पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५२२ सार्थ श्रीज्ञानेश्वरी क्षीरसागरींची गोडी । माजीं बहु थडिये थोडी । हैं नाहीं तया परवडी । पूर्ण जें गा ॥ १६ ॥ स्वेदजादिप्रभृति । वेगळाल्या भूतीं । जयाचिये अनुस्यूती । खोमणें नाहीं ॥ १७ ॥ श्रोमुखटिळका । घटसहस्रां अनेकां- | माजीं विंवोनि चंद्रिका । न भेदे जेवीं ॥ १८ ॥ ★ नाना लवणकणाचिये राशी । क्षारता एकचि जैसी । कां कोडी एकीं उसीं । एकचि गोडी ॥ १९ ॥ तैसें अनेकीं भूतजातीं । जें आहे एकी व्याप्ती । विश्वकार्या सुमती । कारण जें गा ॥ ९२० ॥ म्हणोनि हा भूताकारू । जेथोनि तेंचि या आधारू । कल्लोळा सागरु । जियापरी ॥ २१ ॥ बाल्यादि तीन्ही वयसीं । काया एकचि जैसी । तैसें आदिस्थितिग्रासीं । अखंड जें ॥ २२ ॥ सायंप्रातर्मध्यान्ह । होतां जातां दिनमान । जैसें कां गगन । पालटेना ॥ २३ ॥ अगा सृष्टीवेळे प्रियोत्तमा । जया नांव म्हणती ब्रह्मा । व्याप्ती जें विष्णुनामा | पात्र जाहलें ॥ २४ ॥ मग आकारू हा हारपे । तेव्हां रुद्र जें म्हणिपे । तेंही गुणत्रय जेव्हां लोपे । तैं जें शून्य ॥ २५ ॥ नभाचें शून्यत्व गिळून । गुणत्रयातें नुरऊन । तें शून्य तें महाशून्य । श्रुतिवचनसंमत ॥ २६ ॥ ज्याप्रमाणे क्षीरसागराची गोडी खोल मध्यांत विशेष असते, पण कांठाजवळ कमी असते, असें नाहीं त्याप्रमाणें जें सर्वत्र सारखेंच परिपूर्ण असतें; १६ जारज, अंडज, स्वेदज, व उद्भिज्ज, या चारी खाणींना पूर्णपणे व्यापण्याच्या ज्याच्या स्थितीला कधींही खळ किंवा खंड नसतो; १७ शिवाय, हे श्रोतृशिरोमणि अर्जुना, हजारों मडक्यांतील पाण्यांत चंद्रप्रकाश विंबला, तरी जसा त्यांत भेदभाव उत्पन्न होत नाहीं, १८ किंवा मिठाच्या खड्यांच्या राशींत जशी प्रत्येक खड्याला व्यापून असणारी खारट चव एकरूपच असते, किंवा उसाच्या कांड्यांच्या भारींत जशी कांडी कांडी एकाच प्रकारची गोडी असावी, १९ त्याप्रमाणेंच जें निरनिराळ्या भूतमात्रास एकत्वाने व्यापून राहतें, आणि, हे सुज्ञ अर्जुना, जें या विश्वरूप कार्याचें मूळ कारण आहे; ९२० म्हणून सागरापासून उत्पन्न होणाऱ्या तरंगांना जसा सागरच आधार असतो, तसें हें नामरूपात्मक भूतमात्र ज्यापासून उत्पन्न झालें तें ब्रह्मवस्तूच याला आधार आहे. २१ बाल्य, तारुण्य, आणि वृद्धत्व, या तीन्ही अवस्थांमध्ये देह जसा एकच असतो, तसें आदि, मध्य, व अवसान, या तीन्ही भूतमात्रांच्या स्थितीमध्ये जें अभिन्न राहते; २२ संध्याकाळ, सकाळ, मध्यान्हकाळ, असें क्रमाक्रमानें दिनमान चाललें असतां आकाशांत जसा कांहीं पालट होत नाहीं, तसाच ब्रह्मवस्तूंत कधीही पालट घडत नाहीं. २३ सख्या अर्जुना, विश्वोत्पत्तीच्या समयीं जें 'ब्रह्मा' हें नांव पावलें, विश्वाच्या स्थितिकाळीं ज्याला 'विष्णु' ही संज्ञा मिळाली, २४ आणि अखेर या नामरूपात्मक विश्वाचा लोप होण्याच्या समयीं ज्याला 'रुद्र' म्हणतात, आणि हेंही गुणत्रय लोपून गेलें म्हणजे जें शून्यरूपानें उरतं, २५ गगनाचे शून्यत्व नाहींसें करून, सत्त्वादि तीन्ही गुणांचा लोप करून, जें शून्य उरतें. तंत्र है वेदांनी प्रतिपादिलेले 'महाशून्य' होय. २६