पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५२० शरीर होऊनि शरीरीं । कर्म जेवीं ॥ ९४ ॥ किंबहुना पांडवा | सोनेंचि सोनयाचा रखा। तैसें जें या सर्वां । सर्वांगीं असे ॥ ९५ ॥ परी खेपणामाजिवडें । तंव रवा ऐसें आवडे । वांचूनि सोनें सांगडें । सोनया जेवीं ॥ ९६ ॥ पै गावोघुचि वांकुडा । परि पाणी उजू सुहाडा । वन्हि आला लोखंडा । लोह नव्हे कीं ॥ ९७॥ घटाकारें वैटाळें । तेथ नभ गमे वाटोळें । मठीं तरी चौफळें | आयें दिसे ॥ ९८ ॥ परि ते आकार जैसे । नोहिजतीचि का आकारों । जें विकार होऊनि तैसें | विकारी नोहे ॥ ९९ ॥ मनमुख्य इंद्रियां । सत्त्वादि गुणां ययां । सारिखें ऐसें धनंजया | आवडे कीर || ९०० || पैं गुळाची गोडी । नोहे बांधया सांगडी । तैसी गुण इंद्रिये फूडीं । नाहीं तेथ ॥१॥ अगा क्षीराचिये दशे । घृत क्षीराकारें असे । परि क्षीरचि नोहे जैसें । कपिध्वजा ॥ २ ॥ तैसें ये विकारी | विकारु नोहे अवधारीं । पैं आकारा नाम भोंबेरी । येर सोनें तें सोनें ||३|| इया उघड महाटिया । तें वेगळेपणें धनंजया । जाण गुणइंद्रियां । पासोनियां ॥ ४ ॥ नामरूपसंबंधु । जातिक्रियाभेदु । हा आकारासीच प्रवादु । वस्तूसि नाहीं ॥ ५ ॥ | तें गुण नव्हे कहीं । गुणा तया संबंध वसतें, शरीररूप होऊन जसें कर्मतत्त्व शरीराला वसवितें, ९४ सारांश, अर्जुना, सोन्याच्या कणांत जसें सोनेंच असतें, तसें तें ब्रह्मवस्तु सर्वस्वरूप होऊन सर्वास अंतर्वाह्य व्यापून असतें. ९५ परंतु, तें सोनें जोपर्यंत रव्याच्या रूपानें असतं, तोंपर्यंत त्याला आपण सोन्याचा रवा म्हणून ओळखतों, तथापि तें त्याचं रूप मोडलें, म्हणजे तो वाच सोनें होतो, ९६ अथवा ओघाला वांकडेपणा असला, तरी पाणी सरळच असतें, किंवा अग्नीनं लोखंड तापून लाल झाले, तरी अग्नि कांहीं लोखंड होत नाहीं, ९७ मडक्याच्या वाटोळेपणामुळें आकाश वाटोळं भासतें, आणि झोंपडीच्या चौकोनी आंखणीनें तें चौरस भासतें ९८ परंतु तो वाटोळा किंवा चौरस आकार आकाशाला खरोखर नसतो, त्याचप्रमाणे ब्रह्मवस्तूच्याठायीं विकार भासले, तरी तें वस्तुतः विकारयुक्त कधींच होत नाहीं. ९९ अर्जुना, तें ब्रह्मवस्तु मन इत्यादि इंद्रियांनीं आणि सत्त्व इत्यादि तीन गुणांनीं आकारले आहे असें वाटतें; ९०० पण गुळाची गोडी जशी त्याच्या ढेपीच्या आकारांत नसते, त्याचप्रमाणें गुण व इंद्रियें हीं कांहीं सत्य ब्रह्मतत्त्व नाहींत. १ अरे, दुधाचें स्वरूपच जोपर्यंत टिकतें, तोंपर्यंत तूपही दुग्धाकारच असतें, परंतु तूप म्हणजे कांहीं दूध नव्हे, २ त्याचप्रमाणें गुणेन्द्रियरूप विकारांनी ब्रह्मवस्तूला विकार जडत नाहीं, ही गोष्ट, अर्जुना, तूं लक्षांत घे. अरे, सोन्याच्या आकाराला आपण फूल, फिरकी, इत्यादि नांवे देतों, पण मूळ सोनें जें आहे, तें कोणत्याही आकारांत सोनंच राहतें. ३ एकंदरीत, अर्जुना, साध्या सरळ बाळबोध भाषेनें सांगावयाचें म्हणजे ब्रह्मवस्तु हें गुण व इंद्रियें यांपासून वेगळे आहे. ४ नामरूपाचा संबंध आणि जातिकियादिक भेद हे सर्व आकाराला आहेत, त्यांची भाषा ब्रह्मवस्तूला मुळींच लागू पडत नाहीं, ५ तें वस्तु गुणरूप नाहीं, १ फिरकी, फूल.