पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय पहिला २७ दोषैरेतैः कुलघ्नानां वर्णसंकरकारकैः । उत्साद्यंते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वताः ॥ ४३ ॥ उत्सन्न कुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन । नरके नियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम ॥ ४४ ॥ अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयम् । यद्राज्यसुखलोभन हंतुं स्वजनमुद्यताः ॥ ४५ ॥ सम० या दोषीं त्या कुलप्नांच्या वर्णसंकर हेतु जे । बुडती जातिचे धर्म कुलधर्महि शाश्वत ॥ ४३ ॥ गेले ज्यांचे वंश-धर्म मनुष्यांचे जनार्दना । नरकीं निश्वयें वास तयां आइकतों असें ॥ ४४ ॥ महापापी कटकटा आम्हीं निश्चय मांडिला । कीं राज्यलो में स्वजनां मारायाला प्रवर्तलों ॥ ४५ ॥ आर्या-यावरि वंशप्नांची संकर-रीती अचाट दुष्कर्म । होतां तेचि करीती मुळिचे उत्सन्न जातिकुळधर्म ॥४३॥ ज्या मनुजाच्या वंशीं यापरि उच्छिन्न धर्म ते असती । ऐकिलें ऐसें कीं त्याला नरकामधें सदा वसती ॥ ४४ ॥ आश्चर्य हैचि आतां आम्ही करणार पापसिंधूर्ते । राज्यसुखाचे लोर्भे माराया सिद्ध सर्व बंधू ॥४५॥ ओव्या—म्हणोनि कुलप्नाचे दोष थोर । तेणें होय वर्णसंकर । बुडे कुळधर्म आचार । जातिधर्म तेही ॥ ४३ ॥ अधर्म झालियावरी । नरकीं वास अघोरीं। है आपके श्रीहरी । स्वामी जनार्दना ! ॥ ४४ ॥ हॅ तंव आश्चर्य थोर । राज्यलो में दोषकर । स्वजन मारूनि सुखकर । इच्छितों जी श्रीकृष्णा ! ॥ ४५ ॥ देवा अवधारी आणीक एक । एथ घडे महापातक । जे संगदोपें हा लौकिक । भ्रंशु पावे ॥ ५७ ॥ जैसा घरीं आपुलां । वानिवसें अभि लागला । तो आणिकांही प्रज्वळिला | जाळूनि घाली ॥ ५८ ॥ तैसिया तया कुळ- संगती । जे जे लोक वर्तती । तेही बाधा पावती । निमित्तें येणें ॥ ५९ ॥ तैसें नाना दोपें संकुळ । अर्जुन म्हणे तें कुळ । मग महाघोर केवळ । निरय भोगी ॥ २६० ॥ पडिलिया तिये ठायीं । मग कल्पांतीही उकल नाहीं । येणें पतन कुळक्षयीं । अर्जुन म्हणे ॥ ६१ ॥ देवा हें विविध कानीं ऐकिजे । परी अझुनिवरी त्रानुपजे । हृदय वज्राचें हें काय कीजे । अवधारीं पां ॥६२॥ अपेक्षिजे राज्यसुख । जयालागीं तें तंव क्षणिक । ऐसें जाणतांही दोख । अव्हेरूं ना ।। ६३ ।। जे हे वडिल सकळ आपुले । वधावया दिठी संदले । सांग पां काइ थेकुलें । घडलें आम्हां ।। ६४ ।। 'देवा, आणखीही एक महापातक यांत घडतें तें ऐका. या पतित झालेल्या एका कुळाच्या दुष्ट संगाने इतर लोकही आचारभ्रष्ट होतात. ५७ जशी आपल्या घराला अकस्मात् लागलेली आग इतरांच्या घराला लागून त्यांनाही जाळून भस्म करिते, ५८ तशीच असल्या कुळाची संगति ज्या लोकांना घडते, ते ते तिच्यामुळे पातकी होतात. ५९ अशाच प्रकारच्या नानादोषांनी ग्रासलेलें तें कुळ मग केवळ भयंकर नरकवासालाच पात्र होतें. " असें अर्जुन म्हणाला. २६० तो पुढें म्हणतो, 66 अशा रीतीनें नरकलोकीं तें कुछ एकदा गेलें, कीं, कल्पान्तींही त्याची सुटका होत नाहीं. अशी निरन्तर अधोगति कुळाचा घात केल्यामुळे घडते. ६१ देवा, ही माझी नानापरींची वटवट तुम्हीं ऐकिली, परंतु अद्याप तुमच्या वृत्तीत चलबिचल कांहींच दिसत नाहीं ! तुम्हीं आपलें हृदय वज्राचें केले आहे कीं काय ? अहो, पुन्हां लक्ष देऊन श्रवण करा. ६२ ज्याच्याकरितां या राज्यसुखाची इच्छा करावी, तें शरीरादि सर्वच जर क्षणभंगुर आहे, तर हा दोष जाणत असतांही आम्हीं त्याचा तिटकारा करूं नये काय ? ६३ अहो, या सर्व वडील माणसांना मारण्याचा हेतु मनांत धरून, आम्हीं त्यांच्याकडे नजर टाकली, हेच काय लहान पाप आमच्या हातून घडलें आहे ? बोला बरं. ६४ १ देववशात्, अकस्मात् २ सुटका, ३ घातले.