पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तेरावा ५३१ नाहीं । परि तयाच्याचि ठाईं । आभासती ॥ ६ ॥ येतुलेयासाठीं । संभ्रांताच्या पोटीं । ऐसें जाय किरीटी । जें हेंचि धरी ॥ ७ ॥ तरि तें गा धरणें ऐसें । अभ्रातें जेविं आकाशें । कां प्रतिवदन जैसें । आरसेनि ॥ ८ ॥ ना तरी सूर्यप्रतिमंडळ | जैसेनि धरी सलिल । कां रश्मिकरीं मृगजळ । धरिजे जेवीं ॥ ९ ॥ तैसें गा संबंधेविण । यया सर्वांतें धरी निर्गुण । परि तें वायां जाण । मिथ्यादृष्टि ॥ ९९० ॥ आणि यापरी निर्गुणें । गुणातें भोगणें । रंका राज्य करणें । स्वप्नीं जैसें ॥ ११ ॥ म्हणोनि गुणाचा संगु । अथवा गुणभोगु । हा निर्गुणीं लागु । बोलों नये ॥ १२ ॥ वहिरन्तश्च भूतानामचरं चरमेव च । सूक्ष्मत्वात्तदविज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत् ॥ १५ ॥ सम०-~-बाह्यांतरंग भूतांचं तेंचि स्थावर जंगम । अतींद्रियत्वें अकळ दूरि तें तेंचि संनिध ॥ १५ ॥ आर्या-भूर्ती अंतर्बाह्य व्यापक जें चरहि आणि जें अचर । न कळे सूक्ष्म म्हणोनी संनिधवर्ती तसेंहि दूरतर ॥१५॥ ओवी - भूर्ती असे अंतर्बाह्य । चर आणि अचरही होय । सूक्ष्म म्हणोनि जाणावया अशक्य । दूरी असोनि जवळ तें १५ जे चराचर भूतां । माजीं असे पांडुसुता । नाना वन्हीं उष्णता । अभेदें जैसी ॥ १३ ॥ तैसेनि अविनाशभावें । जें सूक्ष्मदशे आघवें । व्यापूनि असे तें जाणावें । ज्ञेय एथ ॥ १४ ॥ जें एक आंतु बाहेरी । जें एक जवळ दुरी । जें एकवांचूनि परी । दुजी नाहीं ॥ १५ ॥ अविभक्तं च भूतेषु विभक्तमिव च स्थितम् । भूतभर्तृ च तज्ज्ञेयं प्रसिष्णु प्रभविष्णु च ॥ १६ ॥ सम० - नसोनि वेगळे भूर्ती वेगळेंसेंहि जें असे गिळी उगळि हीं भूतें घरीही ज्ञेय जाण तें ॥ १६ ॥ आर्या - भिन्नहि नसोनि भूर्ती भिन्नापरि राहतें समग्रासी । तें ज्ञेयहि भूतांचे पोषक अणि निर्मुनी जगनासी ॥१६॥ ओवी - भूतांचे ठायीं अविभक्त असे । परी विभक्तपणे दिले । गिळी उगळी अनायासें । घरी जाणोनि ॥ १६ ॥ गुणांचा गंधही त्याला नसतो, मात्र हे गुण त्या ब्रह्मवस्तूच्या ठायीं भासमान होतात, इतकेंच . ६ परंतु, अर्जुना, या भासाच्याच कारणानें, मोहानें श्रमलेले पुरुष हे विकार ब्रह्माला होतात असें मानतात. ७ परंतु हे विकार ब्रह्माच्याठायीं कसे असतात, तर, जसें आकाशानं ढगांना धारण करावें, किंवा आरशानें प्रतिबिंब कवळायें, ८ किंवा जसें पाण्यानें सूर्याचें प्रतिबिंत्र अथवा किरणांनी मृगजळ धरावें, तसेंच हें निर्गुण ब्रह्मवस्तु या सर्व विकारांना, त्यांशी कोणताही संबंध न ठेवता, धारण करते. परंतु ब्रह्मवस्तूवरील हे विकार केवळ निष्फळ आहेत, ते केवळ दृष्टीला भासमान होतात, पण ते असत्य आहेत. ९१० आणि अशा प्रकारें निर्गुणानें गुणांचा भोग घेणें म्हणजे दरिद्यानें स्वप्नांत राज्य करण्यासारखेच आहे. ११ म्हणून निर्गुणाला उद्देशून, गुणांशी संबंध अथवा गुणांचा उपभोग यांचा कधींही उल्लेख करूं नये. १२ अर्जुना, जें सर्व स्थावरजंगम भूतमात्रांत असतें; अग्नि जरी भिन्न भिन्न असले, तरी उष्णता जशी समभावानें त्यांस व्यापून असते, १३ त्याप्रमाणें जें शाश्वतपणें आणि सूक्ष्म अवस्थेने सर्वास व्यापून असतं, तें या प्रकरणी ' ज्ञेय' समजावें. १४ जे एकच आंतबाहेर, जवळ-दूर असतें, आणि ज्याच्या स्वरूपांत कधींही फरक होत नाहीं; १५. ६६