पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तेरावा ५२३ ज्योतिषामपि तज्ज्योतिस्तमसः परमुच्यते । ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य धिप्रितम् ॥ १७॥ सम० - प्रकाशी अंधकारातें असोनि ज्योति वेगळी । ज्ञान ज्ञेय ज्ञानलभ्य सर्व चिर्ती अधिष्ठित ॥ १७ ॥ आर्या- ज्योतींत ज्योति असे वर्णियले पांडवा तमा परतें । ज्ञान ज्ञेय ज्ञानप्राप्यहि सर्वांतरीं न यापरतें ॥ १७ ॥ ओवी - ज्योतींत जें ज्योती । अज्ञानाहूनि पर बोलती । ज्ञानज्ञेय असें म्हणती । सर्व चित्तीं अधिघून असे ॥ १७ ॥ जें अमीचें दीपन । जें चंद्राचें जीवन । सूर्याचे नयन । देखती जेणें ॥ २७ ॥ जयाचे उजियेडें । तारागण उभडे । महातेज सुरवाडें । राहाटे जेणें ॥ २८ ॥ जें आदीची आदि । जें वृद्धीची वृद्धि । बुद्धीची जें बुद्धि । जीवाचा जीवु ॥ २९ ॥ जें मनाचें मन । जें नेत्राचे नयन | कानाचे कान | वाचेची वाचा ॥ ९३० ॥ जें प्राणाचा प्राण | जें गतीचे चरण । क्रियेचें कर्तेपण । जयाचेनि ॥३१॥ आकारु जेणें आकारे । विस्तारू जेणें विस्तारे | संहारू जेणें संहारे । पांडुकुमरा ॥ ३२ ॥ जें मेदिनीची मेदिनी । जें पाणी पिऊन असे पाणी । तेजा दिवेलावणी । जेणें तेजें ॥ ३३ ॥ जें वायूचा श्वासोश्वासु । जें गगनाचा अवकाशु | हें असो आघवाचि आभासु । आभासे जेणें ॥ ३४ ॥ किंबहुना पांडवा । जें आघवेंचि असे आघवा । जेथ नाहीं रिगावा | द्वैतभावासी ||३५|| जें देखिलियाचिसवें । दृश्य द्रष्टा हें आघवें । एकवाट कालवे । सामरस्यें ॥ ३६ ॥ मग तेंचि होय ज्ञान । ज्ञाता ज्ञेय हन । ज्ञानें गम स्थान । तेंहि तेंचि ||३७|| जैसे सरलियां लेख । आंख होती एक । तैसें साध्यसाधनादिक । ऐक्यासि ये || ३८ ॥ अर्जुना जिये ठायीं । न सरे द्वैताची लिही । हें असो जें हृदयीं । सर्वांच्या असे ॥ ३९ ॥ जें अम्मीचा प्रकाश आणि चंद्राचें प्रभारहस्य आहे; ज्यानें सूर्याला डोळसपण येतें; २७ ज्याच्या तेजानें तारागण चकाकतात, आणि ज्याच्या आधारानें महातेज सुखानें जगांत मिरवतें; २८ जें आदीची आदि, वाढीची वाढ, बुद्धीची बुद्धि, जीवाचा जीव, मनाचे मन, डोळ्यांचा डोळा, कानाचा कान, वाचेची वाचा, प्राणाचा प्राण, गतीचे पाय, क्रियेची क्रियाशक्ति, आकाराचा आकार, विस्ताराचा विस्तार, संहाराचा संहार, पृथ्वीची पृथ्वी, पाण्याचें पाणी, तेजाचें तेज, वायूचा श्वासोच्छ्वास, आणि गगनाचें गगन आहे, म्हणजे, अर्जुना, जं या सर्वाचें चैतन्यबीज आहे, ज्याच्यामुळे ही सर्व स्फुरण पावतात, २९, ३०, ३१, ३२, ३३, ३४ एकंदरीत, अर्जुना, जें सर्वामध्यें एकटेंच सर्वस्वरूप होतें, आणि ज्याच्या ठिकाणीं द्वैताचा गंधही संभवत नाहीं; ३५ ज्याचें दर्शन घडल्याबरोबर दृश्य वटा हे समरसपणें एकवटून जातात, ३६ मग तेंच ज्ञान होतें, तेंच ज्ञान व ज्ञेय होतें, आणि ज्ञानाने जें स्थळ मिळवावयाचें असतें तेंही तेच होते. ३७ जसा एकदा हिशोबाचा ताळा जमला म्हणजे हिशोबांतील आंकड्याचे वेगळेवेगळेपण उरत नाहीं, त्याप्रमाणं ब्रह्मवस्तु प्राप्त झाली असतां साध्यसाधनादि सर्व एकत्र एकवटून जातात, ३८ अर्जुना, ज्याच्याविषयीं द्वैताचा उल्लेखच करतां येत नाहीं; जं सर्वाच्या हृदयांत वसत असतें. ३९ A