पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५१८ सार्थ श्रीज्ञानेश्वरी वाट जेथें ॥ ७२ ॥ जैसी भांडघटशरावीं । तदाकार असे पृथ्वी । तैसें सर्व होऊनियां सर्वं । असे जे वस्तु ॥ ७३ ॥ I सर्वतः पाणिपादं तत्सर्वतोऽक्षिशिरोमुखम् । सर्वतः श्रुतिमल्लोके सवमावृत्य तिष्ठति ॥ १३ ॥ सम० – रज्जुसर्प हैं हात पाय नेत्र शिंरें मुखें । सर्वत्र तें श्रीयुक्त सर्व व्यापूनि तें असे ॥ १३ ॥ आर्या-सर्वत्र पाद कर जें तैसें सर्वत्र हो उदारा हे । सर्वत्र नयन शिर मुख सर्व व्यापूनि जें सदा राहे ॥ १३ ॥ ओवी - सर्वत्र हात पाय दिसती । शिरें मुखे तया असती । नेत्र कर्ण सर्वत्र भासती । दशदिशा व्यापूनि असे ॥१३॥ आघवांचि देशीं काळीं । नव्हतां देशकाळांवेगळी । जे क्रिया स्थूळास्थूळीं । तेचि हात जयाचे ॥ ७४ ॥ तयातें याकारणें । विश्ववाह ऐसें म्हणणें । जें सर्वचि सर्वपणें । सर्वदा करी ।। ७५ ।। आणि समस्तांही ठायां । एके काळी धनंजया । आलें असे म्हणोनि जया । विश्वत्रि नाम ।। ७६ ।। पैं सवितया आंग डोळे | नाहींत वेगळे वेगळे । तैसें सर्वद्रष्टें सकळें । स्वरूपें जें ॥ ७७॥ म्हणोनि विश्वतश्चक्षु | हा अचक्षूच्या ठायीं पक्षु । वोलावया दक्षु । जाहला वेदु ॥ ७८ ॥ सर्वांचे शिरावरी । नित्य नांदे सर्वांपरी । ऐसिये स्थितीवरी । विश्वमूर्धा म्हणिपे ।। ७९ ।। पैं गा मूर्ति तेंचि मुख । हुताशना जैसें देख । तैसें सर्वपणें अशेख । भोक्तें जें ॥। ८८० ॥ यालागीं तया पार्था । विश्वतोमुख हे व्यवस्था | आली वाक्पथा । श्रुतीचिया ॥ ८१ ॥ आणि वस्तुमात्री गगन । जैसे संलग्न । तैसे शब्दजातीं कान । सर्वत्र जया ॥ ८२ ॥ म्हणोनि आम्ही तयातें | म्हणों सर्वत्र आइकतें । एवं जें सर्वांतें । आवरूनि असे ॥ ८३ ॥ मडकें, घडा, इत्यादिकांचे ठिकाणीं पृथ्वीतत्त्व त्या त्या आकारानें असतें, तसें सर्वामध्ये सर्वाकाराने वस्तु निरंतर असतें, ७३ जें सर्व स्थळी व काळी स्थळकाळापासून वेगळी न पडतां जी क्रिया स्थूल सूक्ष्म भूतमात्रापासून घडते, ती क्रिया हेच ज्या ब्रह्मवस्तूचे हात आहेत; ७४ म्हणून त्या वस्तूला 'विश्वबाहु ' म्हणतात, कां कीं तें ब्रह्मवस्तूच सर्वाकार होऊन सर्व क्रिया सदा करीत असतें; ७५ आणि अर्जुना, तें वस्तु सर्व ठिकाणीं एकदमच प्राप्त होत असल्यामुळे त्याला 'विश्वांधि' म्हणतां येतें; ७६ तसेंच ज्याप्रमाणे सूर्याच्या विंवांत डोळे म्हणून निराळे अवयव नसतात, तर सर्व बिंबच प्रकाशक स्वरूप असतं, त्याप्रमाणें जें वस्तु आपल्या सर्व स्वरूपानें विश्वाचा द्रष्टा होते, म्हणजे विश्वाला प्रकाशमान् करून पाहतें, ७७ म्हणून वेदानें त्या अत्रक्षु म्हणजे नयनहीन ब्रह्मवस्तूला 'विश्वतश्चक्षु' या नांवाने मोठ्या आदराने संबोधिलें आहे; ७८ जें विश्वाच्या मस्तकावर सदासर्वदा आत्मसत्तेनें नांदत असतं, म्हणून त्याला 'विश्वमूर्धा ' म्हणण्यांत येतें; ७९ तसंच, ज्याप्रमाणे अम्मीची सर्व मूर्ति हेंच त्याचें मुख होय, त्याप्रमाणे जं सर्वपणानें अशेष भूतमात्राचा उपभोग घेतें, ८८० म्हणून, अर्जुना, त्याला 'विश्वतोमुख' ही संज्ञा देणें यथायोग्य होतें; ८१ आणि ज्याप्रमाणें समस्त वस्तूंना आकाश व्यापून राहते; त्याप्रमाणें जें वस्तु सर्व शब्दमात्राला व्यापून असतें, ८२ म्हणून आम्ही त्या ब्रह्मवस्तूला 'सर्व ऐकणारे' असें म्हणतो; अशा प्रकारें जें वस्तु समस्त विश्वाला व्यापून राहते; ८३