पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तेराया ५१७ चिन्हसमुच्चयो आघवा । आयकिला तो जाणावा । अज्ञानभागु ॥ ६१ ॥ इया अज्ञानविभागा | पाठी देऊनि पैं गा । ज्ञानविखीं चांगा । दृढा होइजे ॥ ६२ ॥ मग निर्वाळलेनि ज्ञानें । ज्ञेय भेटेल मनें । तें जाणावया अर्जुनें । आस केली ॥ ६३ ॥ तंव सर्वज्ञांचा रावो । म्हणे जाणोनि तयाचा भावो । परिसें ज्ञेयाचा अभिप्रावो । सांगों आतां ॥ ६४ ॥ ज्ञेयं यत्तत्प्रवक्ष्यामि यज्ज्ञात्वामृतमश्नुते । अनादिमत्परं ब्रह्म न सत्तन्नासदुच्यते ॥ १२ ॥ सम० - आतां सांगेन जे ज्ञेय मुक्तिज्ञानें जयाचिया । न आदि अंत जें शुद्ध ब्रह्म तें सत् न तें असत् ॥ १२ ॥ आर्या- कथितों में ज्ञेय तुला जाणुनियां अमृत पावती सत्य । तें ब्रह्म अनादि परम न स्थूल न सूक्ष्म तें असे नित्य १२ अवी- आतां सांगतों ज्ञेय । भक्तिज्ञानें होय जय । आदि अंत शुद्ध होय । ब्रह्म सत् असत् नसे ॥ १२॥ तरि ज्ञेय ऐसें म्हणणें । वस्तु तें येणेंचि कारणें । जें ज्ञानेंवांचूनि कवणें । उपायें न ये ॥ ६५ ॥ आणि जाणितलेयावरौतें । कांहींच करणें नाहीं जेथें | जाणणेंचि तन्मयातें । आणी जयाचें ॥ ६६ ॥ जें जाणित लेयासाठीं । संसारा काढूनियां कांठीं । जिरोनि जाइजे पोटीं । नित्यानंदाच्या ॥ ६७ ॥ तें ज्ञेय गा ऐसें । आदि जया नसे | परब्रह्म आपैसें । नाम जया ॥ ६८ ॥ जें नाहीं म्हणो जाइजे । तंव विश्वाकारें देखिजे । आणि विश्वचि ऐसें म्हणिजे | तरि हे माया ॥ ६९ ॥ रूप वर्ण व्यक्ति । नाहीं दृश्य द्रष्टा स्थिति । तर को कैसें आथी । म्हणावें पां ॥। ८७० ॥ आणि साचचि जरी नाहीं । तरि महदादि कोणें ठाईं। स्फुरत कैंचें काई । तेणेंवीण असे ॥ ७१ ॥ म्हणोनि आथी नाथी हे बोली । जें देखोनि मुकी जाहली । विचाराची मोडली | 66 1 "" अर्जुना, तुला आतां अखेरीला जीं लक्षणें सांगितलीं तीं अज्ञानाचीं आहेत. ६१ या अज्ञानापासून तोंड फिरवून ज्ञानाविषयीं चांगला दृढनिश्चय तूं करावास. ६२ मग अशा रीतीनें ज्ञानाचा निर्वाळा झाला म्हणजे मनाला ' ज्ञेय' कसें गांठतें, हें जाणण्याची इच्छा अर्जुनाला झाली, ६३ तेव्हां सर्वांतरसाक्षी श्रीकृष्णांनीं त्याचें इंगित जाणून, त्याला म्हटलें, “ आतां ज्ञेय' म्हणजे काय तें तुला सांगतों ऐक. ६४ ब्रह्मवस्तूला ' ज्ञेय' म्हणावयाचें कारण इतकेंच, कीं तें ज्ञानावांचून इतर कोणत्याही उपायांनी प्राप्त होत नाहीं. ६५ आणि ज्याचं ज्ञान झालें असतां कांहीं कार्य उरत नाहीं, जें जाणल्याबरोबर तदुपता उत्पन्न करते, ६६ ज्याचे ज्ञान झालें असतां, संसाराला तीरावर ठेवून ज्ञान्याला नित्यानंदांत बुडी मारून त्यांत मिसळून जातां येतें, ६७ तें हें ज्ञेय असे आहे कीं त्याला आदि नाहीं म्हणजे तं सनातन आहे. त्याला कांहीं तरी नांव पाहिजे म्हणून परब्रह्म म्हणतात. ६८ तें नाहीं म्हणावें तर विश्वरूपाने प्रत्यक्ष दिसतें; आणि त्याला विश्व म्हणावें, तर हें विश्व केवळ मायिक, अशाश्वत आहे. ६९ आकार, रंग, इत्यादि भेद आणि दृश्यत्व व द्रष्टृत्व हेही भाव ज्याच्याठायीं नाहींत, तें आहे, असें तरी कोणी कसं सांगावें ? ८७० आणि जर हे खरोखरच नसेल, तर त्याच्यावांचून महत्तत्त्वाचे स्फुरण कोठें होतें, असा प्रश्न उद्भवतो. ७१ म्हणून ज्याचे ज्ञान झालें असतां ' आहे- नाहीं ' ही भाषा मुकी होऊन राहते आणि विचारशक्तीची वाट जेथें खुंटते; ७२ जशी हांड़ी,