आहे. ४८ नाहींतर, है वीरश्रेष्ठा अजुना, 'सर्व कांहीं आत्मा आहे,' असें नुसतं सांगून तें तुझ्या मनाला कधीही पटलें नसतं. ४९ म्हणून तुझ्या बुद्धीचा मंदपणा ध्यानीं घेऊन, आम्हीं एकाच परब्रह्माचे चार विभाग करून, तें वर्णिलें आहे. ९५० अरे, मुलाला भरवावयाचें असले म्हणजे जसे एकाच घांसाचे दहावीस निरनिराळे लहान लहान घांस करावे लागतात, तसेच आम्हीं एका ब्रह्माचे चार विभाग करून कथन केले आहे. ५१ तुझ्या ग्रहणशक्तीचं अनुमान करून, ब्रह्माचें क्षेत्र, १ तृप्ति. २ सेवक, ३ बदला, ४ पुति