पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५१६ सार्थ श्रीज्ञानेश्वरी न मिळे | जेविं आंवतिलें आंधळें । तें दुजेनसीं ये ॥ ४९ ॥ एवं इसे उपरतीं । अज्ञानचिन्हें मागुती । अमानित्वादिप्रभृति । वाखाणिलीं ॥ ८५० ॥ जे ज्ञानपदें अठरा । केलिया येरी मोहरा । अज्ञान या आकारा । सहजें येती ॥ ५१ ॥ मागां श्लोकाचेनि अर्धा । ऐसें सांगितलें श्री मुकुंदं । ना उफराटी इयें ज्ञानपदें । तेंचि अज्ञान ॥ ५२ ॥ म्हणोनि इया वाहणी | केली म्यां उपलवणी । वांचूनि दुधा मेळऊनि पाणी फार कीजे ॥ ५३ ॥ तैसें जी न बडबड | पदाची कोर न सांडीं । मूळध्वनींचिये वाढी । निमित्त जाहलों ॥ ५४ ॥ तंव श्रोते म्हणती राहें । के परिहारा ठावो आहे । विहिसी कां वायें । कविपोपका ।। ५५ ।। तूतें श्री मुरारी । म्हणितलें प्रगट करीं । जे अभिप्राय गव्हरीं । झांकिले आम्हीं ||५६ || तें देवाचें मनोगत | दावित आहासी तूं मूर्त । हेंही म्हणतां चित्त । दॉटेल तुझें ॥५७॥ म्हणोनि असो हैं न बोलों । परि साविया गा तोपलों । जे ज्ञानतरिये मेळविलों | श्रवणसुखाचिये ॥ ५८ ॥ आतां इयावरी । जें तो श्रीहरि | बोलिला तें करीं | कथन वेगां ॥ ५९ || इया संतवाक्यासरिसें । म्हणितलें निवृत्तिदासें । जी अवधारा तरी ऐसें | बोलिलें देवें || ८६० ॥ म्हणती तुवां पांडवा | हा घेऊन येतो, त्याप्रमाणे अज्ञानाचीं लक्षणें सांगूं लागलें, कीं त्यांबरोबरच ज्ञानाचीं लक्षणें आपोआप समजूं लागतात. ४९ म्हणून प्रस्तुत प्रकरणीं अमानित्वादि ज्ञानलक्षणांच्या उलट अज्ञानाचीं लक्षणें असे प्रतिपादिले आहे. ८५० जीं ज्ञानाचीं अठरा लक्षणे सांगितलीं आहेत, ती उलट मार्गाला लावलीं म्हणजे तीं आपोआपच अज्ञानाचीं लक्षणें होतात. ५१ मागें श्लोकाच्या एका ( चवथ्या ) चरणांत श्रीकृष्णानीं असें सांगितलें कीं, ज्ञानलक्षणें विपरीत केलीं म्हणजे तीं अज्ञान लक्षणें बनतात. ५२ म्हणून ही पद्धति अंगीकारून या विषयाचा खुलासा मी केला आहे. मूळांत ही पद्धति सुचविलेली नसती, तर पाणी घालून दूध वाढविण्यासारखें पदरची बडबड करून विषय फुगविण्याचे कृत्य मी केलें नसतें. मूळ श्लोकांतील शब्दाची मर्यादा न सोडतां, मूळांत ध्वनित केलेल्या अर्थाची फोड करण्याची कामगिरी मी केली आहे. ५३, ५४ हें ऐकून श्रोते म्हणाले, "( हा खुलासा पुरे झाला. या समर्थनाची मुळींच आवश्यकता नाहीं. हे कविपोषका, तुझा विवरणविस्तार पाल्हाळिक वाटेल, अशी निष्कारण भीति तूं कां वाटून घेतोस ? ५५ तुला श्रीकृष्णांनी आज्ञा केली आहे, कीं, 'गीतेंत आम्ही जे अर्थ गर्भित ठेवले आहेत, ते तूं स्पष्ट करून सांग.' ५६ तरी देवाजीचा हा मनोरथ तूं आज पूर्ण करीत आहेस; पण हें तुला सांगावें तर यानेही तुझ्या हृदयाला गहिंवर येईल, ५७ म्हणून हें कांहीं आम्ही तुला सांगत नाहीं. तरी पण इतकें सांगितलेच पाहिजे, कीं, आम्ही या श्रवणसुखानें आज ज्ञाननौका लाभलों आहों. ५८ आतां यानंतर श्रीहरि काय म्हणाले, तें आम्हांला त्वरित कथन कर. ५९ हें संतवचन श्रवण करतांच निवृत्तिवास ज्ञानदेव म्हणाला, “ श्रोते हो, श्रवण करा. श्रीकृष्णदेव म्हणाले, ८६० "