पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तेरावा ५१९ एन्हवीं तरी महामती । विश्वतश्चक्षु इया श्रुति । तयाचिये व्याप्ती । रूप केलें ॥८४॥ वांचूनि हस्त नेत्र पाये । हे भाप तेथ कें आहे । सर्व शुन्याचा न साहे । निष्कर्षु जे ॥ ८५ ॥ पैं कल्लोळातें कल्लोळे | ग्रसिजत असे ऐसें कळे । परि ग्रसितें ग्रासावेगळें । असे काई || ८६ ॥ तैसें साचचि जें एक । तेथ के व्याप्यव्यापक | परि बोलावया नावेक | करावें लागे ॥ ८७ ॥ पैं शून्य जैं दावावें जाहलें । तें बिंदुलें एक केलें । तैसें अद्वैत सांगावें बोलें | तें द्वैत कीजे ॥ ८८ ॥ एन्हवीं तरी पार्था । गुरुशिष्या सत्पथा । आडळु पडे सर्वथा । बोल खंटे ॥ ८९ ॥ म्हणोनि गा श्रुतीं । द्वैतभावें अद्वैतीं । निरूपणाची वाहती । वाट केली ॥। ८९० ॥ तेंचि आतां अवधारीं । इये नेत्रगोचरे आकारीं । तें ज्ञेय गा जयापरी । व्यापक असे ॥ ९१ ॥ सर्वेन्द्रियगुणाभासं सर्वेन्द्रियविवर्जितम् । असक्तं सर्वभृञ्चैव निर्गुणं गुणभोक्तृ च ॥ १४ ॥ सम० – सर्वेद्रियांविरहित विषयेंद्रिय भासक । जीववीं गुणभोक्तें तें जें सर्वाधार निर्गुण ॥ १४ ॥ आर्या - जें सर्वेद्रियवर्जित करि सर्वेद्रिय गुणप्रकाशातें । सर्वाधार असक्तहि निर्गुण परि भोगितो गुणांशातें ॥ १४ ॥ ओवी - सर्वेद्रियगुण भासती । परी इंद्रियें तयां ठायीं नसती । असक्त असोनि सर्वांभूतीं। निर्गुण होवोनि गुण भोगी १४ तरि तें गा किरीटी ऐसें । अवकाशीं आकाश जैसें । पटीं पटु होऊनि असे । तंतु जेवीं ॥ ९२ ॥ उदक होऊनि उदकीं । रसु जैसा अवलोकीं । दीपपणें दीपकीं । तेज जैसें ॥ ९३ ॥ कर्पूरत्वें कापुरीं । सौरभ्य असे जयापरी । केवळ वास्तविक पहातां हे बुद्धिवान् अर्जुना, 'विश्वतश्चक्षु' इत्यादि जें वर्णन वेदांनीं केलें आहे, ब्रह्मवस्तूचें व्यापकपण दाखविण्याकरितां रूपक केलें आहे, म्हणजे अमूर्ताचें मूर्तत्वानें अलंकारिक वर्णन केले आहे; ८४ कारण खरोखर हात, पाय, डोळे इत्यादि त्या वस्तूला कांहींच नसल्यामुळे ही भाषाच त्याला लागू पडत नाहीं, इतकेंच नाहीं तर ज्याला शून्यत्वाने म्हणजे अभावरूपानें केलेलें वर्णनही यथास्थित लागत नाहीं; ८५ वास्तविक म्हटलें तर एका जलतरंगानें दुसऱ्या जलतरंगाला गिटलें, हें जरी आपण समजलों, तरी त्या गिळणाऱ्या व गिळलेल्या तरंगांत स्वरूपतः कांहीं तरी भेद असतो का ? ८६ त्याचप्रमाणें जें एक ब्रह्मवस्तूच सत्य आहे, तेथें व्यापणारें आणि व्यापलेलें हा भेद येणार कोइन ? परंतु केवळ बोलण्याच्या सोईकरितां असा भेद करावा लागतो. ८७ असें पहा, शून्य जर दाखवावयाचें असलें, तर त्याचें दर्शक म्हणून एक बारीक टिंब काढावें लागतें, त्याप्रमाणेंच शब्दानें अद्वैत सांगूं गेलें म्हणजे द्वैताची भाषा योजावीच लागते. ८८ असें केलें नाहीं, तर अर्जुना, गुरुशिष्यांचा संप्रदायच लोपेल आणि सर्व बोलणेंच खुंटेल ! ८९ वेदांनी अद्वैताचे वर्णन अलंकारिक द्वैतभाषेने करण्याचा परिपाठ पाडला. ८९० इंद्रियांनी ग्राह्य होणाऱ्या आकारमात्राला कसें व्यापून असतें, तें ऐक. ९१ याच कारणास्तव म्हणून, तें ब्रह्मवस्तु अर्जुना, अवकाशाला जसें आकाश व्यापून असतें, किंवा पटरूपानें भासमान होऊन जसा तंतु पटाला व्यापून राहतो, तसं हं ब्रह्मवस्तु विश्वाला व्यापतें. ९२ उदकरूपानें रसतत्त्व जसें उदकांत असतं, दीपरूपाने प्रकाशतस्व जसे दीपांत राहतें, ९३ कापराच्या रूपानें गंधतत्त्व. जसें कापरांत